Latur Loksabha Constituency
Latur Loksabha Constituency sakal
लोकसभा २०२४

Latur Loksabha Constituency : लोकसभेच्या लातूर मतदारसंघात गुरुवारी अकरा अर्ज दाखल

सकाळ वृत्तसेवा

लातूर : लोकसभेच्या लातूर मतदारसंघात उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शुक्रवार (ता. १९) हा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे अर्ज भरण्यासाठी एकच गर्दी होण्याची शक्यता आहे. दरम्यान, गुरुवारी (ता. १८) अकरा उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. तर १५ जणांनी तीस उमेदवारी अर्ज खरेदी करून नेले आहेत.

लोकसभेच्या लातूर मतदारसंघात निवडणूक प्रक्रिया ता. १२ एप्रिल रोजी सुरवात झाली. यात ता.१९ एप्रिल हा उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. अनुसूचित जातीसाठी हा राखीव मतदारसंघ आहे. यात गुरुवारी (ता. १८) अकरा उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्याकडे दाखल केले आहेत. तसेच १५ जणांनी तीस उमेदवारी अर्जाची खरेदी केली आहे. या मतदारसंघात गुरुवारी काँग्रेसचे डॉ. शिवाजी काळगे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. शुक्रवारीही ते पुन्हा मिरवणुकीने अर्ज दाखल करणार आहेत. तसेच भारतीय जनता पक्षाचे सुधाकर शृंगारे यांनीही प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत अर्ज दाखल केला आहे.

गुरुवारी दाखल झालेले अर्ज

या मतदारसंघात गुरुवारी जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्याकडे उमेदवारी दाखल केलेल्यांमध्ये नरसिंगराव निवृत्ती उदगीरकर (अपक्ष), मच्छिंद्र गुणाजी ऊर्फ गुणवंतराव कामंत (बहुजन भारत पार्टी), मच्छिंद्र गुणाजी ऊर्फ गुणवंतराव कामंत (अपक्ष), सुधाकर तुकाराम शृंगारे (भारतीय जनता पक्ष), रवींद्र स्वामी (अपक्ष), शिवाजी बंडप्पा काळगे (इंडियन नॅशनल काँग्रेस), अॅड. प्रदीप एस. चिंचोलीकर (अपक्ष), लखन राजाराम कांबळे (राष्ट्रीय बहुजन पार्टी), डॉ. अनिल सदाशिव कांबळे (भारतीय जनता पक्ष), सुधाकर तुकाराम सूर्यवंशी (अपक्ष), पपीता रावसाहेब रणदिवे (अपक्ष) यांचा समावेश आहे.

शनिवारी होणार अर्जांची छाननी

लोकसभेच्या लातूर मतदारसंघात निवडणूक प्रक्रियेत दाखल झालेल्या एकूण उमेदवारी अर्जांची शनिवारी (ता.२०) छाननी होईल. तर उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत ही सोमवारी (ता.२२) आहे. उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर लढतीचे चित्र स्पष्ट होईल. त्यानंतर खऱ्या अर्थाने प्रचाराला गती येणार आहे. या मतदारसंघासाठी ता. सात मेला मतदान तर ता.चार जूनला मतमोजणी होणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"सिंचन घोटाळ्याप्रकरणी आरोप चुकीचे नव्हते, तेव्हा..."; देवेंद्र फडणवीसांनी मनातलं बोलून दाखवलं

धक्कादायक घटना! मुलीला बोटावर शस्त्रक्रियेसाठी नेले, डॉक्टरांनी चुकून केली जिभेवर शस्त्रक्रिया

लोकसभा निवडणुकीत भाजप-एनडीए 400 जागा पार करणार; अंबाबाई दर्शनानंतर माजी मुख्यमंत्र्यांचं मोठं विधान

Corona Vaccine : कोरोना प्रतिबंधक ‘कोवॅक्सिन’चेही दुष्परिणाम; बनारस हिंदू विद्यापीठातील चाचण्यांमधील निरीक्षणे

T20 World Cup 2024: ICC ने केली सराव सामन्यांची घोषणा! टीम इंडियाचा सामना कोणत्या संघाविरुद्ध अन् कधी? पाहा संपूर्ण शेड्युल

SCROLL FOR NEXT