Loksabha 2019

Loksabha 2019 : प्रज्ञासिंह ठाकूर यांचा उमेदवारी अर्ज मागे

वृत्तसंस्था

भोपाळ : मध्यप्रदेशातील भोपाळ लोकसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार प्रज्ञासिंह ठाकूर यांनी आपला उमेदवारी अर्ज आज (शनिवार) मागे घेतला. त्यामुळे भाजपच्या अधिकृत उमेदवार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी अखेर सुटकेचा नि:श्वास सोडला. 

प्रज्ञासिंह ठाकूर या नावाचे दोन उमेदवार भोपाळमधून निवडणूक रिंगणात होते. यामध्ये भाजपच्या साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर तर अपक्ष उमेदवार प्रज्ञासिंह ठाकूर निवडणुकीच्या मैदानात होत्या. केवळ नावाच्या साम्यामुळे मतदार भाजपच्या उमेदवाराऐवजी अपक्ष उमेदवाराला मतदान करतील, याची भीती होती. त्यामुळे साध्वी प्रज्ञासिंहने अपक्ष उमेदवार प्रज्ञासिंहला आपल्या निवासस्थानी बोलावले होते. त्यावेळी त्यांनी प्रज्ञासिंह यांच्याशी चर्चा केली. या चर्चेदम्यान साध्वी प्रज्ञासिंह यांनी अपक्ष उमेदवार प्रज्ञासिंह यांना उमेदवारी अर्ज मागे घेण्याची विनंती केली. त्यांच्या या विनंतीवरून प्रज्ञासिंह यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. 

दरम्यान, प्रज्ञासिंह ठाकूर यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने भाजपची अडचण दूर झाल्याचे सांगितले जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update: नागपूरकडे निघालेल्या हेलिकॉप्टरचं जालन्यात इमर्जन्सी लँडिंग

Champions Trophy 2025 : जागा ठरली! पाकिस्तानने केली मोठी घोषणा; PCBच्या निर्णयानंतर BCCI उचलणार मोठं पाऊल?

Kansas Bizarre : आधी बायकोची केली हत्या, मग विम्याच्या पैशातून खरेदी केली चक्क 'सेक्स डॉल'.. पोलीसही झाले हैराण!

Shilpa Shetty: शिल्पाच्या मुलाला पंजुर्लीने दिला आशीर्वाद! काय आहे शिल्पाचं कांतारा कनेक्शन ?

Big Discount: केंद्रानंतर 21 राज्यांनी केली घोषणा! जुनी कार स्क्रॅप करून नवीन कारवर मिळेल 50 हजारांची सूट

SCROLL FOR NEXT