Summer Kitchen Hacks
Summer Kitchen Hacks Sakal
लाइफस्टाइल

Summer Kitchen Hacks: उन्हाळा सुखकर करण्यासाठी फॉलो करा किचनच्या 'या' सोप्या टिप्स

पुजा बोनकिले

Follow these easy kitchen tips make summers enjoyable

उन्हाळा सुरू झाला आहे. उन्हाळ्यात थंडावा मिळण्यासाठी लोक विविध उपाय करतात. तुम्ही कमी वेळेत घरातील कामे सोपी करण्यासाठी पुढील काही घरगुती टिप्स फॉलो करू शकता.

  • धान्याची काळजी कशी घ्यावी

उन्हाळ्यात अनेक लोक घरात वर्षभरातील धान्य भरून ठेवतात. फक्त उन्हाळाच नाही तर कोणत्याही वातावरणात धान्य चांगले राहण्यासाठी तुम्ही लाल सुपारीचा वापर करू शकता. गहू, तांदूळ यासारख्या धान्यांच्या पोत्यामध्ये किंवा डब्ब्यांमध्ये लाल सुपारी टाकू शकता. तसेच तुम्ही एरंडेल तेल लावून धान्य ठेवल्यास वर्षभर खराब होणार नाही.

  • उन्हाळ्यातील आहार

अनेकांना उन्हाळ्यात उष्णता, पित्ताचा त्रास होतो. यामुळे पालेभाज्या खाणे टाळावे. फळभाज्या, कडधान्य, सॅलेड, फळ यांचा आहारात समावेश करावा.

  • माठातील थंड पाणी

उन्हाळ्यात फ्रिजमधील पाणी न पिता माठातील पाणी प्यावे. फ्रिजमधील पाणी प्यायल्याने शरीरातील उष्णता वाढून सर्दी-खोकला होऊ शकतो. यामुळे शक्य असल्यास माठातील थंड पाणी प्यावे. तुम्ही थोड साधे पाणी मिक्स करून देखील पिऊ शकता. कारण अनेकांना माठातील पाणी प्यायल्याने सर्दी होते. उन्हाळ्यात माठातील पाणी थंड राहण्यासाठी बाहेरून सुती कापड्याने गुंडाळावे. माठ नेहमी हवेशीर ठिकाणी ठेवावे.

  • पोटातील उष्णता कशी कमी करावी

रात्री झोपताना काळे मनुके भिजवावे. दुसऱ्या दिवशी सकाळी त्याचे पाणी प्यावे आणि भिजवलेले मनुका खावे. यामुळे पोटात होणारी जळजळ कमी होते आणि पोट स्वच्छ राहते.

  • दह्याचा आबंटपणा कसा कमी करावा

अनेक लोक दह्याचा आंबटपणा कमी करण्यासाठी दूध मिक्स करतात. पण आंबटपणा कमी होत नाही. यासाठी आंबट दही गाळून घ्यावे. नंतर घट्ट दह्यामध्ये दूध मिक्स करावे. यामुळे लगेच दह्याचा आंबटपणा कमी होईल. बाजुला काढलेले पाणी कढीसाठी वापरू शकता. कारण कढी आंबट चवदार लागते.

  • मोगऱ्याची फुले

उन्हाळ्यात रखरखपणा कमी करण्यासाठी घरी सुगंधी फुले ठेऊ शकता. घरातील हवेशीर जागी मोगरा, गुलाब, जाई यासारखी सुगंधी फुले ठेवावी. यामुळे घरात प्रसन्न वातावरण राहते.

  • सरबतासाठी लिंबू कसे वापरावे

उन्हाळ्यात लिंबाचा रस अनेक लोक आवडीने पितात. थंड लिंबाचा रस प्यायल्याने शरीराला थंडावा मिळतो. लिंबू सरबत बनवण्यापुर्वी लिंबाला चांगले धुवावे आणि थोडे हाताने दाबून चोळावे. यामुळे लिंबामधून भरपुर रस निघतो.

  • दही घट्ट कसे लावावे

उन्हळ्यात दही खाणे आरोग्यदायी असते. अनेक लोक घरी दही लावतात. पण उन्हाळ्यात दही घट्ट लागत नाही. यासाठी तुम्ही दही लावताना दूध गरम झाल्यावर थोडावेळ ढवळावे. नंतर कोमट झाल्यावर दही लावावे. दही पसरट भाड्यामध्ये लावावे. मातीच्या भाड्यांमध्ये लावल्यास दही घट्ट लागते.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi Live News Update: ऑटोरिक्षा अपघातात जखमी झालेल्या महिलेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केली मदत

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: अभिनेते अमिताभ बच्चन यांनी बजावला मतदानाचा हक्क

Deepika Padukon : बायकोला सांभाळत रणवीरचं सहकुटूंब मतदान; दीपिकाच्या बेबी बंपने वेधलं लक्ष

धक्कादायक! नालासोपारा मतदारसंघातील तब्बल 'इतके' लाख मतदार गायब; निकालावर होणार थेट परिणाम

Magical Blanket : सत्यात अवतरलं क्षणात गायब करणारं हॅरी पॉटरचे जादुई ब्लॅंकेट, हे गॅजेट आहे कमाल

SCROLL FOR NEXT