‘क्वालिटी टाइम’ जास्त महत्त्वाचा sakal
लाइफस्टाइल

‘क्वालिटी टाइम’ जास्त महत्त्वाचा

माझं लग्न झालं आणि मी ठरवलं की, मला माझ्या फॅमिलीला पूर्ण वेळ द्यायचा आहे. त्यामुळे मी करिअरकडे एवढं लक्ष नाही दिलं. लग्नानंतर एका वर्षातच मला अलिशा झाली. तेव्हा मी कोणतंही काम करत नव्हते; कारण मी ठरवलं होतं, की सगळा वेळ मी माझ्या होणाऱ्या बाळाला देणार आहे. कोणत्याही क्षेत्रात तुम्ही काम करत असाल, त्या क्षेत्रासाठी शंभर टक्के देणे खूप गरजेचं असतं, या मताची मी आहे.

सकाळ वृत्तसेवा

आईपण आणि करिअर

पूजा पवार-साळुंखे

माझं लग्न झालं आणि मी ठरवलं की, मला माझ्या फॅमिलीला पूर्ण वेळ द्यायचा आहे. त्यामुळे मी करिअरकडे एवढं लक्ष नाही दिलं. लग्नानंतर एका वर्षातच मला अलिशा झाली. तेव्हा मी कोणतंही काम करत नव्हते; कारण मी ठरवलं होतं, की सगळा वेळ मी माझ्या होणाऱ्या बाळाला देणार आहे. कोणत्याही क्षेत्रात तुम्ही काम करत असाल, त्या क्षेत्रासाठी शंभर टक्के देणे खूप गरजेचं असतं, या मताची मी आहे. प्रेग्नंसीनंतर पूर्ण आयुष्य बदलून जातं. एका जिवाला जन्म देणार ही भावना अत्यंत सुखद आहे. या सुंदर भावना मी अनुभवत होते. जोपर्यंत आपण आई होत नाही, तोपर्यंत आपल्याला ते कळत नाही. काही प्रोजेक्ट्स माझे राहिले होते, ते मी पूर्ण केले. माझ्या प्रेग्नंसीच्या काळानंतर लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यासोबत ‘टोपीवर टोपी’ नावाची फिल्म करत होते. त्यानंतर मी ‘पैंजण’ नावाची फिल्मदेखील केली. त्यात मी मल्टिस्टारकास्ट होते. माझं एक गाणं राहिलं होतं आणि मल्टिस्टारकास्ट असल्यामुळे मला ते करावं लागलं. माझा तिसरा महिना सुरू होता, तेव्हा मी ते गाणं शूट केलं. त्या गाण्यात मला लावणी करायची होती. त्यावेळी थोडी धाकधूक होती. परंतु, माझ्या डान्स डायरेक्टरनं समजून घेतलं आणि कमीतकमी त्रास होईल अशा स्टेप्स ठरवून ती लावणी पूर्ण केली. सातव्या महिन्यापर्यंत मी सगळे प्रोजेक्ट्स पूर्ण केले. ‘टोपीवर टोपी’ चित्रपटाचं एक गाणं आणि काही सीन राहिले होते. मग ते गाणं करायचं आम्ही ठरवलं. पोट दिसू नये म्हणून मी लॉन्ग फ्रॉक घातला होता आणि कॅमेरा अँगल्स नीट ठेवले होते. त्यामुळे मी प्रेग्नंट असल्याचं दिसलं नाही. लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक मामा आणि मी तिघे त्या गाण्यात होतो.

माझ्या प्रत्येक निर्णयात माझ्या नवऱ्याची साथ होती. त्याच्या सहकार्याशिवाय हे जे काही मी आतापर्यंत उभं केलं, ते शक्यच नव्हतं. करिअरबाबत निर्णय घेताना, मी परिवाराला प्राधान्य दिलं होतं. माझा निर्णय स्पष्ट होता की, मला सध्या करिअरकडे लक्ष द्यायचं नाही आहे. माझ्या मुलींना व्यवस्थित संस्कार देणं, त्यांचं शिक्षण आणि इतर गोष्टींमध्ये त्यांना मदत करणं, या गोष्टींसाठी मला माझा वेळ द्यायचा होता. मुलांच्या संगोपनासाठी मी सतरा-अठरा वर्षांची गॅप घेतली.

आई झाल्यानंतर माझ्या झोपेच्या वेळा, खाण्यापिण्याच्या सवयी आणि इतर गोष्टी बदलल्या. मुलांना आपण जसं वाढवतो तशीच ती वाढतात. त्यामुळे योग्य वेळी, योग्य निर्णय घेणं महत्त्वाचं असतं. मुलींच्या संगोपनात खूप विचारपूर्वक निर्णय घेतले पाहिजेत, कारण आपण लावलेलं बीजच पुढे फळ देतं.

