akshaya hindalkar and vaishnavi hindalkar sakal
लाइफस्टाइल

जिवाभावाच्या बहिणी

आपण जन्माला आलो, की रक्ताच्या नात्याने आपल्या कुटुंबाशी जोडले जातो. तथापि, एक नाते आपण स्वतः निवडतो ते म्हणजे मैत्रीचे.

सकाळ वृत्तसेवा

- अक्षया हिंदळकर, वैष्णवी हिंदळकर

आपण जन्माला आलो, की रक्ताच्या नात्याने आपल्या कुटुंबाशी जोडले जातो. तथापि, एक नाते आपण स्वतः निवडतो ते म्हणजे मैत्रीचे. मित्र आपले आयुष्य सुंदर बनवतात; पण आपल्याला आपल्या रक्ताच्या नात्यामध्येच एक मैत्रीण मिळाली तर काय होईल? असंच झालंय, अभिनेत्री अक्षया हिंदळकरसोबत. तिची सख्खी बहीण वैष्णवी हिंदळकरच तिची बेस्ट फ्रेंड आहे.

याविषयी अक्षया म्हणाली, ‘कोणालाही खोटं वाटेल; पण कधीच आमच्यात भांडण होत नाहीत. याचं कारण माझी बहीणच आहे. ती खूप जास्त समजूतदार आहे. तशी मी मोठी बहीण असले, तरी आमच्यात समंजस ती आहे. त्यामुळे आमच्यात भांडण असं कधीच होत नाही. ते माझं गुणी बाळ आहे. आपल्याकडे बहीण असेल ना, तर आपल्याला कधीच दुसऱ्या मैत्रिणीची गरज नाही पडत. आम्ही दोघीही लहानातली लहान गोष्ट एकमेकींसोबत शेअर करतो.

आमच्यात बहिणी-बहिणींचं नातं आहेच; पण त्याहीपेक्षा घट्ट मैत्रीचं नातं आहे. मी तिच्याकडे बघते, तेव्हा तेव्हा मला स्वतःचीच छबी दिसते. बऱ्याच बाबतीत आमचे सेम विचार असतात. आम्ही कधीच कोणाविषयी गॉसिप्स करत नाही. आम्हा दोघींनाही ज्या गोष्टी पटत नाहीत, किंवा आवडत नाहीत, त्या गोष्टींवर आम्ही बोलणंच टाळतो. माझ्या खूप जास्त अगदी जिवाभावाच्या मैत्रिणी आहेत; पण माझ्या बहिणीसोबत असणारी मैत्री खूप वेगळी आहे.’

वैष्णवी म्हणाली, ‘मी आणि दीदी लॉकडाउनच्या काळात मैत्रिणी म्हणून खूप जास्त कनेक्ट झालो. ती मोठ्या बहिणीसोबतच माझी प्रोटेक्टरही आहे. आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात अशी एक व्यक्ती असते, जिच्यासोबत आपण खूप जास्त कम्फर्टेबल असतो. त्यांच्याशी आपण सगळ्या गोष्टी शेअर करतो. माझ्या आयुष्यातील ती व्यक्ती म्हणजे माझी दीदी. कारण मला माहितीये, की मी तिच्याबरोबर शेअर केलेल्या गोष्टी बाहेर कुठेच जाणार नाहीत. माझी दिदीच माझी सीक्रेट कीपर आहे.’’

अक्षया सांगत होती, ‘ती समजूतदार आहेच; पण तिच्यातली अजून एक शिकण्यासारखी गोष्ट म्हणजे एखाद्या कामाप्रती असणारं डेडिकेशन. आम्ही दोघींनीही ठरवलं होतं, की रोज योगासनं करायची; पण जसजसा वेळ निघत गेला, तशी मी नवनवीन ॲक्टिविटीज् करत गेले; परंतु वैष्णवीनं नवीन गोष्टी केल्याच; पण सोबतच योगासनंही कंटिन्यू केली. ती अजूनही न चुकता रोज योगासनं करते. तिला सगळ्या प्रकारची योगासने येतात.’

