number of glasses
number of glasses Esakal
लाइफस्टाइल

चष्म्याचा नंबर कमी करण्यासाठी 'हे' व्यायाम करा

सकाळ डिजिटल टीम

चष्म्याचा वाढता नंबर, स्क्रिन पाहिल्याने डोळ्यांना येणारा थकवा, डोळ्यांची जळजळ असा त्रास लहान मुलांप्रमाणेच मोठ्या मंडळींनाही जाणवतो.

चष्मा लागण्याचा आणि वय वाढण्याचा आता काहीही संबंध राहिलेला नाही. अगदी पुर्व प्राथमिक आणि प्राथमिक विभागातील मुलांनाही चष्मा लागतोय.
कमी वयात लागलेला चष्मा, डोळ्यांना आलेला थकवा आणि ताण. हा त्रास तसेच डोळ्यांचा नंबर कमी करण्यासाठी काही व्यायाम (Eye exercises) सांगितले आहेत. 
डोळ्यांचे व्यायाम हे सगळे व्यायाम करण्यासाठी एका जागी शांत- ताठ बसावे आणि मन शांत करून एकाग्रतेने हे व्यायाम करावेत.
पहिला व्यायाम म्हणजे चेहऱ्याच्या किंवा शरीराच्या इतर भागांची हालचाल न करता एकदा वर तर एकदा खाली बघावे. ही क्रिया 10 वेळा करावी.
दुसऱ्या व्यायामामध्ये एकदा डावीकडे तर एकदा उजवीकडे बघावे. ही क्रिया देखील 10 वेळा करावी.
तिसरा व्यायाम करण्यासाठी डोळ्यांची डायगोनल म्हणजेच तिरक्या दिशेत हालचाल करावी. म्हणजेच वर बघताना डाव्या बाजूने पाहिले तर खाली बघताना उजव्या बाजूने पहावे, तसेच वर जर उजव्या बाजूने बघितले तर खाली डाव्या बाजूने बघावे. या दोन्ही क्रिया प्रत्येकी 10-10 वेळा कराव्या.
क्लॉकवाईज आणि ॲण्टी क्लॉकवाईज अशा दोन्ही दिशेने डोळे प्रत्येकी 10- 10 वेळा फिरवावेत.उजव्या हाताचा अंगठा अगदी नाकाच्या जवळ आणावा आणि हळूहळू हात शक्य होईल तितका लांब न्यावा.
पुन्हा अंगठा हळूहळू नाकाजवळ आणावा. ही संपूर्ण क्रिया करताना अंगठ्यावर लक्ष केंद्रित करावे. ही क्रियाही 10 वेळा करावी.
यानंतर दोन्ही हातांचे तळवे एकमेकांवर घासून निर्माण होणारी उष्णता डोळ्यांना द्यावी
शेवटचा व्यायाम म्हणजे 10 वेळा पटापट डोळ्यांची उघडझाप करावी.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Water Scarcity : पिण्याच्या पाण्यासाठी दाहीदिशा वणवण ; राज्यात भीषण टंचाई,७४९५ वस्त्यांवर टँकरद्वारे पुरवठा

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 30 एप्रिल 2024

Narendra Modi in Pune : रेसकोर्सवर अवतरला ‘केसरिया सागर’

Nashik Ashok Kataria Fraud Case: अशोक कटारिया यांचा ‘अटकपूर्व’ फेटाळला! अडचणीत वाढ; हायकोर्टात जाण्याची शक्यता

IPL 2024, KKR vs DC: कोलकातानं मागच्या सामन्यातून धडा घेतला अन् पंतच्या दिल्लीला चारीमुंड्या चीत केलं

SCROLL FOR NEXT