Shravaan Month| Lord Shiva Sakal
लाइफस्टाइल

Shravaan Month: श्रावणात सोमवारी 'या 'गोष्टी घरी आणा, महादेवाची कायम राहील कृपादृष्टी

Shravaan Month 2024: श्रावण महिन्यात भगवान भोलेनाथाच्या आवडत्या गोष्टी सोमवारी आणल्यास महादेव प्रसन्न होतात. तुमच्या घरावर कायम त्यांची कृपादृष्टी राहील.

Puja Bonkile

Shravaan Month 2024: हिंदू धर्मात श्रावणाला खुप महत्व आहे. यंदा श्रावण महिना ऑगस्टमध्ये सुरू होणार आहे. 5 ऑगस्टला श्रावण शुक्ल प्रतिपदेपासून हा श्रावण महिना सुरू होणार आहे. यंदा श्रावण महिन्यात 5 श्रावणी सोमवार आहेत. श्रावणात महादेवाची मनोभावे पुजा केली जाते. भगवान शंकराला प्रिय असलेल्या गोष्टी अर्पण केल्यास घरात सुख-समृद्धी लाभते. तसेच घरात काही गोष्टी आणल्यास महादेवाची कायम कृपादृष्टी राहते.

रूद्राक्ष

गळ्यात रूद्राक्ष घालणे शुभ मानले जाते. श्रावणात रूद्राक्ष घरी आणल्यास आर्थिक समस्या दूर होतात. तसेच पती-पत्नीच्या जीवनासाठी देखील फायदेशीर असते. तसेच देवघरात रूद्राक्ष ठेवणे शुभ मानले जाते. रूद्राक्षाचे पाचमुखी,एकमुखी यासारखे प्रकार आहेत.

शमीचे रोप

शमीच्या रोपाला धार्मिक महत्व असून भगवान शंकाराचे प्रिय आहे. श्रावणात महादेवाला याचे पान अर्पण केल्यास अनेक समस्या दूर होतात. श्रावणात शिवलिंगावर शमीचे पाने ठेवल्यास घरात सुख-समृद्धी लाभते.

डमरू

भगवान शिवाच्या आवडत्या वाद्यांपैकी एक डमरू घरी आणावे. हे घरात ठेवल्याने तुमच्या घरात महादेवाचा वास कायम राहील. असे मानले जाते की डमरूच्या आवाजाने प्रत्येक नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि घराचे वातावरण शुद्ध होते. श्रावण महिन्यात डमरू घरी आणून पूजेच्या वेळी रोज वाजवला तर त्याच्या आवाजाने मानसिक शांती तर मिळतेच शिवाय अनेक प्रकारच्या समस्यांपासून मुक्ती मिळते.

बेलाचे पान

भोलेनाथाला बेलाचे पान खुप प्रिय आहे. सोमवारी पुजा करताना शिवाला बेलाच पान अर्पण केल्यास सर्व संकट दूर होतात. पण बेलाचे पान अर्पण करताना लक्षात ठेवा की ते कुठेही तुटलेले नसावे. तीन पान असलेले बेल अर्पण करणे शुभ असते. यामुळे आयुष्यातील समस्या लगेच कमी होतील.

गंगेचे पाणी

हिंदू धर्मात गंगा नदीला खुप पवित्र मानले जाते. यामुळे घरात गंगाजल ठेवणे शुभ मानले जाते. जर तुमच्या घरात गंगाजल नसेल तर श्रावणात घरी आणावे. या पाण्याने महादेवाचा अभिषेक करावा. यामुळे तुमच्या सर्व मनोकामना आणि ईच्छा पुर्ण होतात.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी! ‘या’ विद्यार्थ्यांना दरवर्षी मिळणार 12,000 शिष्यवृत्ती; वार्षिक उत्पन्न 3.50 लाख रुपये अन्‌ आठवीत पाहिजे ५५ टक्के गुण

मोठी बातमी! दारूचे दर वाढले अन्‌ विदेशी दारूचा खप झाला कमी; बनावट दारू व हातभट्टीची वाढली विक्री; दुकानदारांकडूनही हिशेबात चलाखी, वाचा...

Christmas Special: केळीपासून फक्त बनाना केकच नाही! ‘हे’ 5 ख्रिसमस रेसिपी ट्राय करा, सगळे विचारतील सीक्रेट

आजचे राशिभविष्य - 25 डिसेंबर 2025

Budget International Trip: नव्या वर्षात कमी खर्चात परदेशभ्रमंतीचा प्लॅन? 7 दिवस-6 रात्रीसाठी 'हे' ठिकाण आहे परफेक्ट!

SCROLL FOR NEXT