house on punjab haryana border
house on punjab haryana border  
लाइफस्टाइल

एकाच घरातील दोन दरवाजे उघडतात वेगवेगळ्या राज्यात

शर्वरी जोशी

गाव असो वा राज्य, प्रत्येकाची सीमा ठरलेली असते. सीमा बदलली की त्या राज्याची, गावाची एक नवी ओळख निर्माण होते. प्रत्येक राज्याची लोकसंख्या, राहणीमान, जीवनमानदेखील वेगवेगळं असतं. विशेष म्हणजे प्रत्येक राज्यामध्ये लोकसंख्या आणि घरांची नोंदणी केलेली असते. त्यानुसार, त्या राज्यांची जनगणना ठरलेली असते. परंतु, एकाच घराची नोंदणी दोन वेगवेगळ्या राज्यात झाल्याचं ऐकिवात आहे का? किंवा एकच घर दोन वेगवेगळ्या राज्यांमध्ये येतं असल्याचं तरी ऐकलं आहे का?अर्थात नाही. परंतु, खरच अशी एक घटना घडली आहे. भारतात असलेल्या एका घराचे दरवाजे चक्क दोन वेगवेगळ्या राज्यांमध्ये उघडतात.

सध्या सोशल मीडियावर पंजाब व हरियाणा या राज्यांच्या सीमेवर असलेल्या घराची चर्चा रंगली आहे. या घराचा एक दरवाजा पंजाबमध्ये उघडतो. तर, दुसरा दरवाजा हरियाणामध्ये उघडत असल्याचं समोर आलं आहे. विशेष म्हणजे खरं तर हा घोळ सरकारी कार्यालयांच्या विभागणीमुळे झाल्याचं वृत्त 'टाइम्स ऑफ इंडिया'ने दिलं आहे.

पंजाब-हरियाणा सीमेवर राहणाऱ्या जगवंती देवी (७०) या त्यांच्या कुटुंबासोबत धर्मशाळेजवळ राहत असून त्यांच्या घराचा एक दरवाजा पंजाबमध्ये तर दुसरा हरियाणामध्ये उघडतो. विशेष म्हणजे वीज जोडणीच्या नादात त्यांचं घर विभागलं गेल्याचं सांगण्यात येत आहे.

नेमकं काय आहे प्रकरण?

जगवंती देवी यांनी काही दिवसांपूर्वीच त्यांच्या घराचं बांधकाम केलं. यात घराचा विस्तार केल्यामुळे त्यांच्या घराचा अर्धाभाग हरियाणा राज्याच्या सीमेमध्ये गेला. त्यातच त्यांनी वीज जोडणीसाठी काही महिन्यांपूर्वी अर्ज केला होता. मात्र, जमिनीची नोंदणी उर्दूत भाषेत असल्यामुळे त्यावर आक्षेप घेण्यात आला. त्यानंतर पुन्हा ही नोंदणी पंजाबी भाषेत करण्यात आला. विशेष म्हणजे या प्रकारानंतर ही नोंदणी पुन्हा एकदा इंग्रजी भाषेत करण्यात आली. मात्र, तरीदेखील त्यांच्या घराला वीज जोडणी देण्यास वीज महामंडळाने आक्षेप घेतला. इतकंच नाही तर, हे घर दोन राज्यांच्या सीमेवर असल्यामुळे घरात आणखी एक नवी भिंत घालावी लागेल असं सांगण्यात आलं. तसंच जोपर्यंत घरात नवी भिंत उभारली जात नाही. तोपर्यंत वीज जोडणी मिळणार नाही असंही वीज महामंडळाकडून सांगण्यात आलं.

दरम्यान, नाइलाजाने वीजेचासाठी जगवंती बाई यांना घरात एक नवी भिंत उभारावी लागली. त्यानंतर या घरात वीज देण्यात आली. तसंच घरात नवी भिंत उभारली असली तरीदेखील त्या भिंतीवर एक लहान खिडकी तयार केली आहे. या खिडकीमधून घरातील सदस्य एकमेकांशी संवाद साधत असतात. सध्या पाहायला गेलं. तर पंजाबमधून हरियाणा राज्य वेगळं झालं आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Live Update: पुण्यात 1500 अनाधिकृत होर्डिंग्जवर कारवाईचे आदेश

हवेत उडायचा अन् हवेतच डल्ला मारायचा...110 दिवसात 200 विमानात चोरले मौल्यवान दागिने,  अशी झाली अटक

Virat Kohli & Anushka Sharma: विरुष्काच्या कृतीने भारावले पापाराझी ; जोडीकडून मिळालेल्या सरप्राईज गिफ्टचं होतंय कौतुक...

व्हॅक्सिंगनंतर त्वचा कोरडी पडलीय? करू नका दुर्लक्ष, अशी घ्या काळजी

PM Modi in Nashik : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेसाठी प्रशासन ‘अलर्ट’! एक हजाराहुन अधिक पोलिसांचा बंदोबस्त

SCROLL FOR NEXT