Kiss Day 2024
Kiss Day 2024 esakal
लाइफस्टाइल

Kiss Day 2024 :  जगातला पहिला Kiss कोणी घेतला होता?

सकाळ डिजिटल टीम

ओठांवरील चुंबन हे प्रेमाचे प्रतीक बनले. चुंबनातही फ्रेंच किस प्रसिद्ध आहे. त्यामूळे किसिंगची सुरूवात त्यांच्यापासूनच झाली की काय? असे वाटणे साहजिक आहे. पण,तसे नाही. काही संशोधकांचे असेही म्हणणे आहे की, चुंबन भारतातून सुरू झाले आणि विदेशी आक्रमनांनंतर ते जगभर पसरले, असेही तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

कधी एखाद्या स्टेजवर अभिनेत्रीचे चुंबन घेण्यात आल्याने तर कधी ऑन स्क्रीन केलेल्या किसिंग सीनमुळे ते नेहमीच चर्चेत राहिले आहे. याच किसची सुरूवात कधीपासून झाली याबद्दल मानववंशशास्त्रज्ञ वेगवेगळे सिद्धांत देतात. कदाचित जगातील पहिले चुंबन अपघातानेच झाले असावे, असा अंदाज वर्तविला जातो.

पण, सत्य असे आहे की, किसिंगची सुरूवात ही प्रेमाच्या नव्हे तर मायेच्या भावनेने झाली आहे. त्याच झालं असं की, आपल्या पुर्वजांनी म्हणजे माकडांनी याची सुरूवात केली. जेव्हा एक आई लहान माकडाला खायला घालायची. तेव्हा बाळाला खाऊ भरवण्याची पद्धतही वेगळी होती. त्यावेळी आई आधि स्वत: अन्न तोंडात घ्यायची आणि चावून अगदी बारीक करून ते अन्न तोंडानेच बाळाच्या तोंडात द्यायची.

याला ‘प्रीमॅस्टिकेशन फूड ट्रान्सफर’ असेही म्हणतात. आजही अनेक प्राणी बालकाला अशाच पद्धतीने खायला भरवतात. त्यातूनच किस करण्याची सुरूनात अश्मयुगीन काळात झाली असावी, असे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे.केवळ खाद्य भरवतानाच नव्हे तर इतरवेळीही चिंपांझी माता आपल्या मुलांचे चुंबन घेतात. त्यामुळे चुंबन घेण्याचा व्यवहार आपण आपल्या पूर्वजांकडून शिकलो असण्याची शक्यता आहे.

आणखी एक सिद्धांत देखील आहे, ज्यानुसार चुंबनाची सुरूवात अपघातामुळे झाली असल्याचे होते. टेक्सास ए अँड एम युनिव्हर्सिटीच्या मानव वंशशास्त्र विभागाने यावर मोठा अभ्यास केला आणि असा दावा केला की, पुर्वीच्या काळात भेटल्यानंतर एकमेकांच्या शरिराचा वास घेतला जायचा. ते लोक तसे का करायचे याला काही शास्त्रिय कारण नाही. मात्र, असे एकमेकांचा वास घेत असतानाच अपघाताने ओठांना ओठांचा स्पर्श झाला असेल आणि मनुष्य जातीत चुंबनन घेण्याती प्रथा सुरू झाली असावी असा दावा करण्यात आला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT