Varsha Gaikwad
Varsha Gaikwad sakal
लोकसभा २०२४

Varsha Gaikwad : उत्तर-मध्य मुंबईतून वर्षा गायकवाड

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : महाविकास आघाडीमध्ये कॉँग्रेसच्या वाट्याला आलेल्या उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून मुंबई विभागीय काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांना काँग्रेसने उमेदवारी जाहीर केली आहे. मात्र, महायुतीचा या मतदारसंघातील उमेदवार अद्याप जाहीर झाला नसल्याने गायकवाड यांच्या विरोधात प्रतिस्पर्धी कोण असेल, यावर अद्याप प्रश्नचिन्ह कायम आहे.

दक्षिण मध्य मुंबईतून लोकसभा निवडणूक लढविण्यास वर्षा गायकवाड आग्रही होत्या. मात्र महाविकास आघाडीमध्ये शिवसेना ठाकरेंकडे हा मतदारसंघ गेल्याने गायकवाड नाराज होत्या. निदान उत्तर मध्य मुंबईतून उमेदवारी मिळावी यासाठी मुंबईतील आमदार, नगरसेवकांचे शिष्टमंडळ घेऊन त्यांनी पक्षश्रेष्ठींवर दबाव आणला होता.

अखेरीस उत्तर मध्य मुंबईतून गायकवाड यांच्या उमेदावरीची घोषणा करून उत्तर मध्य मुंबईतील उमेदवारीचा घोळ कॉँग्रेसने मिटवला आहे. महाविकास आघाडीत काँग्रेसच्या वाट्याला  मुंबईतील उत्तर आणि उत्तर मध्य या दोन जागा आल्या आहेत. काँग्रेसकडून या दोन जागांसाठी सक्षम उमेदवारांचा शोध सुरु होता.

यापैकी उत्तर मध्यमधून काँग्रेसचे आमदार भाई जगताप, माजी मंत्री नसीम खान यांच्या नावाची चर्चा होती. मात्र, काँग्रेसने वर्षा गायकवाड यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. काँग्रेसला अजून उत्तर मुंबईच्या उमदेवाराची प्रतीक्षा आहे.  

उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात विलेपार्ले, चांदिवली, कुर्ला, वांद्रे पूर्व, वांद्रे पश्चिम आणि कलिना या सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. यापैकी चार आमदार महायुतीचे आहेत. तर वांद्रे पूर्वचे आमदार झिशान सिद्दीकी हे काँग्रेस पक्षातून जवळपास बाहेर पडल्यासारखेच आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Porsche Car Accident : ''जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून मी घटनास्थळावर पोहोचलो अन्...'', आमदार टिंगरेंनी अपघाताबद्दल आरोपावर स्पष्टच सांगितलं

Beed Bogus Voting : ''बोगस वोटिंग प्रकरणात कठोर कारवाई करा'' बीडच्या प्रकरणात शरद पवारांनी घातलं लक्ष

Nashik Crime News: आयुक्तालय हद्दीत आचारसंहिता भंगचे 7 गुन्हे! विविध पोलीस ठाण्यांमध्ये अदखलपात्र गुन्हे दाखल

Julian Assange : 'विकीलिक्स'चे संस्थापक असांज यांना लंडनमधील कोर्टाचा मोठा दिलासा! प्रत्यार्पणाला देता येणार आव्हान

Nashik Lok Sabha Election 2024: ना पाण्याची सोय, ना उन्हापासून संरक्षण! मतदारांमध्ये तीव्र नाराजी; व्हिलचेअरमुळे दिलासा

SCROLL FOR NEXT