double mask
double mask 
लाइफस्टाइल

डबल मास्क वापरताय? मग चुकूनही करु नका 'या' गोष्टी

शर्वरी जोशी

सध्या देशावर कोरोनाचं (covid-19) संकट आहे. त्यामुळे या काळात स्वत:ची व कुटुंबाची काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे. सोबतच प्रशासन व आरोग्य यंत्रणेने सांगितलेल्या तीन सूत्रांचंदेखील पालन केलं पाहिजे. यामध्येच मास्क (mask) वापरणे आणि सोशल डिस्टंसिंगच्या नियमांचं पालन करणं अत्यंत गरजेचं आहे. तसंच घराबाहेर पडतांना मास्क वापरणं अत्यावश्यक झालं आहे. सध्या देशात कोरोनाची दुसरी लाट असून लवकरच तिसरी लाटदेखील येण्याची शक्यता आहे. त्यामुळे तिसऱ्या लाटेचा प्रभाव पडण्यापूर्वीच आपण सतर्क राहणं गरजेचं आहे. म्हणूनच सध्या डबल मास्क (double mask) वापरण्याचा सल्ला देण्यात येत आहे. यामध्येच आता प्रशासनाने डबल मास्क वापरतांना कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे, व कोणत्या गोष्टी कटाक्षाने टाळल्या पाहिजेत याविषयीची एक नियमावली (guidelines) जाहीर केली आहे. त्यामुळे डबल मास्क लावतांना काय करावं आणि काय करु नये ते पाहुयात. (double mask guidelines)

डबल मास्क वापरतांना कोणती काळजी घ्याल?

सध्याच्या काळात सर्जिकल मास्क वापरण्याचा सल्ला आरोग्य यंत्रणेकडून देण्यात येत आहे. तसंच गरज भासल्यास घरातदेखील मास्क वापरा.

२. घराबाहेर पडतांना सक्तीने डबल मास्क लावला.

३. डबल मास्क लावतांना त्यात एक सर्जिकल मास्क व दुसरा Triple layered असलेला मास्क असावा.

४. घरात असतांना तीन पटलांचा मास्क वापरावा. (Triple layered)

५. नाकापासून हनुवटीपर्यंत संपूर्ण तोंडाजवळील भाग कव्हर होईल असाच मास्क वापरा.

६. श्वास घेण्यास अडथळा होईल इतका घट्ट किंवा सतत तोंडावरुन खाली घसरेल इतरा सैल असा मास्क घेऊ नका.

७. N-95 हा मास्क कोरोनापासून बचाव करण्यास योग्य असल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे शक्य असल्यास तो वापरा.

डबल मास्क लावतांना 'हे' करु नका

१. एकाच प्रकारचे दोन मास्क वापरु नका.

२. एकच मास्क सलग दोन-तीन दिवस वापरु नये.

३. सुती मास्क वापरत असल्यास ते दररोज धुवा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 LSG vs RR : केएल शेर तर संजू सवा शेर! राजस्थानचा एक पाय प्ले ऑफमध्ये

DC vs MI : गोलंदाजीतली 'गळती' मुंबईच्या मुळावर; बॅटिंगमध्ये फर्स्ट क्लास तर बॉलिंगमध्ये नापास

Jolly LLB 3 : आता रंगणार जॉली विरुद्ध जॉली केस; सिनेमाच्या शूटिंगबाबत महत्त्वाची अपडेट आली समोर

Google वर जाहिराती करण्यासाठी भाजपने खर्च केले 100 कोटी; BJP पहिल्या स्थानावर तर काँग्रेस कितव्या स्थानावर? वाचा सविस्तर...

CM Yogi Aadityanath : ''काशी अन् अयोध्येनंतर आता मथुरेकडे प्रस्थान...'' योगी आदित्यनाथांचे स्पष्ट संकेत

SCROLL FOR NEXT