E-guide for women international womens day 2023 skill
E-guide for women international womens day 2023 skill sakal
लाइफस्टाइल

महिलांसाठी ई-मार्गदर्शक

ऋषिराज तायडे

नवी कौशल्ये विकसित करायची असेल, तसेच आयुष्याच्या विविध टप्प्यांवर आव्हानांचा सामना करायचा असेल, तर अशावेळी काही संकेतस्थळे तुमच्या मदतीसाठी तत्पर असतात.

- ऋषिराज तायडे

आपण सर्वांनीच जागतिक महिला दिन काल मोठ्या उत्साहात साजरा केला. या निमित्ताने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या महिलांचा सन्मान करतो. महिलांना त्यांच्या आयुष्यात नवनव्या संधी जाणून घ्यायची असेल,

नवी कौशल्ये विकसित करायची असेल, तसेच आयुष्याच्या विविध टप्प्यांवर आव्हानांचा सामना करायचा असेल, तर अशावेळी काही संकेतस्थळे तुमच्या मदतीसाठी तत्पर असतात. त्यापैकी काही निवडक संकेतस्थळांबाबत जाणून घेऊया..

१. www.lawisgreek.com

महिलांसाठी कायदेविषयक माहिती आणि मार्गदर्शनासाठी हे संकेतस्थळ अतिशय उपयुक्त आहे. महिलाविषयक न्यायालयीन प्रकरणांचे निकाल तसेच खटल्यांची सविस्तर माहिती, केस स्टडीजही संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. त्याचा महिलांना संदर्भ साहित्य म्हणून वापर करता येतो. याशिवाय महिलांना त्यांच्या आयुष्यात येणाऱ्या विविध अडचणी उदा. कौटुंबिक हिंसाचार, सार्वजनिक ठिकाणी छळ, लैंगिक अत्याचारविषयक प्रकरणांबाबत कायदेविषयक माहिती सोप्या शब्दात या संकेतस्थळावर दिली आहे.

२. www.skillshare.com

केवळ महिलांसाठी नव्हे, तर सर्वांना वेगवेगळे छंद, आवडी-निवडी अधिक विकसित करायच्या असतील, तर हे संकेतस्थळ खासच म्हणावे लागेल. अगदी संगीत, चित्रकला, फोटोग्राफीपासून ते ॲनिमेशन, ग्राफिक डिझाईन, पाककला, रंगभूषा, वेशभूषा यांसह विविध विषयांबाबतचे ऑनलाईन मार्गदर्शन सत्रे या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. त्यापैकी तुम्हाला हव्या त्या विषयांचे ऑनलाईन क्लासेस जॉईन करता येतात आणि विशेष म्हणजे तुमच्या सवडीनुसार ते शिकताही येतात. शिवाय तुम्ही एखाद्या विषयातील तज्ज्ञ असाल, तर तुम्हाला याठिकाणी मार्गदर्शन करण्याची संधी उपलब्ध आहे.

३. www.unwomen.org

महिला सक्षमीकरण आणि लिंगसमानतेसाठी काम करणारा संयुक्त राष्ट्राचा खास विभाग म्हणजे यूएनवुमेन. जगभरातील महिलांचा आर्थिक आणि राजकीय विकास, महिला हिंसाचार प्रतिबंध, दिव्यांग महिलांचे सक्षमीकरण, आरोग्य, शिक्षण, आर्थिक साक्षरतेसाठी ही संस्था काम करते. विविध विषयांतील सविस्तर असे वृत्तांत, शोधनिबंध, अहवाल या संकेतस्थळावर दिले आहेत. महिलांसाठी काम करणाऱ्या व्यक्ती वा संस्थांना ते संदर्भ साहित्य म्हणून निश्चितच उपयोगी आहे. शिवाय जिज्ञासू म्हणूनही ते आपल्या सर्वांसाठी वाचनीय असे आहे.

४. www.csrindia.org

सेंटर फॉर सोशल रिचर्स अर्थात सीएसआर ही महिलांसाठी काम करणारी दिल्लीतील एनजीओ आहे. प्रामुख्याने शिक्षण, स्वावलंबन, कौशल्य विकास, नेतृत्व विकास, लिंगसमानता, ऑनलाईन सुरक्षा आदी विषयांमध्ये सीएसआरकडून मोठ्या प्रमाणात काम केले जाते. या सीएसआरच्या यू-ट्युबवर महिलांसाठी प्रेरणादायी आणि मार्गदर्शक वेबिनार तसेच मार्गदर्शन सत्रे उपलब्ध आहेत, तसेच संकेतस्थळावर सरोगसी, बालविवाह, कौटुंबिक हिंसाचार, मातृत्व रजा हक्क, महिला साक्षरता आदी विषयांवरील शोधनिंबध वाचनीय आणि अभ्यासपूर्ण आहेत.

५. www.ncw.nic.in

राष्ट्रीय महिला आयोगाच्या संकेतस्थळावर महिलांसाठी बरीच महत्त्वाची माहिती उपलब्ध आहे. आयोगाच्या विविध विभागनिहाय उदा. पॉलिसी आणि रिसर्च सेल, लीगल सेल, एनआरआय सेल, नॉर्थ-ईस्ट सेल, स्युमोटो सेल, वुमन सेफ्टी सेल, वुमन वेलफेअर सेल आदींची माहिती विस्ताराने या संकेतस्थळावर दिली आहे. काही प्रकरणी तक्रार दाखल करायची असल्यास त्याबाबत मार्गदर्शन आणि माहितीही याठिकाणी दिली आहे. आयोगाच्या वतीने प्रकाशित केले जाणारे विविध अहवाल, न्यूजलेटर, आदींच्या माध्यमातून पूरक माहितीही संकेतस्थळावर आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update: शिवानी अग्रवालला उद्या कोर्टात हजर केले जाणार

IND vs PAK: 'पाकिस्तानला सुरुवातीचे पंच तोच मारेल...', भारताविरुद्ध सामन्यापूर्वी माजी कर्णधाराचा आपल्याच संघाला इशारा

100 वर्ष जुनं पुस्तक खरेदी करण्यासाठी उद्योगपती गेला खाजगी विमानाने; कोणतं आहे ते पुस्तक?

Chhaya Kadam : रेड कार्पेटवर 'ते' मराठी गाणं वाजलं अन् मी डान्स करायला सुरुवात केली; छाया कदम यांनी सांगितले 'कान'चे खास किस्से

Amravati Loksabha Election : अमरावतीत मतविभाजनाचा लाभ कुणाला?

SCROLL FOR NEXT