White Colour Dress
White Colour Dress Sakal
लाइफस्टाइल

पांढरा रंग : प्रसन्न, हवाहवासा

सकाळ वृत्तसेवा

- पृथा वीर

अद्याप फेब्रुवारी सुरू असला तरी दिवसा उन्हाने जीवाची काहिली होते. कितीही टाळले, तरीही कडक उन्हात जावे लागते. अशा तप्त वातावरणात स्वतःला प्रेझेंटेबल ठेवताना समोर येतो तो पांढरा रंग. भर उन्हात डोळे शांत करणारा, मन प्रसन्न करणारा पांढरा रंग हवाहवासा वाटतो. या दिवसांत पांढऱ्या रंगाचे कपडे आरामदायी वाटतात. या काळात पांढऱ्या रंगाचे कपडे ‘वॉर्डरोब’मध्ये असायलाच हवेत. वेगवेगळ्या फॅशन स्टाइलचा अचूक वापर करून पांढऱ्या रंगामध्येही प्रेझेंटेबल राहू शकता.

पांढरा रंग म्हणजे शुभ्रता. हा रंग कोणत्याही प्रसंगास साजेसा ठरतो. हा रंग कधीही आउटडेटेड होत नाही. शांत प्रवृत्तीचे द्योतक असणारा हा रंग लक्ष वेधतो. पांढरा रंग कमालीचा साधा आहे आणि त्याच्यामुळे व्यक्तिमत्त्वाची छाप पडते. उन्हाळ्यात तर या रंगाचे महत्त्व अजूनच स्पष्ट होते. म्हणूनच उन्हाळ्यात पांढऱ्या रंगाचे ड्रेस, साड्या लक्ष वेधून घेतात.

यंदा तर उन्हाळा लागण्यापूर्वीच पांढऱ्या रंगाला मागणी वाढू लागली. मार्केटमध्ये पांढऱ्या रंगाचे कॉटन कुर्ते, ड्रेस, कॉटन साड्यांना हळूहळू मागणी सुरू झाली. फॅन्सी साड्यांऐवजी कॉटन साड्यांचा ट्रेंड सुरू झाला. या साड्यांवरचे फोटोशूट वाढले. नीट न्याहाळले, तर लक्षात येईल, की पांढरा रंग कमालीचा खुलतो. सूर्याचे प्रतीक म्हणून ‘मंडे कलर’ अशी ओळख असलेला पांढरा रंग म्हणजे बिनचूकपणा, नीटनीटकेपणा.

नव्या गोष्टींची सुरुवातही पांढरा रंगच करतो. आपल्या आजूबाजूला पांढऱ्या कपड्यांत वावरणारी माणसे असली, की सगळे कसे फ्रेश फ्रेश वाटते. या रंगाला ‘मिस्टर कूल’ रंग अशीही उपाधी आहे. म्हणूनच उन्हाळ्यातही फॅशन बाबतीत चोखंदळपणा कायम ठेवायचा असेल तर पांढऱ्या रंग सर्वोत्तमच.

सध्या पांढऱ्या रंगाच्या चिकन कुर्त्यांची चलती आहे. यामध्ये कशिदाकारी, पायपीन यांचा इतक्या खुबीने वापर केला आहे, की हे कुर्ते अजूनच उठावदार होतात. घामाचा प्रतिकार करण्याकरता कॉटन कुर्त्यांना पर्याय नाही. थ्री-फोर्थ स्लीव्ह्ज आणि विरुद्ध रंगसंगती असलेल्या ‘पोतली’ या टॉपला खूप रीचनेस आणतात. बटणांसारखेच भासणारे; पण कापडांचे पोतली टॉपही सध्या ट्रेंडमध्ये आहेत.

