Engagement Ring esakal
लाइफस्टाइल

Engagement Ring : साखरपुड्यात अंगठीचीच होईल जास्त चर्चा; खरेदी करताना 'या' गोष्टींची घ्या खास काळजी

Engagement Ring : साखरपुड्याच्या दिवशी भावी वर आणि वधू एकमेकांना अंगठी घालतात. यामुळे, दोन्ही कुटुंबांचे आणि भावी वर-वधूचे नाते घट्ट होण्यास मदत होते.

Monika Lonkar –Kumbhar

Engagement Ring : मे आणि जून महिना हा लग्नसराईचा महिना म्हणून ओळखला जातो. अनेक जण या दिवसांमध्ये लग्न करतात किंवा साखरपुडा तरी उरकून घेतात. यंदा तुम्ही देखील लग्न करण्याचा निर्णय घेतला असेल तर हा लेख खास तुमच्यासाठी आहे.

अनेक जण लग्नाच्या दिवशी साखरपुडा न करता तो काही दिवस आधी करून घेतात. जेणेकरून त्यांना साखरपुडा व्यवस्थित पार पाडता येतो आणि लग्नाच्या दिवशी होणारी घाई-गडबड काही प्रमाणात टाळता येते.

साखरपुड्याच्या दिवशी भावी वर आणि वधू एकमेकांना अंगठी घालतात. दोन्ही कुटुंबांचे आणि वर-वधूचे नाते यामुळे घट्ट होण्यास मदत होते. जर तुमचा ही साखरपुडा ठरला असेल किंवा काही दिवसांनी पार पडणार असेल, तर काही गोष्टी तुम्ही लक्षात ठेवायला हव्यात.

मुलाने किंवा मुलीने आधुनिक ट्रेंडनुसार आणि फॅशननुसार अंगठी खरेदी करताना काही गोष्टींची काळजी घेणे तितकेच महत्वाचे आहे. कोणत्या आहेत त्या गोष्टी? चला तर मग जाणून घेऊयात.

बजेट सांभाळा

साखरपुड्याची अंगठी मुलासाठी किंवा मुलीसाठी खरेदी करताना बजेट देखील लक्षात घ्यायला हवे. अंगठी खरेदी करताना ती किती महाग आहे किंवा स्वस्त आहे याचा विचार करण्यापेक्षा तुम्हाला आवडेल अशी आणि बजेटमध्ये बसणारी अंगठी खरेदी करा. तुमच्या एकूण आर्थिक क्षमतेनुसार, तुमच्या अंगठीचे बजेट ठरवा. कोणत्याही नात्याची वीण ही अंगठीच्यचा किंमतीने मोजली जाऊ शकत नाही, हे नेहमी लक्षात ठेवा.

प्लॅटिनमच्या ऐवजी सोन्याची करा निवड

एक सुंदर साखरपुड्याची अंगठी खरेदी करताना केवळ प्लॅटिनम किंवा हिरे हा पर्याय नाही तर तुम्ही सोन्याची अंगठी देखील खरेदी करू शकता. तुमच्या बजेटनुसार तुम्ही यलो गोल्ड, रोझ गोल्डच्या अंगठीची ही निवड करू शकता.

मुलांसाठी सहजसोपी अंगठी

मुलींच्या तुलनेत मुलांना जास्त हेव्ही किंवा जास्त डिझायनर अंगठ्या घालायला आवडत नाही. त्याऐवजी तुम्ही सहजसोपी डिझाईन असलेल्या सिंपल अंगठीची निवड करू शकता. मुलांना अशा सिंपल अंगठ्या घालायला आवडतात. फार भारी आणि ट्रेंडी अंगठीकडे त्यांचा कल नसतो. त्यामुळे, मुलासाठी अंगठी खरेदी करताना या गोष्टी लक्षात घ्या. मुलासाठी तुम्ही सिंपल सॉलिटेअरसह साध्या बॅंडचा पर्याच देखील निवडू शकता.

ब्रॅंडच्या मागे धावू नका

आजकाल ज्वेलरीमध्ये अनेक ब्रॅंड्स उपलब्ध आहेत. या ब्रॅंड्सचे साहजिकच आपल्या सगळ्यांना आकर्षण असते. परंतु, या ब्रॅंड्सची उत्पादने महाग असतात. हे तुम्ही लक्षात घ्यायला हवे. जर तुम्हाला पैसे वाचवायचे असतील तर ब्रॅंडच्या मागे धावू नका. एखाद्या ब्रॅंडच्या डिझाईनची अंगठी तुम्हाला आवडली असेल तर स्थानिक दुकानांमध्ये त्या प्रकारची अंगठी तुम्हाला कमी किंमतीमध्ये मिळू शकते. हॉलमार्क केलेली अंगठी खरेदी करायला अजिबात विसरू नका.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Virat Kohli Address: विराट-अनुष्का यांचा लंडनमधील पत्ता सापडला? माजी इंग्लिश खेळाडूने दिली हिंट

Jack Dorsey's New App : खुशखबर! आता इंटरनेट नसलं तरी करता येणार चॅटिंग; जॅक डोर्सीच 'हे' अ‍ॅप घेणार व्हॉट्सअ‍ॅपची जागा, तुम्ही पाहिलंत का?

पास की नापास? प्रेक्षकांना कसा वाटला 'हळद रुसली कुंकू हसलं' चा पहिला भाग? म्हणाले- पाव्हणं...

Latest Maharashtra News Updates : देवदर्शनाच्या रांगेत महिलेचे मंगळसूत्र लंपास

Mumbai News: एमएसआरटीसीच्या दररोजच्या फेऱ्यात घट, कर्मचाऱ्यांना त्रास; दररोज लेटमार्कने हैराण

SCROLL FOR NEXT