Weight Loss Tips to Loose Belly Fat sakal
लाइफस्टाइल

Weight Loss Tips: शरीराच्या या भागात चरबी घटते झपाट्याने, जाणून घ्या उपाय!

Stomach Fat Loss: सध्याच्या बदललेल्या कामाच्या पद्धतीमुळे तासंतास एकाच ठिकाणी बसून काम करणाऱ्या लोकांमध्ये वजन वाढीचे प्रमाण जास्त आहे.

Anushka Tapshalkar

Stomach Fat Loss Tips: बदललेल्या कामाच्या पद्धतीमुळे आणि जंक फूडमुळे सध्या बरेच लोक पोटाच्या चरबीच्या समस्येने त्रस्त आहेत. जे लोक तासंतास एकाच ठिकाणी बसून काम करतात त्या लोकांमध्ये ही समस्या खूप प्रकर्षाने जाणवते. पोटावर वाढलेली चरबी सहजासहजी कमी होत नाही. त्यावर उपाय म्हणून बाजारात बरेच प्रॉडक्ट्स मिळतात, परंतु तज्ज्ञांच्या अनुसार हे प्रॉडक्ट्स वापरणे अयोग्य आहे.

खूप वेळ एका ठिकाणी बसून पोटाची चरबी वाढते. आणि नंतर ही चरबी कमी व्हायलासुद्धा खूप वेळ लागतो. बऱ्याच जणांना असं वाटतं की काही दिवस विशिष्ट व्यायाम केला की लगेच पोटाची चरबी कमी होते. पण वास्तविक पहिलं तर असं नसतं.

वजन किंवा शरीरावरील कोणतीही चरबी कमी व्हायला साधारणतः महिन्यांचा कालावधी लागतो. पण तुम्ही जर शॉर्टकट मध्ये वजन कमी करण्याचा प्रयत्न केला तर ते शरीरासाठी आणि आरोग्यासाठी सुद्धा हानिकारक आहे. तुम्हाला शरीर सुधृढ बनवायचे असेल तर त्यासाठी फॅट आणि वजन कमी करावे लागेल. त्यासाठी तुम्हाला एका चांगल्या जीवनशैलीची आणि व्यायामाची गरज आहे.

पोटावरची चरबी कमी करण्यासाठी पुढे एक सोपा उपाय दिला आहे

सर्वप्रथम चरबी कमी करणे, किंवा वजन कमी करणे यासाठी योग्य आणि पोषक आहारची गरज आहे. त्याकरिता फळे, भाज्या, कडधान्ये आणि प्रथिने(प्रोटिन) या अन्नपदार्थांचा तुमच्या जेवणात समावेश करा. तसेच बाहेर मिळणारे पॅक्ड कींवा प्रक्रीया केलेले पदार्थ, तळलेले पदार्थ, गोड पदार्थ यांचे सेवन केल्याने सुद्धा चरबी वाढते.

त्याचबरोबर सोडा, रिफाइन्ड साखर याचा सुद्धा चरबी आणि वजन वाढीत मोठा वाटा असतो. यामुळे शरीरात अति प्रमाणात कॅलरी आणि चरबी साठते. जे शरीरासाठी हानिकारक असते. त्यासाठी पाणी आणि ग्रीन टी चे सतत सेवन करणे फायद्याचे ठरते.

तज्ञांच्या मते, पोटाची चरबी कमी करण्यासाठी, दररोज कार्डिओ आणि स्ट्रेंथ ट्रेनिंगचा व्यायाम करणे खूप महत्वाचे आहे. जॉगिंग, पोहणे, सायकलिंग किंवा पॉवर योगा यासारखे कार्डिओ व्यायाम करणे आवश्यक आहे. हे व्यायाम चरबी कमी करण्यासाठी मदत करतात. पोटाच्या व्यायामासाठी लेग रेज, प्लॅन्क, क्रन्चेस , हिप रेज हे व्यायाम रोजच्या व्यायामात सामील करा. यामुळे पोटाच्या स्नायूंवर ताण येऊन चरबी कमी व्हायला मदत होते. याचा चयापचय मजबूत होतो.

पोटाची चरबी लवकरात लवकर कमी असेल तर हे उपाय फोलो करा

कोणत्याही समस्येचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणज पुरेशी झोप न होणे, त्यामुळे रोज ७-८ तासांची झोप पूर्ण करा. ज्यांची झोप पूर्ण होत नाही त्यांच्या शरीरात कॉर्टिसॉल हे ताणाचे हार्मोन वाढते. ज्यामुळे त्यांना ताण येतो आणि ताणाचे रूपांतर लठ्ठपणात होते.

तसेच दिवसंत जास्तीत जास्त २-३ लिटर पाणी पिणे गरजेचे आहे. यामुळे शरीर शुद्ध होते आणि चयापचयाला चालणे मिळते. जास्त पाणी प्यायल्याने भूक कमी लागते ज्यामुळे अति प्रमाणात खाणे टळते. लिंबू पाणी किंवा ग्रीन टी प्यायल्याने शरीराचे शुद्धीकरण होते आणि चरबी कमी होण्यास मदत होते.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Local: गणेशभक्तांना दिलासा! मध्य रेल्वेचा मेगाब्लॉक रद्द, विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय; पहा वेळापत्रक

CM Devendra Fadnavis : ‘’गणरायाकडे एकच मागणे मागायचे असते ते म्हणजे..’’ ; जाणून घ्या, मुख्यमंत्री फडणवीस नेमकं काय म्हणाले?

Ajit Pawar : प्रभाग रचनेवर आता रडत बसू नका; निवडणूक स्वबळावर लढण्याची तयारी ठेवा

Mumbai Local: २००हून अधिक लोकल फेऱ्या वाढणार, प्रवाशांना दिलासा मिळणार; रेल्वे प्रशासनाची योजना काय?

Latest Marathi News Updates : देश-विदेशासह राज्यात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT