Amit Shah   esakal
लोकसभा २०२४

Amit Shah: भाजप जिंकल्यास मुस्लिम आरक्षण रद्द करुन SC-ST-OBC ना देऊ - अमित शाह

कर्नाटकात काँग्रेस सरकारनं मुस्लिमांना ओबीसीच्या कोट्यातून आरक्षण देण्याची घोषणा केली आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

हैदराबाद : भाजप लोकसभा निवडणूक जिंकल्यास कर्नाटकात लागू करण्यात आलेलं मुस्लिम आरक्षण रद्द करु आणि SC-ST-OBC ना परत करु, असं विधान अमित शहा यांनी केलं आहे. तेलंगणात एका प्रचार सभेत बोलताना त्यांनी हे विधान केलं आहे. कर्नाटकात काँग्रेस सरकारनं मुस्लिमांना ओबीसीच्या कोट्यातून आरक्षण देण्याची घोषणा केली आहे. यावरुन भाजपनं काँग्रेसवर टीका सुरु केली आहे. (If BJP wins we will scrap Muslim reservation and give it to SC ST and OBC says Amit Shah in Telangana)

तेलंगाणाच्या भोंगीर इथं प्रचार सभेत बोलताना शहा म्हणाले, काँग्रेसला खोटं बोलून निवडणूक जिंकायच्या आहेत. ते सांगता आहेत की जर पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा सत्तेत आले तर ते आरक्षण संपवतील. मोदींनी गेल्या दहा वर्षापासून या देशात सत्ता चालवली पण त्यांनी आरक्षण संपवलं नाही. तर दुसरीकडं काँग्रेस पक्षानं एससी, एसटी, ओबीसींचं आरक्षण लुटून त्यातील ४ टक्के आरक्षण मुस्लिमांना दिलं आहे. (Latest Marathi News)

शहा पुढे म्हणाले की, "सन २०१९ मध्ये तेलंगाणाच्या नागरिकांनी आम्हाला चार जागा दिल्या. यावेळी आम्ही तेलंगणात १० जागांहून अधिक जागा जिंकणार आहोत. तेलंगाणातील भाजपचा हा डबल डिजिट स्कोअर पंतप्रधान मोदींना ४०० पार घेऊन जाणार आहे. त्यानंतर आम्ही मुस्लिमांचं आरक्षण रद्द करु आणि एससी, एसटी, ओबीसींच्या आरक्षणात वाढ करु" आमच्या वचननाम्यात आम्ही मोदींची गॅरंटी दिली आहे. त्यांनी आजवर जे म्हटलंय करुन दाखवलं आहे. पण राहुल बाबांची गॅरंटी ही सूर्य मावळेपर्यंतही टिकत नाही, अशा शब्दांत राहुल गांधींवर शहांनी टीकास्त्र सोडलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

EPFO: आता नोकरी बदलली तरी पीएफची चिंता नाही! PF आपोआप ट्रान्सफर होणार; पण कसा? वाचा ईपीएफओचा मोठा निर्णय

IND vs SA, 3rd T20I: अभिषेक शर्मा बरसला, शुभमन गिलनेही दिली साथ; टीम इंडियाची दणदणीत विजयासह मालिकेत आघाडी

गोतस्करी करणारी वाहने स्क्रॅप करावीत! आमदार कोठे यांची अधिवेशनात मागणी; सोलापुरात पुढच्या शैक्षणिक वर्षात सुरु होणार शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय

IND vs SA, T20I: जसप्रीत बुमराह अचानक घरी गेला, पुढच्या दोन टी२० सामन्यात खेळणार की नाही? BCCI ने दिले अपडेट

३० हजार फूट उंचीवर मृत्यूशी झुंज! इंडिगो विमानात घडलेला तो थरारक क्षण! कोल्हापूरकर डॉक्टर बनल्या 'देवदूत'

SCROLL FOR NEXT