SUV Car
SUV Car Sakal
लाइफस्टाइल

झूम : भारतीय बाजारात एसयूव्हींचे पर्व

प्रणीत पवार

भारतीय ग्राहक हा ‘जेवढी मोठी कार, तेवढी बरी,’ या मानसिकतेचा आहे. त्या दृष्टीने गेल्या वर्षी सेदान व हॅचबॅक या वाहनांची मिळून जेवढी विक्री झाली, त्यापेक्षा अधिक विक्री ‘एसयूव्ही’ कारची झाली.

भारतीय ग्राहक हा ‘जेवढी मोठी कार, तेवढी बरी,’ या मानसिकतेचा आहे. त्या दृष्टीने गेल्या वर्षी सेदान व हॅचबॅक या वाहनांची मिळून जेवढी विक्री झाली, त्यापेक्षा अधिक विक्री ‘एसयूव्ही’ कारची झाली. सध्याची स्पर्धा एवढी वाढीस लागले, की दर तिमाहीत दोन नवीन एसयूव्ही गाड्या बाजारात सादर होत आहेत. या ‘मस्क्युलर’ स्वरुपाच्या कारमध्येच भारतीय वाहन बाजाराचे आकर्षण दडले आहे. दणकट डिझाइन, विलक्षण शक्ती, प्रशस्त जागा आणि आलिशानपणा या सर्व गोष्टी एकाच पॅकेजमध्ये मिळतात.

१) डिझाईन

‘डिझाईन’ हे एसयूव्ही लोकप्रिय होण्याचे एक प्राथमिक कारण आहे. ‘रूफरेल्स’ आणि ‘क्लॅडिंग’ यांसारख्या गोष्टींमुळे या गाडीच्या रंगरुपात फरक पडतो. मोठे टायर, आकर्षक फ्रंट ग्रील, अधिक उंची आणि मोठा व्हीलबेस आणि एकूणच अशा वाहनाची रस्त्यावरील कामगिरी, या सर्व गोष्टी ‘एसयूव्ही’ला अधिक रुबाबदार बनवतात. अनेक वाहन उत्पादक ‘मस्क्युलर डिझाईन स्टेटमेंट’ घेऊन येत आहेत. या डिझाईनमुळे कारचे रस्त्यावरील अस्तित्व ठळकपणे जाणवते. ‘एसयूव्ही’चे डिझाईन असलेल्या लहान कार तथा ‘कॉम्पॅक्ट एसयूव्ही’ देखील बाजारात आल्या आहेत.

२) ताकद

‘लॅम्बोर्गिनी’ आणि ‘फेरारी’सारख्या लक्झरी कार उत्पादकांनीही स्पोर्ट्स कार बनविण्याच्या गेल्या अनेक दशकांच्या धोरणानंतर आता आपली पहिली एसयूव्ही सादर केली. त्यामुळे आता ‘फास्ट कार्स’पेक्षाही सर्वगुणसंपन्न कार्सना अधिक महत्त्व मिळू लागले आहे. या प्रकारच्या कारसाठी ताकद हा आणखी मोठा गुण ठरतो. या कारमध्ये जास्त जागा उपलब्ध असल्याने, मोठ्या क्षमतेचे इंजिन व इतर चल स्वरुपाचे भाग त्यात बसविणे उत्पादकांना सोपे जाते. मोठी ‘फ्लोअर बेड’ उपलब्ध असल्याने एसयूव्हीमध्ये मोठ्या क्षमतेची बॅटरीदेखील बसू शकते. छोट्या कार्समध्ये हे शक्य होत नाही.

३) प्रशस्तपणा

कोणत्याही साध्या ‘एसयूव्ही’मध्ये किमान पाच प्रवासी आरामात बसू शकतात, तर मोठ्या ‘एसयूव्ही’मध्ये आठपर्यंत प्रवासी सहज सामावले जातात. अशा कारमधून कुटुंबासह लांबच्या सहलींचा आनंद घेता येतो, कॅम्पिंगसाठी जाता येते. उच्च-कार्यक्षमता असलेल्या ‘सस्पेन्शन सिस्टीम’सह वातानुकूलन यंत्रणा, मोठे टायर आणि चाकांच्या कमानी आदी वैशिष्ट्यांमुळे एसयूव्ही खडबडीत रस्त्यांवरून देखील आरामात जाते. तीव्र वळणांवर ती रस्ता सोडत नाही आणि त्यामुळे तिच्याद्वारे प्रत्येक प्रवास हा सुरक्षित व आत्मविश्वासपूर्ण ठरतो.

४) लक्झरियस इंटेरियर

‘एसयूव्हीं’मध्ये आतील जागा आणखी मोठी असल्याचा आभास निर्माण करता येतो. अधिक आरामदायी आसन, भोवतालची प्रकाश व्यवस्था, स्टिरिओ थ्री-डी साऊंड सिस्टम, स्पोर्टियर फ्लॅट-बॉटम स्टिअरिंग व्हील, लेग स्पेस यांसह सर्व प्रकारच्या लक्झरी सुविधा या कारमध्ये मिळू शकतात.

५) ‘इलेक्ट्रिक’ एसयूव्ही

काही कंपन्या ‘इलेक्ट्रिक’ एसयूव्हीही बाजारात आणत आहेत. ‘इलेक्ट्रिक पॉवरट्रेन’मुळे प्रवास खर्च कमी होतो. वरील वैशिष्ट्यांची भर पडत असल्याने इलेक्ट्रिक वाहनाचा पर्यायही अधिक फायदेशीर ठरू शकतो.

लोकप्रिय एसयूव्हींची विक्री

कार २०२० २०२१

क्रेटा ९६,९८९ १,१५,०००

ब्रिझा ८३,६६६ १,१५,९६२

नेक्सॉन ४८,८४१ १,०८,५७७

व्हेन्यू ८२,४२८ १,०८,००७

सेल्टॉस ९६,९३२ ९८, १४७

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: चाकण-शिक्रापूर मार्गावर गॅस टँकरचा भीषण स्फोट! परिसर हादरला; घरांची मोठी पडझड, पाहा व्हिडीओ

पुण्यासह पाच रेल्वे स्टेशन बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणाऱ्याला बेड्या

Virat Kohli : इम्पॅक्ट खेळाडूच्या नियमावर विराटचीही टीका;सामन्याचा समतोल बिघडत असल्याचे व्यक्त केले मत

VIDEO: आरसीबी प्लेऑफमध्ये जाताच विरुष्काचं भन्नाट सेलिब्रेशन; व्हिडीओनं वेधलं साऱ्यांचे लक्ष

शेतीवर कर्ज घेणारा शेतकरी झाला अब्जाधीश! खात्यात आले ९९ अब्ज रूपये, रक्कम पाहून बँकेसह खातेधारकाला बसला धक्का

SCROLL FOR NEXT