Symbiosexuality: एखाद्या व्यक्तीशी संबंध ठेवण्यासाठी कोणती अट असावी? याचे उत्तर अनेकांचे वेगवेगळे असेल, कारण जगभरात अनेक प्रकराचे लोक राहतात. त्यापैकी काही लोक होमोसेक्युअल तर काही बायसेक्सुअल आहेत. यापैकी बरेच जोडपे एकाच लिंगाचे आहेत आणि काहींना दोन्ही लिंगांमध्ये रस असतो. अलीकडेच एक सिम्बियोसेक्सुअलिटी समोर आले आहे, ज्यामध्ये लोक दोन लोकांना डेट करतात.
तुम्ही लेस्बियन, गे, ट्रान्सजेंडर, होमोसेक्सुयल आणि बायसेक्सुयल अशी नावे ऐकली असतीलच. त्यात आता सिम्बियोसेक्सुअलिटीचे नाव समोर आले आहे. या नवीन लैंगिकतेमध्ये, एक व्यक्ती अशा जोडप्याकडे आकर्षित होते जे आधीपासूनच एकमेकांशी नातेसंबंधात आहेत. मानवाची ही नवीन आवड एका संशोधनातून समोर आली आहे. जे लोक या नात्यात येतात ते केवळ त्यांच्या शारीरिक गरजा पूर्ण करण्यासाठी येतात आणि त्यांना इतर कोणात्याही लोकांची ओढ किंवा जवळीक राहत नाही.
अमेरिकेतील सिएटल विद्यापीठाच्या संशोधकांनी दिलेल्या सिद्धांतातून ही नवीन लैंगिकता समोर आली आहे. हे संशोधन करणाऱ्या प्रोफेसर डॉ. सॅली जॉन्स्टन म्हणतात की, लैंगिकतेबद्दल आपल्याला जे माहिती आहे ते पूर्ण नाही, अजून बरेच काही जाणून घ्यायचे आहे. संशोधनातून असे समोर आले आहे की, ज्या व्यक्तीला आपण सिम्बियोसेक्सुअलिटी असल्याचे माहीत आहे, त्यांना दोन व्यक्तींमध्ये समन्वय निर्माण करणे आवडते. म्हणजे त्यांना दोन लोकांसोबत रिलेशनशिपमध्ये राहायला आवडते.
प्लेजर स्टडीमध्ये विविध विषयांवर 65 प्रश्नांचे सर्वेक्षण करण्यात आले. जॉनस्टनने अशा लोकांच्या प्रतिक्रिया नोंदवल्या ज्यांनी सांगितले की ते एखाद्या व्यक्तीऐवजी जोडप्याकडे आकर्षित झाले आहेत. अभ्यासातील 373 पैकी किमान 145 सहभागींनी या प्रकारच्या आकर्षणाला सहमती दर्शवली. या संशोधनात समलैंगिक (90 %) पेश्रा जास्त आणि पोलीयामोरस म्हणजेच एकापेक्षा जास्त व्यक्तींशी संबंध असलेले (87.5%) समाविष्ट होते. यामध्ये बहुतेक सहभागी मध्यमवर्गीय आणि चांगल्या पदव्या असलेल्या लोकांचा समावेश होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.