
भारताचा स्टार क्रिकेटपटू विराट कोहली लोकप्रिय खेळाडूंपैकी एक आहे. त्यामुळे भारतात तो जिथेही जातो तिथे त्याच्याभोवती चाहत्यांचा गराडा असतो. अशात त्याने यापासून थोडं लांब राहण्यासाठी आणि त्याच्या मुलांचे खाजगी आयुष्य यापासून लांब ठेवण्यासाठी लंडनमध्ये राहण्याचा निर्णय घेतला असल्याचे यापूर्वीच समोर आले होते.
आयपीएल २०२५ नंतरही तो लंडनला गेला असून अनेकदा तिथे त्याची पत्नी अनुष्का शर्मा आणि मुलांसोबत दिसला आहे. भारत - इंग्लंड कसोटी मालिकेपूर्वी त्याने लंडनमध्ये भारतीय संघातील खेळाडूंची भेटही घेतली होती.