Shravan Month 2024 Sakal
लाइफस्टाइल

Shravan Month 2024: पहिल्या श्रावणी सोमवारी लक्षात ठेवा 'या' गोष्टी, आयुष्यात मिळेल यश

Shravan Special: हिंदू धर्मात श्रावण महिन्याला खुप महत्व आहे. या महिन्यात महादेवाची मनोभावे पुजा केली जाते.

पुजा बोनकिले

Shravan Special: हिंदू धर्मात श्रावण महिन्याला खुप महत्व आहे. यंदा ५ ऑगस्टपासून श्रावण सुरू होणार असून पहिला श्रावणी सोमवार आहे. धार्मिक मान्यतेनुसार श्रावणात भोलेनाथाची मनोभावे पुजा केल्यास आयुष्यात भरभराट येते आणि समस्या दूर होतात. तसेच ज्योतिषशास्त्रात या दिवसासंदर्भात काही नियम सांगतिलेले आहेत.

पुढील गोष्टी कराव्या

  • श्रावण सोमवारी भक्तीभावाने व्रत पाळावे.

  • सकाळी लवकर उठून स्नान करून घर आणि मंदिर स्वच्छ करावे.

  • महादेवाच्या पुजेसाठी बेलाचे पान, धोतऱ्याचे पांढरे फुल आणि फळ,दूध ,दही, विभुती या गोष्टींचा समावेश करावा.

  • या दिवशी तामसिक पदार्थांचे सेवन करणे टाळावे.

  • या दिवशी कोणाचाही अपमान करू नये.

  • उपवासा दरम्यान सुकामेवा,फळे, दूधयासारख्या पदार्थांचे सेवन करावे.

  • या दिवशी मनोभावे आणि विधीपुर्ण भगवान शंकराची पुजा करावी.

  • महादेवाला गोकर्णीचे फुल अर्पण करणे शुभ मानले जाते.

पुढील गोष्टी करणे टाळा

  • भगवान शंकराला पुजेदरम्यान लाल किंवा केलकीचे फुल अर्पण करणे अशुभ मानले जाते.

  • तसेच महादेवाला हळद आणि कुंकु अर्पण करू नये.

  • या दिवशी कांदा, लसूण आणि मसाल्याच्या पादार्थांचे सेवन टाळावे.

  • याशिवाय, अंडी, मांस, मद्य आणि तंबाखूचे सेवन करणे टाळावे.

  • तसेच श्रावणात बाहेरचे पॅकिंग केलेल पदार्थ खाणे टाळावे. चव वाढवण्यासाठी अनेक गोष्टींचा वापर केला जातो.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT