Summer Care Tips Sakal
लाइफस्टाइल

Summer Care Tips: आहारातून घालवा उन्हाचा थकवा, स्वयंपाकघरातील 'हे' पदार्थ ठरतात उपयुक्त

उन्हाळ्यात खूप थकवा आल्यासारखे वाटण्याचे कारण म्हणजे, शरीरातून जो घाम बाहेर पडतो, त्याद्वारे शरीरातील महत्त्वाची खनिजे बाहेर पडतात

सकाळ वृत्तसेवा

Summer Care Tips: उन्हाचा चटका दिवसेंदिवस वाढत आहे. पण, काम काही थांबविता येत नाही. अशावेळी योग्य आहारातून थकवा दूर सारता येतो, असे तज्ज्ञांनी सांगितले. उन्हाळ्यात लवकर थकवा येणे, सुस्त वाटणे, खूप घाम येणे, पायांना गोळे येणे, अशक्तपणा जाणवणे, तोंड कोरडे पडणे, भूक न लागणे अशा कुरबुरी सुरूच असतात.

उन्हाळ्यात खूप थकवा आल्यासारखे वाटण्याचे कारण म्हणजे, शरीरातून जो घाम बाहेर पडतो, त्याद्वारे शरीरातील महत्त्वाची खनिजे बाहेर पडतात. याबाबत आहारतज्ज्ञ डॉ. अलका कर्णिक म्हणाल्या, ‘‘घामावाटे शहरातील लोह जास्तीत-जास्त प्रमाणात बाहेर पडते. त्यामुळे लोहयुक्त घटकांचा आहारात जास्तीत-जास्त वापर करावा.

पोटॅशियम हे खनिज शरीरातील आम्ल आणि अल्कलीचे संतुलन व्यवस्थित राखण्याचे काम करते. त्यामुळे शरीरातील ॲसिडिटी कमी करून शरीर अल्कलाइन होते. पोटॅशियम योग्य प्रमाणात असेल, तर लगेच थकवा कमी होतो.

उन्हाळ्यात मूत्र प्रमाण वाढविण्यासाठी, शरीराचा दाह कमी करण्यासाठी नारळपाण्यासोबत पालक रस घेतल्यास लघवी साफ होते. नारळपाण्यासोबत धने आणि बडीशेप पावडरचे पाणी एकत्रित केल्यासही लघवी साफ होते.

शारीरिक उत्साह वाढविण्यासाठी फॉस्फरस शरीराला अतिशय आवश्यक आहे. फॉस्फरसची योग्य मात्रा शरीरास प्राप्त झाल्यास अशक्तपणा लवकर जातो. कॅल्शियमच्या अभावानेही थकवा लवकर येतो, निस्तेज वाटतं, पायांना गोळे येतात. जेवणात काकडीचाही वापर हवा. काकडी उष्णता बाहेर टाकते. शरीरातील द्रव पदार्थांच्या क्षारांचे नियंत्रण ठेवण्यासाठी संतुलन राखण्यासाठी मॅग्नेशियमची भूमिका महत्त्वाची आहे.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG वाहतुकीसाठी देशात 1,800 किमी पाइपलाइन; कोणकोणत्या राज्यांतून जाणार? काय बदलणार? वाचा...

Sugar Industry: साखर कारखान्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय! ४ हजार कोटींचे सॉफ्ट लोन, व्याजाचा भारही सरकार उचलणार

Eknath Shinde: चाकणमधील उद्योगांचे स्थलांतर रोखणार’; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्योजकांच्या समस्यांवर घेतले महत्त्वाचे निर्णय

Maratha Reservation: जरांगेंच्या आंदोलनाबाबत छगन भुजबळांचा मोठा दावा; म्हणाले, ‘लढाई ओबीसींविरोधात नाही, सरकारविरोधात’

US-Iran War: आम्हाला व्हेनेझुएला बनवायला निघाले होते; इराणचा ट्रम्प यांच्यावर घणाघात, राष्ट्राध्यक्षांचा अमेरिकेला टोला

SCROLL FOR NEXT