vatpournima google
लाइफस्टाइल

वटसावित्रीच्या पुजेकरता कोणते साहित्य आवश्यक असते आणि पुजा कशी करावी ?

सोबतच हिरव्या काचेच्या बांगड्या, गळसरी, पुजेचं वस्त्र, पाच फळं ठेवावीत. त्यानंतर गुळ-खोबरं व पंचामृताचा नैवेद्य दाखवावा.

दिपाली सुसर

वटसावित्री पौर्णिमेकरता लागणारे साहित्य

४ हिरव्या काचेच्या बांगड्या, हळद-कुंकू, एक गळसरी (काळ्या मण्यांची पोथ), पुजेचं पांढरं हिरवं वस्त्र, सुपारी, विड्याची पाने, पैसे,अत्तर, पंचामृत, कापूर, गुळ-खोबऱ्याचा नैवेद्य, ५ फळं, सती मातेचा फोटो किंवा सुपारी, दोरा.

पुजेचा नेमका विधी कसा करावा ?

जर तुम्हाला बाहेर वडाच्या पारावर जाणं शक्य नसेल तर घरीच वडाचे छोटे रोटपे किंवा वटपौर्णिमेचा कागद लावून त्याची पूजा करावी. प्रथम सुपारीच्या गणपतीची स्थापना करावी. त्यावर हळद-कुंकू , अक्षता वाहून पूजा करावी. त्यानंतर वडाच्या मुळाची व सती मातेची याच पद्धतीने पूजा करावी. त्यानंतर सती मातेजवळ विड्याची पानं ठेवून त्यावर पैसा-सुपारी ठेवावी.

सोबतच हिरव्या काचेच्या बांगड्या, गळसरी, पुजेचं वस्त्र, पाच फळं ठेवावीत. त्यानंतर गुळ-खोबरं व पंचामृताचा नैवेद्य दाखवावा. सारं काही व्यवस्थित झाल्यावर कापूर आरती करावी. पूजा झाल्यावर स्त्रियांनी वडाला दोरा गुंडाळत सात फेऱ्या माराव्यात. नंतर सुवासिनी महिलांना कुंकू लावून त्यांच्या कपाळात गुलाल भरावा. दरम्यान, या दिवशी स्त्रियांनी पूर्ण दिवस उपवास करावा व दुसऱ्या दिवशी उपवास सोडावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

गुजरातमध्ये पूल कोसळून ९ जणांचा मृत्यू, कशी घडली घटना? घटनास्थळावरचे VIDEO VIRAL

भिवंडीत परप्रांतीय रिक्षाचालकाची मराठी तरुणाला मारहाण; मनसेने हिसका दाखवताच मागितली माफी

ENG vs IND, 3rd Test: लॉर्ड्स खेळपट्टीवर हिरवा रंग दिसू लागला; WTC फायनलपेक्षाही तिकिटांची किंमतही दुप्पट

Kareena Pregnancy? सैफ अली खानच्या घरात पुन्हा पाळणा हलणार? करिना तिसऱ्यांदा आई होणार? फोटोमुळे चर्चांना उधाण

Video : ब्रेक फेल अन् भीषण थरार! स्कूल बसने 8 गाड्यांना चिरडले, अपघाताचा व्हिडीओ पाहून अंगावर काटा येईल..

SCROLL FOR NEXT