लाइफस्टाइल

CNG Cars : CNG कार घेण्याचा विचार करताय? पहा हे भन्नाट ऑप्शन

सध्या इंधनाचे दर गगनाला भिडले आहेत

सकाळ वृत्तसेवा

सध्या इंधनाचे दर गगनाला भिडले आहेत. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलवर चालणाऱ्या कार परवडत नाहीत. त्यामुळे सीएनजी कार्सची मागणी बाजारात वाढत आहे. केवळ नविन नाही तर जून्या कारही सीएनजी आहेत का? हे पाहुन खरेदी विक्री केली जात आहे.

तूम्हीही सीएनजी कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर मार्केटमधील काही लेटेस्ट मॉडेलवर नजर फिरवायला हवी. यावर पर्याय म्हणून सीएनजीचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. आता बाजारात सर्वोत्कृष्ट सीएनजी कार असल्याचा दावा करणाऱ्या मोठ्या संख्येने कार आहेत ज्या कमी किमतीत दीर्घ मायलेजचा दावा करतात. आज आपण टॉप 3 कारबद्दल माहिती घेणार आहोत.

भारतीय ऑटोमोबाईल मार्केटमध्ये एसयूव्ही बॉडी असलेल्या कार खूप लोकप्रिय होत आहेत. त्यांच्या विक्री युनिट्सची देखील खूप विक्री होत आहे. यासोबतच सीएनजी कारची लोकप्रियताही वाढत आहे. त्यामुळेच दोन कॉम्पॅक्ट एसयूव्ही कार सीएनजी व्हेरियंटमध्ये लॉन्च करण्यात आल्या आहेत.

टाटा नेक्सॉन CNG

Nexon लवकरच CNG कार लॉन्च करणार आहे. CNG व्हेरियंट अलीकडेच पाहण्यात आली आहे. या गाडीमध्ये 1.2 लीटर रेवोट्रोन टर्बो इंजन आहे. Tata Nexon CNG 5 मध्ये स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स आहेत. टाटा नेक्सॉन ही सर्वात सुरक्षित कार मानली जाते. ही कार मारुति ब्रेजा, हुंडई वेन्यू, किआ सोनेट, महिंद्रा एक्सयूवी 300, निसान मेग्नाइट आणि रेनो किगर सोबत स्पर्धा करते.

मारुती सुझुकी ब्रेझा

मारुती सुझुकी ब्रेझा ही सीएनजी कार नुकतीच भारतीय बाजारपेठेत दाखल झाली आहे. या कारमध्ये 1.5 लीटर K15C पेट्रोल इंजिन आहे. ही कार 5 स्पीड आणि 6 स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्ससह येते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT