Chandu Champion : 'चॅम्पियन आ रहा है'...कार्तिकच्या आगामी सिनेमाचं पोस्टर रिलीज; लूकची होतेय चर्चा

Chandu Champion first poster released : अभिनेता कार्तिक आर्यनच्या आगामी 'चंदू चॅम्पियन' सिनेमाचं पहिलं पोस्टर सोशल मीडियावर रिलीज करण्यात आलं. कार्तिकच्या लूकने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं.
Chandu Champion poster
Chandu Champion posterEsakal

आजवर दमदार भूमिकांमधून अभिनेता कार्तिक आर्यनने प्रेक्षकांचं मन जिंकून घेतलं आहे. भूलभूलैय्या असो किंवा सत्यप्रेम की कथा त्याच्या प्रत्येक सिनेमाचं आजवर कौतुक झालं आहे. आता कार्तिक नव्या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. नुकतच त्याच्या आगामी सिनेमाचं पोस्टर सोशल मीडियावर रिलीज करण्यात आलं.

कार्तिक लवकरच कबीर खान यांच्या आगामी 'चंदू चॅम्पियन' या सिनेमात दिसणार आहे. सोशल मीडियावर रिलीज झालेल्या पोस्टरची चर्चा सध्या सगळीकडे आहे.

लंगोटवर पळणारा, माती आणि घामाने माखलेला, रेखीव शरीरयष्टी असलेल्या कार्तिकला या पोस्टरवर ओळखण सध्या कठीण जातंय. कार्तिकने या सिनेमासाठी फिटनेसवर घेतलेली मेहनत दिसून येतेय. "चॅम्पियन आ रहा है" असं कॅप्शन कार्तिकने या पोस्टरला दिलं आहे. 14 जून 2024 ला कार्तिकचा हा बहुप्रतीक्षित सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. हा सिनेमा त्याच्या आयुष्यातील सगळ्यात आव्हानात्मक सिनेमा असल्याचं त्याने या पोस्टमध्ये म्हंटलं आहे.

त्याच्या या पोस्टवर त्याच्या फॅन्सनी कमेंट करत त्याला त्याच्या या आगामी सिनेमासाठी शुभेच्छा दिल्या आणि त्यांनाही हे पोस्टर आवडल्याचं त्यांनी म्हंटलं. विशेष कार्तिकने पोस्टर शेअर करण्याआधी शेअर केलेल्या व्हिडिओने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. या व्हीडिओमध्ये कार्तिक त्याची पेट डॉग कटोरीच्या मागे पळताना दिसत होता. "पोस्टर आजच रिलीज करायचं होतं पण कटोरीने ते फाडून टाकलं त्यामुळे नवीन पोस्टर उद्या रिलीज होईल." असं कॅप्शन त्याने या व्हिडिओला दिलं होतं.

Chandu Champion poster
Kartik Aaryan About Finance : 'आई मला काही खर्चच करु देत नव्हती, तिनं स्पष्टपणे सांगितलं होतं...'

कबीर खान यांचं दिग्दर्शन असलेला हा सिनेमा एका खऱ्या स्पर्धकाच्या आयुष्यावर आधारित असून त्याच्या कधीही न हार मानणाऱ्या वृत्तीची गोष्ट या सिनेमातून पाहायला मिळणार आहे. या सिनेमासाठी कार्तिकने कमालीचं फिटनेस ट्रान्सफॉर्मेशन केलं असून त्याने यासाठी बरंच वजनही घटवलं. विशेष म्हणजे कार्तिक या सिनेमासाठी मराठी भाषाही शिकला. मराठी शब्दांचे उच्चार योग्य व्हावेत म्हणून कार्तिक बराच काळ ट्रेनिंग घेत असल्याचं एएनआयच्या सूत्रांनी सांगितलं.

Chandu Champion poster
Kartik Aaryan: दाऊदला नडलेल्या 'या' डॉनच्या भूमिकेत चमकणार कार्तिक आर्यन

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com