Veg Franky
Veg Franky  Sakal
लाइफस्टाइल

Veg Franky Recipe: वीकेंडला सकाळच्या नाश्त्यात बनवा चटपटीत व्हेज फ्रॅकी

पुजा बोनकिले

Veg Franky Recipe weekend special how to make Veg Franky at home

वीकेंडला सकाळी नाश्त्यात काही चवदार खायची इच्छा होत असेल तर व्हेज फ्रॅकी बनवू शकता. हा पदार्थ बनवायला सोपा आणि चवदरा आहे. चला तर मग जाणून घेऊया व्हेज फ्रॅकी कसा बनवावा.

  • फ्रॅकी बनवण्यासाठी लागणारे साहित्य

1 कप गव्हाचे पीठ

1 कप मैदा

1 चमचा दही

मीठ चवीनुसार

  • कृती

एका भांड्यात गव्हाचे पीठ, मैदा, दही आणि मीठ मिक्स करावे. नंतर गरजेनुसार पाणी टाकून पीठ चांगले मळून घ्यावे. 15 मिनिटे पीठ झाकून ठेवावे. नंतर गोलाकार चपाती लाटून घ्यावी. नंतर दोन्ही बाजून भाजून घ्यावी.

  • फ्रॅकी मसाला बनवण्यासाठी लागणारे साहित्य

4 उकडलेले बटाटे

तेल

जीरं

मोहरी

उभी चिरलेली शिमला मिरची

उभा चिरलेला टोमॅटो

आलं-लसूण पेस्ट

लाल तिखट

हळद

कोथिंबीर

टोमॅटो सॉस

हिरवी चटणी

पत्ता कोबी

कांदा

  • फ्रॅकी मसाला कसा बनवावा

फ्रॅकी मसाला बनवण्यासाठी सर्वात आधी एका पॅनमध्ये तेल गरम करावे. नंतर जीरं, मोहरी, कांदा, आलं आणि लसूण पेस्ट टाकून चांगले मिक्स करावे. नंतर त्यात लाल तिखट, हळद टाकावे. नंतर उकडलेला बटाटा मिक्स करावे. चवीनुसार मीठ टाकावे. गॅस बंद करावा. फ्रॅकी मसाला तयार आहे.

  • व्हेज फ्रॅकी बनवण्यासाठी लागणारे साहित्य

व्हेज फ्रॅकी बनवण्यासाठी बनवलेली पोळी घ्यावी. त्यावर टोमॅटो सॉस आणि हिरवी चटणी लावावी. त्यावर फ्रॅकी मसाला लावावा. नंतर त्यावर उभी चिरलेली शिमला मिरची, उभा चिरलेला टोमॅटो, उभा चिरलेला कांदा टाकावा. नंतर कोथिंबीर टाकावी आणि गोल रोलचा आकार द्यावा. परत तव्यावर हा रोल गरम करावा. तुमचा व्हेज फ्रॅकी तयार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: महाराष्ट्रात मतदारांमध्ये अनुत्साह, अकरा वाजेपर्यंत अवघे 16 टक्के मतदान

Onion Garlands During Voting: गळ्यात टोमॅटो-कांद्याच्या माळा घालून मतदान; नाशिकमध्ये युवा मतदारांची चर्चा

Bangladesh MP Missing: भारतात आलेला बांगलादेशचा खासदार 3 दिवसांपासून बेपत्ता; कुटुंबाकडून चिंता व्यक्त

RSS नंतर आता दिग्विजय सिंह यांनी CM योगींचे केले कौतुक मात्र मोदींवर खोचक टीका, नेमकं काय म्हटलं वाचा...

Healthy Tips: आता कमी वयातच पोटाचा वाढतोय घेर, जास्त चरबीमुळे हृदयविकार, मधुमेह, आजारांना निमंत्रण

SCROLL FOR NEXT