14 फेब्रुवारी हा दिवस लव्ह बर्ड्ससाठी खासच आहे.आपल्या आयुष्यातील प्रिय व्यक्तीसमोर या दिवशी आपल्या मनातील प्रेमळ भावना व्यक्त केल्या जातात. व्हेलेंटाईन डे चा आनंद द्विगुणित करण्यासाठी या दिवशी खास गिफ्ट्स देखील दिली जातात. केवळ कपलच नव्हे तर हल्ली मित्रमैत्रिणी, कुटुंबातील सदस्य देखील व्हॅलेंटाईन डे साजरा करतात.
14 फेब्रुवारी ‘व्हॅलेंटाईन डे’ म्हणजेच प्रेमाचा दिवस आहे. या दिवशी तुम्ही Valentine’s Day Messages, WhatsApp Status पाठवून तुम्ही तुमच्या जोडीदारापर्यंत तुमच्या भावना पोहोचवून हा दिवस साजरा करू शकता.
1. रात्री चंद्र असा सजला होता,
ताऱ्यांनी चिंब भिजला होता,
बस्स, तुझ्या येण्याचा अवकाश
पाहुन तुला बिचाऱ्याचा चेहरा पडला होता!
2. प्रेम म्हणजे मनाला देणारा गारवा
प्रेम म्हणजे फक्त मी आणि तू,
प्रेमाच्या दिवशी एकच गोष्ट सांगावीशी वाटते
ती म्हणजे I Love You!!!
हॅप्पी व्हॅलेंनटाईन डे
3. हळुवार जपून ठेवलेले क्षण,
तेच माझ्या जगण्याची आस आहे,
एकेक साठवून ठेवलेली आठवण,
तिच माझ्यासाठी खास आहे….
4. प्रेम म्हणजे काय असते हे तुझ्या सहवासात कळाले
तू माझ्या आयुष्यात आल्याने स्वर्गसुख मिळाले
कधी सोडू नकोस साथ माझी
जन्मभर राहिन मी फक्त तुझी!!
हॅप्पी व्हॅलेंनटाईन डे
5. सगळ्यांपेक्षा वेगळी आणि सुदंर……….
तू नक्कीच आहेस….
पण………….
त्यापेक्षाही सुदंर
तुझं माझ्या आयुष्यात असणं आहे…….
6. तुझे माझे नाते असे असावे
जे शब्दांच्या पलीकडे एकमेकांस उमगावे
कितीही एकमेकांपासून दूर असलो तरी
मनाने कायम एकमेकांच्या जवळ असावे
Happy Valentine’s Day
7. ना मला तुला गमवायचं आहे,
ना तुझ्या आठवणीत रडत बसायचंय,
देशील का मला कायम साथ?
सांग ना मला तुझ्या मनातील बात
Happy Valentine Day
8. दिलेलं वचन पूर्ण करायचंय,
सुंदर गुलाब तुझ्यासाठी आणायचंय,
नात्यामध्ये आपल्या आहे किती प्रेम
हे तुला या क्षणाला सांगायचंय
हॅपी वॅलेंटाइन डे
9. तुला पाहता क्षणी भुललो तुझ्या प्रेमात,
गोडवा आणि प्रेम राहो आपल्या नात्यात,
मागशील ते ठेवेल तुझ्या पुढ्यात
होकार कळव मला या क्षणात
प्रेमाच्या दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा...
10. तु माझ्या आयुष्यातील मोलाचा क्षण,
प्रत्येक वेळी येते तुझी आठवण,
राहु दै सदैव असेच प्रेम तुझे माझ्यावर
अशीच साथ देऊया एकमेकांना आपण
हॅपी व्हॅलेंटाइन डे"
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.