वैष्णवी म्हणाली, ‘माझी फेवरिट अभिनेत्री माझी दीदीच आहे. तिनं आतापर्यंत खूप वेगळवेगळी कामं केली आहेत. मला तिचं प्रत्येक काम प्रचंड आवडतं. कारण त्यामागची मेहनत मी खूप जवळून बघते. आम्हा सगळ्यांना तिचा खूप अभिमान वाटतो. एक अभिनेत्री म्हणून ती कमाल आहेच; पण त्यासोबतच व्यक्ती म्हणूनही ती खूप चांगली आहे. तिच्यातले अनेक गुण मला शिकायला आवडतात.

मात्र, तिची एक गोष्ट मला नाही आवडतं ती म्हणजे, तिला माणसं ओळखता नाही येत. याचा तिलाच खूप त्रास होतो. या एका बाबतीत आम्ही विरुद्ध आहोत. मी कोणाशीही ओळख करण्यापूर्वी किंवा एखाद्याशी कनेक्ट होण्यासाठी वेळ घेते; पण दीदी पटकन सगळ्यांशी ॲटॅच होऊन जाते. तसा हा एक चांगला गुण आहे; पण कधीकधी चुकीच्या माणसांशी ॲटॅच झाल्याने त्याचा त्रास तिलाच होतो.’

अक्षयानं एक किस्सा सांगितला. ती म्हणाली, ‘काही दिवसांपूर्वी मला एक हिंदी मालिका मिळणार होती; पण त्याआधी माझा छोटासा अपघात झालेला. त्यामुळे मला ती मालिका नाही मिळाली. या क्षेत्रात अशा बातम्या वाऱ्यासारख्या पसरतात. मी रिकव्हर होण्याच्या काळात ही बातमी सगळीकडे पसरली.

परिणामी मला काम मिळत नव्हतं. तो माझा सगळ्यात वाईट काळ होता. मी डिप्रेस्ड होते. या काळात मला सगळ्यांनी धीर दिला; पण एका मर्यादेपर्यंत. लोक समजावायचे आणि निघून जायचे; पण माझी बहीण रोज मला सांगायची, ‘दीदी सगळं नीट होणार आहे. काळजी करू नकोस. तुला नक्की काम मिळेल.’ असं बोलून ती एक पॉझिटिविटी निर्माण करायची. त्यातून माझा आत्मविश्वास वाढायचा.

शेवटी तिचं बोलणं खरं झालं. मला ‘झी मराठी’वरील ‘यंदा कर्तव्य आहे’ मालिका मिळाली. याचीही एक गंमत अशी, की मी या मालिकेसाठी ऑडिशन देऊन तर आले; पण मला वाटायचं, माझं सिलेक्शन नाही होणार. कारण खूप काळ गेला होता मध्ये. मात्र, वैष्णवी खूप कॉन्फिडेन्ट होती यावर. शेवटी मला कॉल आला. त्यावेळी मी खूप खूश होते आणि माझ्यापेक्षा जास्त ती खूश होती.’

(शब्दांकन - मयुरी गावडे)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fetus Gender Testing Center: गर्भलिंग चाचणी केंद्र कळवा अन् एक लाख रुपये मिळवा! काय आहे 'ही' योजना जाणून घ्या

Pune: अर्धवट कपडे अन् हातात विळा, बसमध्ये चढून व्यक्तीचा तरुणावर हल्ला अन्...; व्हायरल व्हिडिओनं बारामती हादरलं

Mumbai News: धारावी पुनर्वसनावरून नागरिकांचा रोष, मुलुंडमध्ये स्थलांतर विरोधात उपोषण; मविआचा पाठिंबा

Malegaon Bomb Blast : मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात पंतप्रधान मोदींना अडकवण्याचा होता कट; साध्वी प्रज्ञासिंह यांचा खळबळजनक दावा

Latest Maharashtra News Updates Live: पुणे-बीडमध्ये वर्दीची भीती उरली नाही

SCROLL FOR NEXT