World No Tobacco Day  sakal
लाइफस्टाइल

World No Tobacco Day 2022 : धूम्रपान तुमच्या लैंगिक जीवनावर परिणाम करू शकते

तंबाखूचे सेवन तुमच्या लैंगिक आरोग्यावरही परिणाम करते

सकाळ डिजिटल टीम

धूम्रपान हा शरीरासाठी धोकादायक आहे हे सर्वांनाच माहिती आहे. यात विशेषत: तंबाखू हा शरीरास हानिकारक आहे. या संदर्भात जागरूकता पसरवण्यासाठी 31 मे रोजी दरवर्षी जागतिक तंबाखू विरोधी दिन पाळला जातो. या दिनानिमित्त लोकांना तंबाखूच्या सेवनाविरूद्ध चेतावणी दिली जाते. पण तुम्हाला माहिती आहे का तंबाखूचे सेवन तुमच्या लैंगिक आरोग्यावरही परिणाम करते.

तंबाखूच्या धूम्रपानामुळे तुमच्या लैंगिक जीवनावर कसा परिणाम होतो ते पाहूया:

1. इरेक्टाइल डिसफंक्शन

पुरुषांसाठी, दीर्घकाळ तंबाखूचे सेवन केल्याने त्यांच्या लैंगिक जीवनावर गंभीर परिणाम होतो. सिगारेटच्या प्रभावामुळे, पुरुषांना इरेक्टाइल डिसफंक्शनचा त्रास होण्याची शक्यता जास्त वाढते. तंबाखूच्या सेवनाने रक्तवाहिन्यांवर परीणाम करतात. त्यामुळे मेंदूकडून येणाऱ्या लैंगिक उत्तेजनाच्या पल्स प्रतिसाद देतात. त्यामुळे याचा लैंगिक जीवनावर प्रभाव पडतो.

2. प्रजनन क्षमता कमी होते

धूम्रपानामुळे प्रजनन क्षमतासुद्धा कमी होते आणि त्यामुळे जोडप्यांना गर्भधारणा करणे कठीण होते. स्त्रियांना धुम्रपानामुळे गर्भधारणावेळी धोका यासह फॅलोपियन ट्यूबमध्ये समस्या उद्भवू शकतात.

3. गर्भधारणा गुंतागुंत

गर्भधारणेदरम्यान धूम्रपान केल्याने महिलांना मुदतपूर्व प्रसूती यासारख्या गुंतागुंत होण्याचा धोका जास्त असतो. धूम्रपान केल्याने बाळाच्या आरोग्यावरही नकारात्मक परिणाम होऊ शकतात. गर्भात सिगारेटचा धूर गेल्याने अर्भकाच्या जीवालाही धोका निर्माण होतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IMD Weather Alert : चक्रीवादळाने रौद्ररूप धरले! ताशी १०० किमी वेगाने सुटणार सोसाट्याचा वारा; 'या' राज्यांत मुसळधार पाऊस, महाराष्ट्रात काय घडणार?

फ्लिपकार्टच्या गोदामातून ९८० सॅमसंग मोबाईल चोरीला; पुरावा मिळू नये म्हणून CCTV चा डीव्हीआरही पळवला...

Jamgaon News: रविवारी सुट्टी असतानाही सीईओंची जामगावला भेट; अपघातात मृत सेविकेच्या कुटुंबीयांचे सांत्वन

IND W VS ZIM W 2ND ODI NEWS: हरमनप्रीत दीप्तीची शतके, वैष्णवीची गोलंदाजीत कमाल! झिम्बाब्वेला लोळवत भारताने मालिका खिशात घातली

Dutch Farmers: डच ट्रॅक्टर रस्त्यावर, मागणी संसदेच्या टेबलावर; नायट्रोजन संघर्षाची सात वर्षे; २०३५चे लक्ष्य ठरले, पण डच शेतकऱ्यांना हवी आहे स्पष्टता

SCROLL FOR NEXT