Silver jewellery
Silver jewellery esakal
लाइफस्टाइल

Silver jewellery : चांदीचे दागिने खरेदी करताय? मग, फसवणूक टाळण्यासाठी फॉलो करा ‘या’ टिप्स

Monika Lonkar –Kumbhar

Silver jewellery : महिलांना दागिन्यांचे विशेष आकर्षण असते. मग, हे दागिने कोणत्या ही प्रकारचे असुदे, ते सोन्याचे असो, चांदीचे असो किंवा मग इमिटेशन ज्वेलरी असो. यातील सर्व प्रकारच्या दागिन्यांची महिलांना खास करून आवड असते. त्यामुळे, दागिने खरेदी करण्यावर आणि ते परिधान करण्यावर त्यांचा भर असतो.

दागिन्यांमध्ये आजकाल असंख्य ऑप्शन जरी उपलब्ध असले तरी, देखील महिलांचा कल हा प्रामुख्याने सोन्याचे आणि चांदीचे दागिने खरेदी करण्यावर असतो. आजकाल चांदीच्या दागिन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात व्हरायटी पहायला मिळत आहे. शिवाय, अनेक नवनवीन डिझाईन्समुळे महिलांची चांदीच्या दागिन्यांना पसंती वाढली आहे.

ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही माध्यमांमधून चांदीची खरेदी केली जाते. परंतु, चांदीचे दागिने खरेदी करताना तुम्ही काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे. यासाठी आज आम्ही तुम्हाला काही सोप्या टिप्स सांगणार आहोत. कोणत्या आहेत या टिप्स? चला तर मग जाणून घेऊयात.

क्वालिटी चेक करायला विसरू नका

सोन्याचे दागिने खरेदी करताना प्रामुख्याने क्वालिटी चेक केली जाते. परंतु, चांदीचे दागिने खरेदी करताना कुठेतरी याकडे दुर्लक्ष होताना दिसते. तुम्ही जर असे करत असाल तर हे करू नका.

चांदीचे दागिने खरेदी करताना त्याची गुणवत्ता बारकाईने तपासा. जर या दागिन्यांची कारागिरी चांगली नसेल तर, तुम्हाला त्या दागिन्याची खडबडीत कडा असमान रचना दिसू शकते. त्यामुळे, चांदीचे दागिने खरेदी करताना या गोष्टी आवर्जून तपासा आणि उत्तम क्वालिटीचे दागिने खरेदी करा. जेणेकरून ते दीर्घकाळ टिकू शकतील. (Don't forget to check the quality)

हॉलमार्क अवश्य चेक करा

साधारणपणे जेव्हा आपण सोन्याचे दागिने खरेदी करतो, तेव्हा निश्चितपणे हॉलमार्क तपासतो. हॉलमार्क असेल तरच ते दागिने खरेदी करतो. परंतु, तुम्हाला माहित आहे का? की, चांदीचे दागिन्यांवर देखील हॉलमार्क असतो. त्यामुळे, चांदीच्या दागिन्यांवरील हॉलमार्क तपासूनच ते खरेदी करा. अस्सल चांदीच्या दागिन्यांमध्ये अनेकदा चांदीचे प्रमाण दर्शवणारा हॉलमार्क किंवा स्टॅम्प असतो.

स्टर्लिंग सिल्वरच्या दागिन्यांसाठी सर्वात सामान्य चिन्ह म्हणजे ९२५ किंवा ss म्हणजे स्टर्लिंग चांदी होय. यावरून हे लक्षात येते की, संबंधित दागिना हा ९२.५ टक्के शुद्ध चांदीचा आहे. त्यामुळे, चांदीचे दागिने खरेदी करताना या प्रकारचा हॉलमार्क अवश्य चेक करा. (Be sure to check Hallmark)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election Exit Poll 2024: 'हा तर सरकारी एक्झिट पोल...', निकालांचा कल हाती आल्यानंतर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया

Lok Sabha Election Exit Poll Results 2024 : एक्झिट पोलमध्ये देशात तिसऱ्यांदा NDA ची सत्ता; INDIA आघाडीला किती जागा मिळणार?

Loksabha election 2024 Exit Poll : एकच पठ्ठ्या म्हणतोय मोदी चारशेपार होतील! तेही घटकपक्षांना धरुन; काय आहे एक्झिट पोलची आकडेवारी?

Mumbai News : महिला प्रवाशांची रेल्वेला साथ; सुट्टी किंवा वर्क फ्रॉम होममुळे महिला डब्यात तुरळक गर्दी

OpenAI Robotics Comeback : लवकरच तुमच्या भेटीला येतोय 'AI रोबोट' ; प्रगत तंत्रज्ञान घेऊन OpenAIचं पुन्हा पदार्पण

SCROLL FOR NEXT