लाइफस्टाइल

Grapes Vs Raisins : द्राक्षे की मनुके.. दोन्हीपैकी कोणते आहे आरोग्यासाठी अधिक फायदेशीर? जाणून घ्या

Aishwarya Musale

फळे आणि ड्राय फ्रूट्सचे सेवन आपल्या आरोग्यासाठी चांगले मानले जाते. आम्ही द्राक्षे आणि त्यापासून बनवलेल्या मनुका बद्दल बोलत आहोत. द्राक्षे हे असे फळ आहे ज्याची गोड आणि आंबट चव अनेकांना आकर्षित करते. द्राक्षे सुकवून मनुके तयार केल्या जातात जे अनेकांना आवडते. याचा उपयोग मिठाई आणि गोड पदार्थ बनवण्यासाठी केला जातो.

द्राक्षांमध्ये 80 टक्के पाणी असते तर मनुकामध्ये पाण्याचे प्रमाण केवळ 15 टक्के असते. आता प्रश्न असा पडतो की जेव्हा द्राक्षे आणि मनुके दोन्ही आरोग्यासाठी फायदेशीर असतात, तेव्हा कोणती गोष्ट जास्त आरोग्यदायी मानावी? या प्रश्नाचे उत्तर जाणून घेऊया.

मनुक्यामध्ये जास्त कॅलरीज असतात

मनुक्यामध्ये द्राक्षांपेक्षा जास्त कॅलरीज असतात. द्राक्षे सुकल्यानंतर मनुके तयार केले जातात. या प्रक्रियेत, साखर आणि अँटिऑक्सिडंट्स वापरली जातात. जर तुम्ही अर्धा कप द्राक्षे खाल्ले तर तुम्हाला फक्त 30 कॅलरीज मिळतील, तेवढेच मनुके खाल्ले तर तुमच्या शरीराला 250 कॅलरीज मिळतील.

मनुका खाण्याचे फायदे

मनुका हा फायबरचा समृद्ध स्रोत मानला जातो, याशिवाय या ड्रायफ्रूटमध्ये लोह आणि पोटॅशियम सारखी महत्त्वपूर्ण खनिजे आढळतात. मनुकामध्ये दाहक-विरोधी गुणधर्म देखील असतात जे आतड्यांतील बॅक्टेरिया संतुलित करण्यास मदत करतात.

द्राक्षे खाण्याचे फायदे

द्राक्षांमध्ये व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स आढळतात, हे दोन्ही पोषक आपल्या त्वचेच्या पेशी तरुण ठेवण्यास मदत करतात. तुम्ही द्राक्षे खाल्ल्यास चेहऱ्यावरील काळे डाग आणि सुरकुत्या कमी होऊ लागतात.

द्राक्षे की मनुके.. दोन्हीपैकी कोणते आहे आरोग्यासाठी अधिक फायदेशीर?

दोन्ही गोष्टी आरोग्यासाठी फायदेशीर आहेत, परंतु द्राक्षे अधिक आरोग्यदायी मानली जातात कारण ज्यामध्ये कमी कॅलरी असते ती आरोग्यासाठी चांगली असते. म्हणून, फळ त्याच्या मूळ स्वरूपात खाण्याचा प्रयत्न करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: राज ठाकरे चोरीच्या मालाचं चुंबन घेतात, ठाकरे गटाने असं का म्हटलं?

Aditya Dhar & Yami Gautam : अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर यामी-आदित्यला पुत्ररत्न; जाणून घ्या बाळाचं नाव आणि त्याचा अर्थ

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: महाराष्ट्रात मतदारांमध्ये अनुत्साह, अकरा वाजेपर्यंत अवघे 16 टक्के मतदान

Latest Marathi Live News Update: संसदेची सुरक्षा व्यवस्थेची जबाबदारी आजपासून CISF कडं!

Onion Garlands During Voting: गळ्यात टोमॅटो-कांद्याच्या माळा घालून मतदान; नाशिकमध्ये युवा मतदारांची चर्चा

SCROLL FOR NEXT