Hair Growth Oil  esakal
लाइफस्टाइल

Hair Growth Oil : कोणतंही तेल केमिकलशिवाय नसतंच, म्हणून घरीच बनवा हे तेल, केस गुढग्यापर्यंत लोळतील

आजकाल तणाव, केमिकलयुक्त तेल,शाम्पूचा वापर, हेअर ट्रिटमेंट यामुळे केसांना योग्य पोषण मिळत नाही

सकाळ डिजिटल टीम

Hair Growth Oil :  

लांब केसांची मुलगी पत्नी म्हणून मिळावी अशी प्रत्येकाचीच इच्छा असते. अन् मुलांना लांब केस आवडतात म्हणून स्वत:चे केस लांबसडक व्हावेत अशी मुलींची इच्छा असते. पण, काही कारणास्तव हे प्रत्येकीच्या बाबतीत खरे होत नाही.

आजकाल तणाव, लाइफस्टाईल, केमिकलयुक्त तेल,शाम्पूचा वापर, हेअर ट्रिटमेंट यामुळे केसांना योग्य पोषण मिळत नाही. त्यामुळे केस गळती होते. तसेच केसांची वाढही खुंटते.

केसांना लांबसडक आणि दाट बनवण्यासाठी केसांसाठी आपण दररोज अनेक उपचार घेत असतो. काही लोक डॉक्टरची औषधं घेतात. परंतु या सर्वांमध्ये वापरल्या जाणाऱ्या रसायनांमुळे केसांचे पोषण होण्याऐवजी त्यांचे सौंदर्य कमी होते.

केसांची काळजी घेण्यासाठी आपल्या घरातील काही पदार्थ आपली मदत करतात. आज आम्ही तुम्हाला केस लांब करण्यासाठी आजीने बनवलेला घरगुती उपाय सांगणार आहोत, ज्याने केसांचे प्रश्नही सुटतील आणि केसही भराभर वाढतील.

केस लांब करण्यासाठी आपल्याला कढीपत्ता, एक आवळा आणि मोहरीच्या तेलाची आवश्यकता आहे.

केस लांब वाढवण्यासाठी घरी तेल कसे बनवायचे

सर्व प्रथम एका भांड्यात केसांच्या लांबीनुसार मोहरीचे तेल घ्या. यानंतर १ आवळा चांगला बारीक करून त्यात मोहरीच्या तेलात मिसळा. हे दोन्ही चांगले मिसळा आणि हाताच्या बोटांच्या मदतीने टाळूपासून केसांच्या लांबीपर्यंत लावा. तुम्ही ते तुमच्या केसांवर रात्रभर ठेऊ शकता किंवा केस धुण्याच्या २ ते ३ तास ​​आधी हे तेल वापरू शकता.

शॅम्पू आणि कंडिशनरच्या मदतीने केसांमधून तेल काढा. हा उपाय तुम्ही आठवड्यातून दोनदा करून पाहू शकता.  त्याचा सतत वापर केल्याने तुमचे केस काही वेळात गुडघ्यापर्यंत लांबीचे होऊ शकतात.

केसांना कढीपत्ता लावल्यास काय होते?

  • कढीपत्ता नवीन केस वाढण्यास मदत करते.

  • केसांना चमक आणण्यासोबतच ते दाट होण्यासही मदत करते.

  • याशिवाय केसांचे संरक्षण होते

केसांना मोहरीचे तेल लावल्याने काय होते?

  • मोहरीचे तेल केसांसाठी नैसर्गिक कंडिशनरचे काम करते.

  • केसांचे पोषण करण्यास आणि कुरकुरीतपणा कमी करण्यास मदत करते.

  • हे नवीन केस वाढण्यास आणि योग्य पोषण प्रदान करण्यात मदत करते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'वारीत कोणी विशेष अजेंडा चालवण्यासाठी येत असतील, तर ते आम्ही खपवून घेणार नाही'; CM फडणवीसांचा कोणाला इशारा?

Ashadhi Ekadashi : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न; पंढरपुरात 20 लाखाहून अधिक भाविक दाखल

Ashadhi Ekadashi : विठ्ठलाच्या पूजेचा मान मिळालेले उगले दाम्पत्य कोण आहे? मुख्यमंत्र्यांसोबत मिळाला शासकीय महापूजेचा मान

Ashadhi Ekadashi : 'ज्ञानोबा माऊली'च्या गजरात CM देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर; पारंपरिक वेशात घेतला सहभाग

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : 'महाराष्ट्र चालवण्याची विठुरायाने शक्ती द्यावी', मुख्यमंत्री फडणवीसांनी पांडुरंगाला घातले साकडे

SCROLL FOR NEXT