sight
sight google
लाइफस्टाइल

जागतिक दृष्टी दिवस कधी साजरा केला जातो ?

दिपाली सुसर

जगातील विविध देशांमध्ये नेत्रदानाचे महत्त्व ओळखून दरवर्षी १० जून हा दिवस 'आंतरराष्ट्रीय दृष्टी दिवस' म्हणून साजरा केला जातो. याद्वारे लोकांनी नेत्रदान का करावे याविषयी जनजागृती केली जाते.

जागतिक दृष्टी दिनाचे नेमके उद्दिष्ट काय आहे ?

नेत्रदानाच्या महत्त्वाबाबत जनजागृती करणे आणि मृत्यूनंतर नेत्रदान करण्याची शपथ घेण्यासाठी लोकांना प्रेरित करणे हा जागतिक दृष्टी दिनाचा मुख्य उद्देश आहे.

अंधत्व ही विकसनशील देशांमधील सार्वजनिक आरोग्य समस्यांपैकी एक आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या मते, मोतीबिंदू आणि काचबिंदू नंतर, कॉर्नियाचे रोग (डोळ्याचा पुढचा थर असलेल्या कॉर्नियाचे नुकसान) दृष्टी कमी होणे आणि अंधत्व येण्याचे एक प्रमुख कारण आहे.

दृष्टी दिनाचा इतिहासात महाराष्ट्राचे योगदान ?

शासकीय सेवेतील नेत्र शल्यचिकित्सक डॉ. रामचंद्र लक्ष्मण भालचंद्र यांनी अहोरात्र काम केले, खडतर परिस्थितीवर मात करून त्यांनी जिद्द व चिकाटीच्या बळावर ८० हजाराहून अधिक नेत्र शस्त्रक्रिया पूर्ण करून नेत्रहीनांचे जीवन प्रकाशमय केले.

त्यांचा जन्म दिनांक आणि मृत्यू दिनांक १० जून आहे. त्यांच्या कार्याची दखल घेत राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रमांतर्गत प्रतिवर्षी १० जून हा दिवस डॉ. भालचंद्र स्मृतिनिमित्त दृष्टी दिन म्हणून साजरा केला जातो. त्याद्वारे सामान्य जनतेमध्ये नेत्रदानाबाबत जनजागृती केली जाते. ‘असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी’ हे वाक्य अगदी खर असतं

त्यामुळे प्रत्येकांने आपल्या डोळयांची काळजी घ्यावी .

आपण आपल्या डोळ्यांची काळजी कशी घ्यावी?

1)आपली नजर चांगली ठेवण्यासाठी रोज सकस आहार घ्यावा. तुमच्या आहारात अधिकाधिक हिरव्या पालेभाज्या, अंडी, बीन्स आणि गाजर यांचा समावेश करा.

2)धूम्रपानाला कायमचा रामराम करावा .

धुम्रपानामुळे मोतीबिंदू, ऑप्टिक आणि मज्जातंतूंचे नुकसान तसेच दृष्टीच्या विविध समस्या उद्भवू शकतात.

3)उन्हात जातांना सूर्यप्रकाशाचा डोळयांसोबत थेट संपर्क टाळण्यासाठी सनग्लासेस घालावेत.जे तुमच्या डोळ्यांचे संरक्षण करण्यासाठी मदत करतील.

4) सुरक्षितता चष्मा वापरावा.जर तुम्ही कामाच्या ठिकाणी घातक सामग्रीसह काम करत असाल, तर तुमच्या डोळ्यांचे रक्षण करण्यासाठी तुम्ही सुरक्षा चष्मा घालणे आवश्यक आहे.

5)जर तुम्ही लॅपटॉपवर बराच वेळ काम करत असाल तर

दर तासांने पाच मिनिटाचा ब्रेक घ्या. डोळ्याचा कोरडेपणा कमी करण्यासाठी शक्य तितक्या वेळा डोळे मिचकावा.

6) अंधुक प्रकाशात कोणत्याच प्रकारचे वाचन करु नका कारण त्यामुळे डोळ्यांच्या अनेक समस्या तयार होऊ शकतात.

डोळ्यांचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी काय करावे?

आपले डोळे नियमितपणे तपासावेत.

तुम्ही कॉन्टॅक्ट लेन्स वापरत असाल तर त्या जास्त काळ घालणे टाळावे.

कॉन्टॅक्ट लेन्स घालुन पाण्यात पोहणे किंवा झोपणे टाळावे

लोक नेत्रदान न करण्यामागे अनेक कारणे आहेत.

खालील कारणांमुळे भारतात नेत्रदान करणाऱ्यांची संख्या खूपच कमी आहे.

1)सर्वसामान्यां जनतेमध्ये जागृतीचा अभाव आहे.

2) स्थानिक पातळीवर संस्था आणि रुग्णालयांमध्ये अपुऱ्या सुविधा आहेत.

3)नेत्रदानाचे महत्त्व समजून सांगण्यात आपण कुठेतरी कमी पडतोय.

4) लोकांमध्ये अजुनही नेत्रदानाविषयी सामाजिक आणि धार्मिक समज मोठ्या प्रमाणात दिसुन येतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Praful Patel : ''होय, 2004 पासून भाजपशी युती व्हावी म्हणून मी आग्रही होतो'', प्रफुल्ल पटेलांनी सगळाच इतिहास काढला

SRH vs PBKS Live Score : हैदराबादला तिसरा धक्का! अर्धशतक करणाऱ्या अभिषेक शर्माला शशांक सिंगने धाडलं माघारी

Farooq Abdullah: फारुख अब्दुल्लांच्या सभेत चाकूहल्ला; 3 कार्यकर्ते जखमी, दोघांची स्थिती गंभीर

काँग्रेसमध्ये धुसफूस! मल्लिकार्जुन खरगेंच्या फोटोला काळे फासले, अधीर रंजन चौधरींबाबत केलेल्या वक्तव्यामुळे कार्यकर्ते नाराज

जम्मू काश्मीरमध्ये लोकसभेच्या मतदानापूर्वी दहशतवाद्यांचा हल्ला! भाजप कार्यकर्त्याचा मृत्यू, तर एक दाम्पत्य जखमी

SCROLL FOR NEXT