Loksabha Election 2024
Loksabha Election 2024 sakal
लोकसभा २०२४

Loksabha Election 2024 : उमेदवारीवरून भाजपमध्ये गट ; भुमरे उमेदवार असल्यास, ‘तो’ गट काम करेल का?

सकाळ वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : लोकसभेच्या औरंगाबाद मतदारसंघातून महायुतीकडून निवडणूक कोण लढणार, हे अद्याप जाहीर झालेले नाही. परंतु, ही जागा शिंदे गटाकडे जाण्याचे संकेत आहेत. पालकमंत्री संदीपान भुमरे हे उमेदवार असण्याची शक्यता आहे. या प्रकारावरून भाजपमध्ये दोन गट पडले. भुमरे उमेदवार असल्यास विरोध करणारा गट महायुतीचे काम करेल का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

मतदारसंघात सर्वच प्रमुख पक्षांचे उमेदवार जाहीर झाले आहेत. त्यातील काहींचा तर प्रचारही सुरू झाला. परंतु, महायुतीचा उमेदवार अद्याप निश्चित झालेला नाही. नुकत्याच झालेल्या स्तंभपूजनाच्या कार्यक्रमातील चित्रावरून ही जागा शिंदे गटाकडे जाण्याचे संकेत मिळाले आहेत. दुसरीकडे कार्यक्रमातील पालकमंत्री भुमरे यांच्या वर्चस्वामुळे तेच उमेदवार राहतील, अशी चर्चा आहे. शुक्रवारी (ता. १९) याबाबत अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे.

तत्पूर्वी पालकमंत्री भुमरे यांच्या नावाला भाजपमधील एका गटाने अप्रत्यक्षरीत्या विरोध दर्शविला. पालकमंत्री भुमरेंऐवजी अपक्ष म्हणून लढण्याच्या तयारीत असलेले विनोद पाटील यांना उमेदवारी द्यावी, असे त्यांचे मत आहे. याबाबत त्यांनी भाजप शहराध्यक्ष शिरीष बोराळकर यांनाही कळवले. उमेदवारी जाहीर होण्याअगोदरच उघडपणे विरोध दर्शविला जात आहे. त्याचे व्हिडिओदेखील व्हायरल झाले. आता भुमरे यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब झाल्यास, भाजपमधील हा गट त्यांचे काम करील का? असा प्रश्न आहे.

संभाजीनगरचा खासदार हा महायुतीचा पाहिजे. यासाठी ही जागा महत्त्वाची आहे. आणि भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता, पदाधिकारी, लोकप्रतिनिधी जो महायुतीचा उमेदवार असेल त्यासाठी काम करेल. भाजप केडरबेस पार्टी आहे. कार्यकर्त्यांना चांगले प्रशिक्षण दिले जाते, कुठल्याही प्रकारचे बंड होणार नाही.

— डॉ. भागवत कराड,

केंद्रिय अर्थ राज्यमंत्री

हा पक्षांतर्गत विषय होता. त्यामुळे प्रकरण माध्यमांपर्यंत जायला नको होते. याबाबत पक्षातील वरिष्ठांनी मला विचारणा केली. त्यांना यासंबंधी माहिती दिली. राहिला विषय उमेदवारीचा, महायुती जो उमेदवार येथे देईल, त्याला निवडून आणण्यासाठी भाजप पदाधिकारी, कार्यकर्त्यांना काम करावेच लागेल.

— शिरीष बोराळकर, शहराध्यक्ष, भाजप

पक्षात नेमकं चाललंय काय?

एकीकडे भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांनी जागा भाजपला सुटावी, यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न केले. दुसरीकडे पक्षाचे पदाधिकारी असलेले कुणाल मराठे यांनीही यापूर्वी अशीच भूमिका घेतली होती. त्यानंतर प्रदेश सरचिटणीस असलेले संजय केनेकर यांनी शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाठ यांना उमेदवारी देण्याची मागणी केली होती. त्यानंतर आता या दहा नगरसेवकांनी पालकमंत्री भुमरे यांच्या उमेदवारीलाच अप्रत्यक्षरीत्या विरोध दर्शविला आहे. असा सर्व घटनाक्रम पाहता, शिस्तप्रिय अशी ओळख असलेल्या भारतीय जनता पक्षात नेमकं काय चाललंय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah : ‘पीओके’ भारताचेच, आम्ही ते घेऊ ;अमित शहा

आजचे राशिभविष्य - 17 मे 2024

Latest Marathi News Live Update : महायुतीची शिवाजी पार्कवर तर, इंडिया आघाडीची बीकेसी मैदानावर आज सांगता सभा

पुण्याचा चालता-बोलता इतिहास

Loksabha Election : पहिल्या चार टप्प्यांत ६६.९५ टक्के मतदान ; अधिकाधिक मतदानाचे आयोगाचे आवाहन

SCROLL FOR NEXT