या सगळ्या काळात मला जाणवलं की, प्रत्येकानं आपल्या मुलांना योग्य मार्गदर्शन आणि वेळ द्यायला पाहिजे. त्यानंतर आपल्या करिअरचं जे काही असेल, ते वेळेनुसार समजून घेऊन पुढे जावं. माझ्या दोन्ही मुली आता चांगल्या पदांवर काम करत आहेत. अलिशा बॉलिवूडमध्ये आणि मॉडेलिंगमध्ये आहे, तर नताशा एका कंपनीमध्ये मार्केटिंग करते. दोघींचंही व्यवस्थित सुरू आहे. माझं करिअर पुन्हा सुरू करण्यासाठी मला मुलींचा खूप सपोर्ट मिळाला. त्यांनी सांगितलं, ‘‘आम्ही आमच्या गोष्टी हँडल करू, तू तुझ्या करिअरकडे लक्ष दे.’’ मला बऱ्याच ऑफर येत होत्या; पण मुलींच्या दहावी-बारावीनंतर काम करायचं असं ठरवलं होत. मला एक छान सिनेमा ‘धोंडी’ मिळाला. इतक्या वर्षांनंतर मुख्य भूमिका मिळणं माझ्यासाठी खूप आनंददायी होतं. माझ्या मुलांनी मला खूप चांगली साथ दिली. मुलींना योग्य वेळ दिल्यामुळे त्या चांगल्या व्यक्ती म्हणून तयार झाल्या. माझ्या घरात प्रेम आणि साधेपणा यामुळे त्यांच्यावर चांगले संस्कार झाले. काही गोष्टी सोडल्यानंतर चांगल्या गोष्टी मिळतात, हे मी अनुभवलं. माझ्या मुलींना दिलेला वेळ त्यांच्या विकासासाठी उपयोगी ठरला. त्यानंतर महेश कोठारे यांच्यासोबत एक मालिका आणि दोन चित्रपट केले आणि करिअर पुन्हा सुरू झालं. ‘बाप माणूस’ ही मालिका खूप गाजली. ‘आई कुठे काय करते’मध्ये चांगली भूमिका निभावली. ‘काव्यांजली’मध्ये सासूची भूमिका केली, ज्यात सासूचे दोन्ही पैलू दाखवले. अशा प्रकारे परत एक नवीन सुरुवात झाली.

  • करिअरिस्ट मुलींसाठी टिप्स...

  • घर आणि करिअर यांचा समतोल साधण्यासाठी वेळेचं व्यवस्थापन आवश्यक.

  • बाळाच्या संगोपनाकडे विशेष लक्ष देणं गरजेचं.

  • कष्टांना पर्याय नसतो आणि काही गोष्टी आपल्या नियंत्रणाबाहेर असतात.

  • आईपणासाठी नोकरी सोडणं हा योग्य निर्णय असू शकतो; कारण ही भूमिका खूप महत्त्वाची आहे.

  • आजी-आजोबा मुलांना वाढवू शकतात; परंतु पालकांचं प्रेम आणि मार्गदर्शन अनमोल असतं.

(शब्दांकन : आकांक्षा पाटील)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Rain News : मुंबईत पहिल्याच पावसाने अनेक ठिकाणी पाणी तुंबले, लोकल सेवेवर परिणाम; पुढील काही तास धोक्याचे, हवामान विभागाचा इशारा

महिलांचे महिला व बालविकास कार्यालयात हेलपाटे! मुख्यमंत्र्यांच्या ‘लाडक्या बहिणीं’ना दरमहा लाभ नाहीच; २१ वर्षे पूर्ण झालेल्या महिलांना करता येईना अर्ज

मोठी बातमी! विद्यार्थ्यांना परीक्षेच्या ३ महिने आधी समजणार वेळापत्रक; विद्यापीठाची पहिली सत्र परीक्षा ऑक्टोबरमध्ये, द्वितीय सत्र परीक्षा मार्चअखेर

विशेष : शब्दांपासून आकर्षक आकृतीपर्यंत

PORTUGAL VS UZBEKISTAN: ख्रिस्तियानो रोनाल्डोचे विक्रम, विक्रम, विक्रम... पोर्तुगालचा ५-० असा दणदणीत विजय, Fifa World Cup च्या बाद फेरीच्या दिशेने कूच

SCROLL FOR NEXT