कोण मागतं सर्वाधिक माफी
कोण मागतं सर्वाधिक माफी Esakal
लाइफस्टाइल

कोण सर्वाधिक Sorry म्हणतं?....महिला की पुरूष....

सकाळ डिजिटल टीम

महिला या पुरुषांपेक्षा जास्त वेळा 'सॉरी' म्हणतात. कारण, त्यांना आपल्यामुळे नात्यात दुरावा यावा, असे वाटत नाही. त्यामुळे 'सॉरी' Apology म्हणून त्या आपल्याकडे झुकते माप घ्यायला तयार होतात; पण ऊठसूट 'सॉरी' Sorry म्हणण्याने तुमचा आत्मविश्वास कमी होण्याचा धोका असतो. Who use the word sorry the most women or men

दिवसातून आपण किती वेळा 'सॉरी' म्हणतो, याचा कधी विचार केला आहे? सॉरी आणि प्लीज या दोन शब्दांचा त्यांचा वापर आपण कितीदा करतो, याकडे कोणाचे फार लक्ष जात नाही; पण उठसूट 'सॉरी' Apology म्हणत असाल, तर त्याचा तुमच्या मानसिकतेवर Psychology परिणाम होतो, हेही लक्षात ठेवायला हवे.

सतत 'सॉरी' म्हणणे म्हणजे आपल्यावर विश्वास कमी असल्याचे द्योतक आहे, हे तुम्हाला माहीत आहे का? एक शिष्टाचार म्हणून या शब्दांचा वापर करण्यावर भर दिला जातो. मात्र त्यांचा अतिवापर काही धोक्याचे इशारे देत असतो.

अनेकदा 'सॉरी' मनापासून म्हटले जात नाही. बरेचदा ते म्हणायचे म्हणून किंवा मनाविरुद्धही म्हटले जाते, याला काही अर्थ नसतो. घडलेल्या प्रसंगातील आपली चूक कबूल करण्याची वृत्ती नसते, तर एक औपचारिकता courtesy म्हणून 'सॉरी' म्हटले जाते.

मनापासून व्यक्त केलेली दिलगिरी ही पुढच्या वेळी तशी चूक होणार नाही, याची खात्री बाळगली जाईल, याची ग्वाही असते. मात्र मनापासून 'सॉरी' म्हटले नसेल तर त्याचा काही फायदा नसतो.

हे देखिल वाचा-

दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे सारखे 'सॉरी' म्हटल्यामुळे तुमचा आत्मसन्मान Self Respect कमी होतो. तुम्हाला तुमच्या वागण्यावर विश्वास वाटत नाही, आपण केलेली कृती चुकली असण्याची शक्यता आहे, असे वाटत राहते. थोडक्यात स्वतःवरचा विश्वास कमी होतो.

एका सर्वेक्षणानुसार महिला या पुरुषांपेक्षा जास्तवेळा 'सॉरी' म्हणतात. कारण त्यांना आपल्यामुळे नात्यात दुरावा यावा, असे वाटत नाही. त्यामुळे 'सॉरी' म्हणून त्या आपल्याकडे झुकते माप घ्यायला तयार होतात. काही जण विषय वाढवायचा नाही म्हणून 'सॉरी' म्हणतात. त्यामुळे तो विषय संपला तरी चुका करण्याचे प्रमाण कमी होत नाही, कारण हे 'सॉरी' चुका समजून घेऊन म्हटलेले नसते.

'सॉरी' म्हणणे हे संवेदनशील असले पाहिजे. ते मनापासून हवे तसेच ते कौशल्याने म्हटले पाहिजे. ते कोणत्या तरी संदेशाबरोबर असेल किंवा एखाद्या भेटवस्तूबरोवर (चॉकलेट किंवा फुले) असेल तर त्याचा प्रभाव वाढेल. प्रत्यक्ष 'सॉरी' म्हणणे जमत नसेल, तर ते लिहून सांगता येईल. यातली कोणतीही पद्धत

वापरली तरी चालेल; पण हे 'सॉरी' मनापासून म्हटलेले असायला हवे हे नक्की. आणि त्याचा 'ओव्हरडोस' टाळायला हवा, तेही तितकेच महत्त्वाचे.

हे देखिल वाचा-

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE : देशभरात संध्याकाळी पाचपर्यंत ५६.६८ टक्के मतदान; महाराष्ट्रात जम्मू काश्मीरपेक्षाही कमी मतदान शिंदे

Ebrahim Raisi : इराणचे अध्यक्ष इब्राहिम रईसी यांच्या मृत्यूमुळं भारतात उद्या राष्ट्रीय दुखवटा जाहीर

Helmet Man : दागिने, घर, जमीन विकून हा व्यक्ती लोकांना फुकटात वाटतोय हेल्मेट,राघवेंद्रचे होतंय कौतूक

Uddhav Thackeray : ''मतदान केंद्रातील कर्मचाऱ्यांची नावं लिहून घ्या, त्यांची नावं जाहीर करुन कोर्टात धाव घेणार'', उद्धव ठाकरेंनी का दिला इशारा?

Swati Maliwal Rajya Sabha Membership: 'आप'शी पंगा घेतल्यानंतर स्वाती मालीवालांना गमवावं लागणार राज्यसभा सदस्यत्व? काय सांगतो नियम

SCROLL FOR NEXT