Navratri 2023  esakal
लाइफस्टाइल

Navratri 2023 : आई अंबाबाईची आज महिषासुरमर्दिनी रूपातील पूजा, वाचा या रूपाची कथा

दुर्गेचे हे रूप महिषासुराचा वध करण्यासाठीच निर्मित झाले आहे

Pooja Karande-Kadam

Navratri 2023 : नवरात्रीच्या आठव्या दिवशी आज करवीर निवासिनी आई अंबाबाईची महिषासुरमर्दिनी रूपातील पूजा बांधण्यात आली. या रूपामध्ये अनेकभुजाधारी आई जगदंबा महिषासुराच्या छातीत त्रिशुळ मारून त्याचा वध करते अशी पूजा दाखवण्यात आली आहे.

दुर्गेचे हे रूप महिषासुराचा वध करण्यासाठीच निर्मित झाले आहे. त्यामागील कथा अशी की, महिषासूर हा एक असूर होता. हा मदोन्मत्त, उर्मट, उद्धट व कामांध होता. त्याच्या वडिलांचे नांव रंभ असे होते. रंभ हे सप्तर्षी मधील एक ऋषी कश्यप यांचा मुलगा होते. ते असुरांचे राजा होते.

त्यांनी पाण्यात राहणाऱ्या म्हशीवर प्रेम केले आणि त्यातून महिषासुराची उत्पत्ती झाली असे म्हणतात. त्यामुळे महिषासूर हा हवे तेंव्हा म्हैस अथवा मानवाचे रूप घेऊ शकत असे. संस्कृत शब्द महिष याचा अर्थ म्हैस असा होतो.

महिषासुराने ब्रह्मदेवाची आराधना केली. ब्रम्हदेवाची भक्ती केली व त्यांच्याकडून वर मागितला की कोणीही देव अथवा दानव त्याला मारू शकणार नाही. पण ब्रह्मदेवाने ते नाकारले मग उन्मत्त महिषाने असा वर मागितला की त्याचा वध फक्त एका दैवी शक्ती असलेल्या एका स्त्री च्या हातून होईल जिला चार पेक्षा जास्त हात असतील.

आई अंबाबाईची आज महिषासुरमर्दिनी रूपातील पूजा

ब्रह्मदेवाने त्याला वर दिला. या वरामुळे तो उन्मत्त झाला व देवांना त्रास देऊ लागला. त्याने इंद्रपद बळकावले. शेवटी ब्रम्ह ,विष्णू,महेश यांनी एका शक्तीची उपासना केली. तेव्हा यज्ञ कुंडातून एक कुमारिका वयातील शक्तीची निर्मिती झाली.

या शक्तीला सर्व देवांनी एक एक शस्त्र दिले असता त्या दैवी शक्तीला अठरा हात तयार झाले प्रत्येक हातात शस्त्र घेऊन देवांनी दुर्गेची निर्मिती केली जे पार्वतीचे एक रूप समजले जाते.

महिषासुरापाशी मोठे सैन्य होते व त्याने देवीशी युद्ध करण्यापूर्वी आपले चिक्षुर, बाष्कल व चामर हे सेनापती देवीशी युद्ध करण्यास पाठविले. त्यात या सर्वांचा देवीने पराभव व वध केला. त्यानंतर, महिषासुराने अनेकानेक रूपे धारण करून देवीशी महायुद्ध आरंभले.

सह्याद्री पर्वतरांगेत सात शिखरावर देवीने युद्ध केले हे युद्ध नऊ दिवस चालले. देवी ने महिषासुराचा त्रिशुळाने शिरच्छेद करून देवीने "महिषासुरमर्दिनी" नाव धारण केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharia law : 'सत्तेत आल्यास देशात शरिया कायदा लागू करणार, हिंदूंसह मुस्लिमांना देणार अधिकार'; फैजुल करीम यांचं वादग्रस्त विधान

Shaktipeeth Highway : सतेज पाटील, राजू शेट्टींचे ‘शक्तिपीठ’विरोधात विठ्ठलाला साकडे

Ashadhi Wari 2025 : पुण्याहून पंढरपूरसाठी ३२५ अतिरिक्त बस, गाड्या शनिवारी, रविवारी धावणार; नियंत्रण कक्ष स्थापन

Maharashtra Education : विधान परिषदेत शिपायाच्या कंत्राटी पदावरून पेच; सत्ताधारी शिक्षक, पदवीधर आमदारांनीच केला सभात्याग

Ashadhi Ekadashi 2025: मुखात तुझे नाव, डोळ्यात तुझे गाव;डिगडोहमध्ये ‘विठ्ठल रखुमाईचा दर्शन सोहळा, माऊली ग्रुपचा उपक्रम

SCROLL FOR NEXT