actress smita bansal
actress smita bansal sakal
लाइफस्टाइल

मुलांना द्या सर्वोत्तम वेळ

सकाळ वृत्तसेवा

- स्मिता बन्सल

मी सध्या झी टीव्हीवरील ‘भाग्यलक्ष्मी’ या मालिकेत नीलमची भूमिका साकारत आहे. मला आठवतंय, माझ्या पहिल्या बाळाच्या जन्माची चाहूल लागली तेव्हा मी झी टीव्हीवर ‘कोई अपना सा’ या मालिकेमध्ये काम करत होते. त्यावेळचा माझा प्रवास खरंच छान होता. माझ्या पहिल्या तीन महिन्यांमध्ये मी काम करत होते.

त्यानंतर मात्र मी तीन ते चार वर्षांचा ब्रेक घेतला; कारण मला माझ्या मुलीसोबत जमेल तेवढा वेळ घालवायचा होता आणि तिची काळजी घ्यायची होती. त्यामुळे त्यावेळेस तडजोडी अशा काही केल्या नव्हत्या; पण होय, आई बनण्याआधी मी माझ्यासाठी काही मर्यादा घालून घेतल्या होत्या. मी कामावर परतले, तेव्हा मी माझ्या कामाची वेळ कमी केली आणि उर्वरित वेळ माझ्या मुलीसाठी राखून ठेवला. महिन्याचे सगळे दिवस मी व्यग्र राहणार नाही आणि जमेल तेव्हा ब्रेक घेईन, याची मी खबरदारी घेतली.

आई झाल्यानंतर माझ्या कुटुंबाला माझं प्राधान्य होतं. मला माझ्या मुलीला जास्तीत जास्त वेळ द्यायचा होता आणि याचाच अर्थ हा होता, की आता मी माझ्या करिअरवर माझं पूर्ण लक्ष केंद्रित करू शकत नाही. आधी मी अतिशय वर्कोहॉलिक होते, अगदी दररोज काम करायचे; पण मातृत्वामुळे माझ्या दृष्टिकोनामध्ये बदल झाला. मी थोडा वेळ बाजूला काढू लागले. माझ्या कामाच्या वेळेमध्ये घट केली आणि माझ्या प्रोजेक्ट्‌सच्या बाबतीत निवड करू लागले. सुदैवानं माझ्या टीमचं समर्थन मला लाभलं आणि देवाच्या कृपेनं सगळं नीट पार पडलं.

आई झाल्यानंतर पहिल्या वर्षी मी काम करत नव्हते, त्यामुळे कामाच्या बाबतीत काहीच सांभाळायचं नव्हतं. मात्र, माझ्या खासगी आणि कौटुंबिक आयुष्यात भावनिक आणि खासगी पद्धतीनं अनेक बदल होत होते.

मातृत्वामुळे व्यक्तीच्या आयुष्यात महत्त्वपूर्ण बदल होतात आणि ते त्यांना संपूर्णपणे बदलून टाकतात. हे केवळ तुमच्या करिअरवरच नाही, तर तुमच्या संपूर्ण आयुष्यावरच परिणाम करतं. तुमचं मूल तुमच्यासाठी सर्वोत्तम प्राधान्य बनतं आणि मग तुम्हाला तुमची स्वप्नं आणि महत्त्वाकांक्षांना बाजूला सारावं लागतं. सगळं काही तुमच्या मुलांच्या सभोवताली फिरत असतं आणि हा अनुभव बहुतेक आयांना येतो.

मी माझ्या करिअरसाठी निवडी करताना मी नेहमीच प्रथम माझ्या मुलांचा दिनक्रम आणि जीवनशैलीचा विचार करते आणि मगच मी माझा दिनक्रम ठरवते. त्यामुळे मी नवीन प्रोजेक्ट स्वीकारते, तेव्हा नेहमीच माझ्या मुलांना प्राधान्य देते आणि मगच नवीन जबाबदारी उचलते.

करिअरिस्ट मुलींसाठी टिप्स

१) तुमच्या बाळाची काळजी घेण्याचा प्रश्न येतो, तेव्हा इतरांवर विश्वास ठेवायला शिका. तुमच्या कामांचं वाटप महत्त्वाचं आहे. मग ते तुमचे पालक असोत, सासरची मंडळी असोत किंवा तुमचा पती. तुमच्या बाळाला घरी ठेवून घराबाहेर पडणं तुमच्यासाठी कठीण जाऊ शकतं; पण लक्षात ठेवा कोणालाही तुमच्या बाळाला मुद्दाम इजा पोचवायची नाहीये. कायम काळजी करत राहिल्याने तुम्ही केवळ उदास व्हाल. त्यामुळे काळजी करू नका आणि तुमच्या बाळाची काळजी घेणाऱ्या तुमच्या जवळच्या लोकांवर विश्वास ठेवा.

२) कामावर जाताना आपल्या बाळाला घरी ठेवल्याबद्दल मनामध्ये कॉम्प्लेक्स येऊ शकतात; पण ते दूर ठेवायला शिका.

३) नवीन दिनक्रम आणि जबाबदाऱ्यांसोबत तडजोड करताना चिंताग्रस्त वाटू शकतं, खासकरून जेव्हा एका बाळाची काळजी घेण्याची गोष्ट असते; पण शेवटी सगळं काही नीट होईल, हा विश्वास बाळगा. तुमचे कुटुंबीय, तुमचं बाळ आणि तुम्हाला या नवीन दिनक्रमाची सवय हळूहळू होईल. एक नवीन आई म्हणून आयुष्यातील नवीन गोष्टींची सवय होऊ देण्यासाठी वेळा द्या.

४) स्वतःवर विश्वास ठेवा. तुम्ही आई बनला आहात आणि तुम्ही एक चांगली आई बनाल.

५) तुम्ही आई बनण्याचं ठरवता, तेव्हा तुम्ही आणि तुमचा जोडीदार; तसंच तुमचा परिवार या सर्वांची त्यासाठी मानसिकरित्या तयारी असायला हवी. तुम्ही स्वतः या मोठ्या निर्णयासाठी शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या तयार असायला हवं. सुरळीत आणि निरोगी गर्भारपणासाठी आणि मातृत्वासाठी मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या तयार असणं अतिशय महत्त्वाचं आहे.

(शब्दांकन : अरुण सुर्वे)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोन जणांचा जीव घेऊनही आरोपी का सुटला? कायदा काय सांगतो? कायदेतज्ज्ञांनी सांगितल्या तरतुदी

Lok Sabha Election 2024 : दिव्यात निवडणूक आयोगाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर; मतदारांत तीव्र संताप

Nashik Lok Sabha: नाशिकमध्ये आमदार देवयानी फरांदे माजी आमदार वसंत गीतेंमध्ये वाद; बूथवर उडाला गोंधळ

IPL 2024: 'मला फक्त शेवटची संधी द्या...', RCB कडून खेळणाऱ्या स्वप्नील सिंगला व्यक्त होताना अश्रु अनावर

Pune Rain Updates : पुण्यात पावसाचा उद्रेक! कुठे झाडं कोसळली, कुठे पत्रे उडाले तर अनेक रस्त्यांवर पाणीच पाणी

SCROLL FOR NEXT