Vijay Shivtare
Vijay Shivtare sakal
लोकसभा २०२४

Vijay Shivtare : मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून शिवतारेंची समजूत

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी राजकीय पंगा घेणारे शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाचे पुणे जिल्ह्यातीन नेते विजय शिवतारे यांची ‘वर्षा’ या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्यासोबत बैठक झाली. यात शिवतारे यांच्या राजकीय समस्यांबाबत प्रामुख्याने चर्चा झाल्याचे समजते.

शिवतारे व या तिघांतील चर्चा चर्चा सकारात्मक झाली सांगून त्याद्वारे शिवतारे यांच्या मनातील सर्व प्रश्नांवर तोडगा काढण्यात यश आल्याचे समजते. बैठकीत झालेल्या चर्चेनंतर शिवतारे पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडणार होते मात्र अजूनही त्यांनी भूमिका मांडलेली नाही. मात्र शिवतारे यांनी बारामती लोकसभेच्या उमेदवारीवरून माघारी घेतल्याचे समजते.

शिवतारे यांना चर्चेसाठी शिंदे यांनी वर्षा बंगल्यावर दोन वेळा बोलावले  होते. या बैठकीत शिवतारे यांनी ही लढाई पवार विरुद्ध सामान्य जनता अशी आहे. हा एक ऐतिहासिक असा क्षण आहे. मला थांबवू नका, असे मुख्यमंत्र्यांना समजावले होते. यावर ‘युतीधर्म पाळायला हवा’, असे मुख्यमंत्र्यांनीही त्यांना सांगितले होत. मात्र त्यांनतरही आता अजित पवारांना माझा आवाका दाखवतो, असे म्हणत पवार यांच्याविरोधात शिवतारेंनी दंड थोपटले होते.

तसेच अजित पवार यांच्या गटाकडूनही शिवतारेंवर कडक कारवाईची मागणी करण्यात आली होती. गेली काही दिवस महायुतीत या विषयावरून खटके उडत आहेत. त्यामुळे शिंदे गटही शिवतारे यांच्याविरोधात भूमिका घेण्याची तयारीत होता. मात्र काल रात्री शिंदे, पवार व फडणवीस यांनी शिवतारे यांची समजूत घातल्याचे समजत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CAA Certificates: केंद्राकडून CAAची प्रमाणपत्र वाटपाला सुरुवात; कोणाला मिळालं पहिलं प्रमाणपत्र? जाणून घ्या

Nashik Modi Rally: "मोदीजी आता कांद्यावर बोला" मोदींनी भाषण मध्येच थांबवलं! पिंपळगाव बसवंतच्या सभेत काय घडलं?

PM Modi Nashik: नाशिकमध्ये पंतप्रधान अखेर कांद्यावर बोललेच; ऑपेरेशन ग्रीन, निर्यात बंदी आणि बफर स्टॉकबाबत म्हणाले...

Chandu Champion : 'चॅम्पियन आ रहा है'...कार्तिकच्या आगामी सिनेमाचं पोस्टर रिलीज; लूकची होतेय चर्चा

Mumbai Metro: पंतप्रधान मोदींच्या रोड शोसाठी मुंबईत मेट्रो बंद; सुरक्षेचे कारण देत घेतला निर्णय

SCROLL FOR NEXT