लाइफस्टाइल

Damaged Hair Treatment : तुमचेही केस डॅमेज झाले आहेत? मग ‘हे’ तेल वापरुन बघा, लवकरच दिसेल फरक

Aishwarya Musale

वाढते प्रदूषण आणि बदलती जीवनशैली यामुळे आपण आपल्या केसांची योग्य काळजी घेऊ शकत नाही. यामुळे केसांची वाढ तर थांबतेच पण केसांना योग्य पोषणही मिळत नाही. यासाठी तुम्ही हेअर केअर रूटीन फॉलो केली पाहिजे.

केसांना योग्य प्रमाणात पोषण मिळण्यासाठी घरगुती वस्तूंचा वापर करावा. म्हणून, आज आम्ही तुम्हाला घरी उपलब्ध असलेल्या वस्तूंपासून बनवलेल्या तेलाबद्दल सांगणार आहोत जे तुमच्या खराब झालेल्या केसांना योग्य प्रमाणात पोषण देण्यास मदत करेल. याशिवाय, हे केसांना अनेक प्रकारे मजबूत करण्यासाठी देखील उपयुक्त ठरेल.

खराब झालेल्या केसांवर कोणत्या गोष्टींचा वापर करावा?

  • कांद्याचा रस

  • कढीपत्ता

  • खोबरेल तेल

केसांना कांद्याचा रस लावल्याने कोणते फायदे होतात?

  • कांद्याच्या रसामध्ये मुबलक प्रमाणात सल्फर असते, जे केस चमकदार आणि दाट होण्यास मदत करते.

  • त्यात सल्फर असल्यामुळे ते केस पातळ होण्यापासून रोखते.

  • कांद्यामध्ये असलेले अँटिऑक्सिडंट घटक केसांना आर्द्रता प्रदान करण्यास मदत करतात.

केसांना खोबरेल तेल लावल्यास काय होते?

  • खोबरेल तेलामध्ये असलेले अँटी-फंगल तत्व केसांना कोंड्याच्या समस्येपासून वाचवते.

  • यात अँटिऑक्सिडेंट गुणधर्म आहेत जे केसांना मॉइश्चरायझिंग करण्यासाठी खूप फायदेशीर ठरतात.

  • केसांची चमक टिकवून ठेवण्यास मदत होते.

खराब झालेल्या केसांची काळजी घेण्यासाठी काय करावे?

  • सर्व प्रथम, केसांच्या लांबीनुसार पॅनमध्ये खोबरेल तेल टाका आणि मंद आचेवर गरम करण्यासाठी ठेवा.

  • त्यात कांद्याचा रस आणि 1 कढीपत्ता घाला.

  • 2 ते 5 मिनिटे मंद आचेवर शिजू द्या आणि गॅस बंद करा आणि थंड होण्यासाठी ठेवा.

  • ते थंड झाल्यावर, तुम्ही आंघोळीच्या फक्त 3 तास आधी किंवा केस धुण्याच्या एक रात्री आधी केसांना लावू शकता.

  • हे तेल तुम्ही आठवड्यातून 1 ते 2 वेळा लावू शकता.

  • हा उपाय सतत करून पाहिल्यास तुम्हाला काही दिवसातच परिणाम दिसू लागतील.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'शरद पवारांनी भाजपला पाठिंबा दिला होता, ती जर सुपारी होती तर आमचीही..'; आव्हाड, राऊतांच्या टीकेला मनसे आमदाराचं प्रत्युत्तर

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE : Lok Sabha Election 2024 : जाणून घ्या 6 वाजेपर्यंत महाराष्ट्रातील मतदानाची टक्केवारी

Lok Sabha Election 2024 : मतदान केंद्रावरील निवडणूक आयोगाने दिलेल्या सुविधांचा मतदारांना दिलासा

Latest Marathi Live News Update : कंगना रणौत यांच्या रॅलीवर दगडफेक; काँग्रेसविरोधात निवडणूक आयोगाकडे भाजपची तक्रार

Devendra Fadanvis: 'उद्धव ठाकरेंचं रडगाणं सुरू, पराभव समोर दिसू लागल्यानेच त्यांची मोदींवर टीका'; देवेंद्र फडणवीसांचा आरोप

SCROLL FOR NEXT