यामध्ये गुलाबी, हिरवा, पिवळा अशा पायपीनही असल्याने रंगातही चॉईस येतोच. साधा ॲपल कट आणि स्टँड कॉलर नेक लक्ष वेधतो. या टॉपवर कोणत्याही रंगाचा पटियाला पॅर्टनही उठून ‌दिसतो. त्यामुळे मुलींनाही हा साधेपणा भावतो आहे.कॉटन विथ प्रिंट या समोरून कट असलेल्या टॉपची फॅशन अधूनमधून डोकावते. अलीकडे पुन्हा हा ट्रेंड पाहायला मिळतो. प्रिंटच्या टॉपमध्ये समोरून कट छान दिसतो. कुर्त्यांमध्ये काश्मिरी ‘अरिवर्क’ बघायला मिळते.

पांढऱ्या रंगाची वैशिष्ट्ये

पांढरा रंग म्हणजे शीतलता, प्रसन्नता आणि निर्मळता. हा रंग परिधान केला, की आपोआपच मनाला शांत वाटते. पांढरा रंग ग्रेसफुल वाटतो. या रंगाचे वैशिष्ट्य म्हणजे सगळे रंग एकत्र केल्यावर पांढरा रंग तयार होतो. पांढरा रंग निरागसता आणि स्वच्छतेचे प्रतीक आहे.

वैविध्यपूर्ण फॅशन ट्रेंड्स

पांढऱ्या रंगाचे ए लाइन कुर्ता, कमी घेर असलेल्या अनारकली कुर्त्यावर बांधणीची ओढणी, केशरी, गुलाबी, निळ्या रंगाची ओढणी खूप छान दिसते.

डेनिम जीन्स, चायनीज कॉलर असलेला पांढरा कुर्ता छान दिसतो. पांढरा ड्रेस फंक्शनल ड्रेस म्हणूनही छान दिसतो. यासोबत चांदीचे दागिने किंवा ऑक्सिडाइज्ड ज्वेलरी खूप ॲन्टिक दिसते. वेस्टर्न लूक हवा असेल, तर ‘फ्लोअर लेन्थ फीट ड्रेस’ आणि कंबरेला बेल्ट ट्राय करता येईल. या ड्रेसवर कमीत कमी ॲक्सेसरीज आणि कमीत कमी मेकअप हवा. ट्रेंडी स्टाईल हवी असेल, तर मोठ्या आकाराचा डेनिम शर्ट किंवा जॅकेटदेखील घालू शकता. स्पोर्ट्‌स शूजसह हा आऊटफिट स्टाइल करता येतो.

स्मार्ट आणि फ्रेश लूक

पांढरा रंग उन्हाची तीव्रता कमी करण्यास तर मदत करतोच; पण स्मार्ट आणि फ्रेश लूकदेखील देतो. हा रंग पारंपरिक आणि पाश्चिमात्य अशा दोन्ही प्रकारच्या पोशाखांसोबत चांगला दिसतो. मग पांढरा जंपसूट, पांढरा टीशर्ट, पांढरा पंजाबी ड्रेस किंवा बेसिक चिकनकारी कुर्ता असू द्या. प्रसंग आणि आवश्यकता बघून उन्हाळ्यात यांपैकी काहीही ट्राय करता येऊ शकते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: डोंबिवलीत ईव्हीएम मशीन पडले बंद

IPL 2024 Playoffs : प्लेऑफसाठी नाही कोणत्या राखीव दिवस; पावसामुळे खेळखंडोबा झाला तर कसा लागणार निकाल?

आठवेळा मतदान करणारा अल्पवयीन तरुण ताब्यात, पुन्हा होणार मतदान; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई

Shantigiri Maharaj Nashik Lok Sabha: शांतिगिरी महाराजांच्या अडचणी वाढणार? EVM मशीनला घातला हार 

Hapus Season : कोकण हापूसचा हंगाम अंतिम टप्प्यात;उष्ण हवामानामुळे आवक घटली, हंगाम १५ दिवस आधीच संपणार

SCROLL FOR NEXT