Varsha Gaikwad : बैठकीला दांडी मारल्यानंतर वर्षा गायकवाडांची पत्रकार परिषद; नाराजी जाहीर करत म्हणाल्या...

''मुंबईमध्ये पक्षाला प्रतिनिधीत्व मिळावं ही आमची अपेक्षा आहे, आमच्या पक्षाने कठोर भूमिका घ्यायला पाहिजे होती.. मुंबईतलं जागावाटप करताना विश्वासात घेतलं नाही. मुंबईमध्ये पक्ष वाढावा हीच आमची भूमिका असून पक्षापुढे म्हणणं मांडणार आहे''
varsha gaikwad
varsha gaikwadSakal

Varsha Gaikwad News : महाविकास आघाडीतील जागावाटपाची घोषणा झाली आहे. चर्चेतल्या सांगली लोकसभा मतदारसंघासह भिवंडी आणि दक्षिण मध्य मुंबई या जागा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडे गेल्यानंतर काँग्रेस पदाधिकाऱ्यांची नाराजी उघड होत आहे. मुंबई काँग्रेसने बुधवारी आयोजित केलेल्या बैठकीला मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष वर्षा गायकवाड यांनीच दांडी मारल्यामुळे ही बैठक रद्द करण्यात आली होती.

त्यानतंर गुरुवारी सकाळी वर्षा गायकवाड यांनी पत्रकार परिषद घेऊन भूमिका स्पष्ट केली. त्या म्हणाल्या की, पक्षाने घेतलेल्या निर्णयानंतर आम्ही कामाला लागलो आहोत. आमचं काही म्हणणं असेल तर ते पक्षासमोर मांडू.

असं असलं तरी मुंबईचं एक वेगळं अस्तित्व आहे, पक्षसंघटनेत काम करत असताना कार्यकर्त्यांच्याही काही अपेक्षा असतात, त्याचा विचार करण्याची गरज आहे.

varsha gaikwad
Jalgaon Lok Sabha Constituency : आमदार मंगेश चव्हाणांची खडसेंवर ‘तोफ’, उन्मेश पाटील यांचे महाजनांवर ‘अस्त्र’!

वर्षा गायकवाड पुढे म्हणाल्या की, मुंबईमध्ये पक्षाला प्रतिनिधीत्व मिळावं ही आमची अपेक्षा आहे, आमच्या पक्षाने कठोर भूमिका घ्यायला पाहिजे होती.. मुंबईतलं जागावाटप करताना विश्वासात घेतलं नाही. मुंबईमध्ये पक्ष वाढावा हीच आमची भूमिका असून पक्षापुढे म्हणणं मांडणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.

मुंबईत सन्मानजनक जागावाटप होणे गरजेचे होते; परंतु उद्धव ठाकरे यांच्या पक्षाने मुंबईतील चार जागांवर परस्पर उमेदवार जाहीर केले, अशी काँग्रेसच्या मुंबईतील नेत्यांची नाराजी आहे. त्यातही, ज्या दक्षिण मध्य मुंबईच्या जागेवर एकेकाळी काँग्रेसचे एकनाथ गायकवाड विजयी झाले होते, त्या जागेवर अनिल देसाई यांना उमेदवारी दिली. त्यामुळे काँग्रेसचे पदाधिकारी नाराज झाले आहेत. ही जागा आपल्याला मिळावी असा आग्रह वर्षा गायकवाडांसह काँग्रेस कार्यकर्त्यांनी धरला आहे. त्यामुळे वर्षा गायकवाड यांनी नाराजी थेट दिल्लीला फोन करून कळवली असल्याचे समजते.

varsha gaikwad
Side Effects Of Chilled Water : उन्हाळ्यात जास्त प्रमाणात थंड पाणी पिताय? मग, जाणून घ्या त्याचे गंभीर दुष्परिणाम

उद्धव ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता

काँग्रेसच्या मुंबई अध्यक्ष वर्षा गायकवाड उद्धव ठाकरे यांची भेट घेण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. ही भेट नेमकी केव्हा आणि कोणत्या कारणासाठी होणार, हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाही. मात्र मुंबईतील दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघाच्या जागेवरुन चर्चा करण्यासाठी ही भेट घेतली जातेय, असं बोललं जातंय.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com