एक काळ असा होता की प्रवासादरम्यान टायर पंक्चर झाल्यानंतर गाडी एकाच ठिकाणी ठेवावी लागत होती. टायर काढून तो पंक्चर
काढणाऱ्याकडे न्यावा लागत होता. यात सुधारणा होऊन ट्युबलेस टायर आले आणि टायर पंक्चर झाला, तरी गाडी एकाच ठिकाणी अडकून न राहता ती किमान पंक्चर काढणाऱ्यापर्यंत सहज नेता येऊ लागली. काही खासगी कंपन्यांनी पंक्चरवर उपाय म्हणून ‘सीलंट’ हा द्रव पदार्थ बाजारात आणला. ज्याद्वारे वॉल्व्हमधून तो टायरमध्ये टाकल्यानंतर टायरमध्ये खिळा गेला तरी त्यातून हवा जात नाही. परंतु याचे अनेक दुष्परिणाम समोर आले.
भारतातील टायर उत्पादक कंपनी ‘सीएट’ने या सर्वांवर मात करत थेट पंक्चरपासून सुरक्षा देणारा टायरच बाजारात आणून उरल्या सुरल्या त्रासातूनही सुटका केली. यात कंपनीने स्वत: विकसित केलेल्या ‘सीलंट’चा वापर केला असून, ते पंक्चर सील करते. सीलंटमुळे टायरला खिळ्याने पडलेले २.५ मिलिमीटर व्यासापर्यंतचे छीद्रही सील केले जाते. या टायरमुळे संभाव्य अपघात टाळता येणार आहेत.
सध्या ११ विविध आकारांमध्ये हा टायर उपलब्ध आहे. पंक्चर सेफ टायरचा सुरुवातीला दक्षिणेकडील राज्यांमध्ये वापर झाला. आता महाराष्ट्रातही हा टायर उपलब्ध झाला आहे. हा टायर पंक्चर झाल्यास त्यामध्ये वापरलेल्या तंत्रज्ञानामुळे टायरमधील हवेचा दाब कमी होणार नाही. परिणामी अडथळामुक्त आणि सुरक्षित प्रवास करणे शक्य होणार आहे.
आपल्याकडे कितीही आधुनिक, विविध फीचर्सचे महागडे वाहन असले तरी त्याचे टायर पंक्चर झाल्यास या सर्व बाबी बाद ठरतात. एमआरएफ, जे. के., अपोलो, ब्रीजस्टोन, सीएट यांसारख्या आघाडीच्या टायर कंपन्यांनी आपापल्या उत्पादनांनी भारतातील ठरावीक ग्राहकवर्ग जोडून ठेवला आहे. त्यातही ‘सीएट’ने दुचाकी ग्राहकांच्या गरजा ओळखून थेट पंक्चरपासून सुरक्षा देणारा ‘पंक्चर सेफ’ टायर बाजारात आणला आहे. या टायरमध्ये पंक्चरपासून सुरक्षा देणाऱ्या नेमक्या काय बाबी आहेत, याचा आढावा...
सीलंट म्हणजे नेमके काय?
१) टायर ‘सीलंट’ हा एक जेलसारखा पदार्थ आहे, जो टायरला पंचरमुक्त टायरमध्ये रूपांतरित करतो. सीलंटचा वापर बहुतांश ट्युबलेस टायरमध्ये केला जातो. हे एक पॉलिमर आधारित जेल असल्यामुळे सुकत किंवा गोठत नाही.
२) वाहन सुरू असताना टायरच्या पंक्चर झाल्यास सीलंट तत्काळ आणि कायमस्वरूपी पंक्चर सील करते. यामध्ये टायर थंड ठेवण्याचा गुणधर्म असल्यामुळे ते गरम होऊन फुटण्यापासून बचाव होतो. टायरमधील हवा योग्य प्रमाणात राहण्यासही मदत होते.
३) टायरमधील हवा योग्य प्रमाणात राहिल्याने वाहनाच्या गिअर, तसेच इंजिनवर ताण येत नाही. शिवाय वाहनाचा वेग आणि मायलेजवरही परिणाम होत नाही. सीलंटमुळे पंक्चरचा अनावश्यक खर्च टळतो.
हवा जाणे थांबते...
सीएटने स्वत: तयार केलेल्या ‘सीलंट’चा वापर या ट्युबलेस टायरमध्ये केला आहे. टायरच्या घर्षण होणाऱ्या भागात आतील बाजूनेच त्याचे आवरण दिले आहे. सामान्यत: टायर एखाद्या खिळ्यावरून गेल्यानंतर हवा जाण्याची प्रक्रिया सुरू होते. परंतु या पंक्चर सेफ टायरमध्ये खिळा आत शिरताच सीलंट खिळ्याला पूर्णत: घेरते आणि खिळा बाहेर काढल्यानंतर आपोआप पंक्चरही भरून काढते. परिणामी टायरमधून हवा जाण्याचा धोका टळतो.
या गोष्टी लक्षात ठेवा
पंक्चर सेफ टायर बसवल्यानंतर बहुतांश वाहन चालक निश्चिंत होतात. परंतु, या टायरचीही काळजी घेणे आवश्यक आहे. टायरमध्ये निर्देशित केल्याप्रमाणे हवा ठेवावी, महिन्यातून एकदा तरी ती तपासावी, क्षमतेपेक्षा अधिक वजनाची वाहतूक करू नये, टायरची अती झिज किंवा हवा कमी असल्यास चालवू नये, आठवड्यातून एकदा टायरची पाहणी करावी, खिळा काढल्यानंतर टायरमधून सीलंट बाहेर आल्यास पुन्हा तो खिळा टायरमध्ये पंक्चरच्या जागी घुसवावा आणि एक मिनिटानंतर तो काढावा, त्यामुळे पंक्चर आपोआप काढला जाईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.