Loksabha 2019

Loksabha 2019 : भाजपमध्ये बंडखोरी; नगरमध्ये लढणार 'हा' उमेदवार

सकाळवृत्तसेवा

शिर्डी : शिवसेनेचे माजी खासदार आणि सध्या भाजपमध्ये असलेले भाऊसाहेब वाकचौरे यांनी शिर्डी लोकसभेत अपक्ष निवडणूक लढण्याची घोषणा केली. जनतेच्या आग्रहामुळे मी निवडणूक लढवत असल्याचे वाकचौरे यांनी म्हटले आहे. शिवसेना आणि काँग्रेसने जाहीर केलेल्या उमेदवारांबद्दल जनतेची नाराजी असल्याने मला ही निवडणूक लढवायची आहे, अशी भूमिका वाकचौरे यांनी घेतली आहे.

भाजप कोट्यातून साईबाबा संस्थानच्या विश्वस्तपदी सध्या वाकचौरे आहेत. शिवसेनेनेकडून तिकीट मिळण्याची अपेक्षा त्यांना होती. पण शिवसेनेने विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे यांनाच तिकीट दिले. त्यामुळे वाकचौरे यांनी अपक्ष निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. वाकचौरे यांच्या निर्णयामुळे शिर्डी लोकसभेत तिरंगी लढत रंगण्याची शक्यता आहे.

दरम्यान, वाकचौरे यांनी 2004 च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेकडून रामदास आठवलेंचा पराभव केला होता. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत ते काँग्रेसमध्ये गेले होते. त्यांनी शिर्डी लोकसभा काँग्रेसकडून लढवली होती. त्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. त्यानंतर त्यांनी भाजपच्या तिकीटावर 2014 ची श्रीरामपूर विधानसभा निवडणूक लढवली. मात्र, त्यावेळी पराभव झाला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT