Loksabha 2019

Loksabha 2019 : चंद्राबाबू-ममता बॅनर्जींची कोलकत्यात बंद दाराआड चर्चा

वृत्तसंस्था

कोलकता : आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू आणि पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यात गुरुवारी (ता. 9) बंद दाराआड चर्चा झाली. खड्‌गपूर येथे या दोन नेत्यांमध्ये झालेल्या चर्चेत महाआघाडीच्या (महागठबंधन) भविष्यातील नियोजनाबाबत चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

गुरुवारी संध्याकाळी नायडू आणि बॅनर्जी यांच्यात बंद दाराआड सुमारे पंधरा मिनिटे चर्चा झाल्याची माहिती तृणमूल कॉंग्रेसच्या वरिष्ठ नेत्याने "पीटीआय'शी बोलताना दिली. या वेळी दोन्ही नेत्यांमध्ये "महाआघाडी'संदर्भात चर्चा झाल्याचे समजते. कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी आणि नायडू यांच्यात दिल्लीत झालेल्या बैठकीबाबतही या वेळी चर्चा झाल्याचे सांगण्यात आले.

दिल्लीत 21 मे रोजी विरोधी पक्षांच्या नेत्यांची दिल्लीत बैठक होण्याची शक्‍यता असून, या बैठकीला बॅनर्जी या उपस्थित राहणार का, या प्रश्नावर "तृणमूल'च्या नेत्याने स्पष्ट केले, की दिल्लीतील बैठकीची तारीख अद्याप निश्‍चित झालेली नाही. कदाचित बैठकीची तारीख बदलू शकते. 23 मेनंतर बॅनर्जी या बैठकीत सहभागी होऊ शकतात. 

"व्हीव्हीपॅट'च्या मुद्यावरही नायडू आणि बॅनर्जी यांच्यात चर्चा झाल्याचे समजते; तसेच लोकसभा निवडणुकीच्या पाच टप्प्यांतील मतदानाच्या आकडेवारीवरही या वेळी चर्चा झाल्याचे "तृणमूल'च्या नेत्याने सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आता मसाल्यातही भेसळीची फोडणी! लाकडाचा भुसा, Acid चा वापर; १५ टन बनावट मसाला जप्त

Aavesham: 30 कोटींचं बजेट अन् कमाई 140 कोटी; ब्लॉकबस्टर ठरला फहाद फासिलचा आवेशम, ओटीटीवर कधी होणार रिलीज?

Karan Johar : "आई सोबत टीव्ही पाहत होतो पण.. " करण जोहर भडकला, कॉमेडीयनने मागितली माफी; कोण आहे केतन सिंह ?

Gadchiroli: स्फोटकांनी भरलेले 6 प्रेशर कुकर अन् डिटोनेटर नष्ट...मातीच्या खाणींचा शोध घेण्यासाठी गेलेल्या जवानांची कारवाई

Sunil Gavaskar Video : गावसकरांचा जुना VIDEO व्हायरल, रनरेटवरून विराटवर टीका केल्यानंतर झाले ट्रोल

SCROLL FOR NEXT