Devendra_Fadnavis
Devendra_Fadnavis 
Loksabha 2019

Loksabha 2019 : कर्णधारच मैदानात नसताना राष्ट्रवादी आमच्यासमोर काय टिकणार: मुख्यमंत्री

सकाळवृत्तसेवा

औसा : या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा कर्णधाराविना लढत आहे. त्यामुळे ते आमच्यासमोर काय टिकणार? यापुढे लोक मनोरंजनासाठी राहुल गांधींची सभा पाहतील, अशी जोरदार टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीवर केली. 

लातूर जिल्ह्यातील औसा येथे आज (मंगळवार) महायुतीची सभा होत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे प्रथमच सभेसाठी एकत्र येत आहेत. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह रिपाई नेते रामदास आठवले आणि प्रमुख नेते उपस्थित होते.

मुख्यमंत्री म्हणाले, की लोकसभा निवडणुकीचे मतदान जवळ आले असून, लातूर आणि उस्मानाबादमध्ये महायुती निवडून आणण्यासाठी आपण एकत्र आलो आहेत. मोदी आणि उद्धवजी जिथे एकत्र येतात तिथे काय गर्दी जमते हे आज आपण पाहत आहोत. आता महायुती थांबणार आहे. हि दिल्लीची निवडणूक असून, गल्लीची निवडणूक नाही. देशाचा मानसन्मान राखण्यासाठी ही निवडणूक महत्त्वाची आहे. ही भारताच्या अस्मितेची निवडणूक आहे. भारताचा तिरंगा मोदींच्या नेतृत्वातच उंचावलेला राहू शकतो. पाच वर्षात परिवर्तन केले भारताच्या ताकदीची निवडणूक आहे. काँग्रेस अजूनही गरिबी हटाओचा नारा देत आहे. तुमच्या पिढ्यांनी गरिबी हटाओ नारा देऊनही अजूनही तुम्ही तीच घोषणा देत आहात. शेतकऱ्यांच्या पाठिशी आमचे सरकार उभे आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kiran Sarnaik: आमदार किरण सरनाईक यांच्या कुटुंबातील ४ जणांचा अपघातात मृत्यू! पातूरमध्ये भीषण अपघात

Pune Traffic Update: उद्यापासून पुणे वाहतुकीत गर्डर लॉचिंग कामामुळे मोठे बदल, कोणते असतील पर्याय मार्ग?

Kapil Sharma : 'द ग्रेट इंडियन कपिल शो'साठी कपिल शर्मा घेतो 'इतकं' मानधन !

Chitra Wagh: "चित्रा वाघ यांनी माफी मागावी अन्यथा..."; 'पॉर्नस्टार' प्रकरणावर अभिनेत्याचा गंभीर इशारा

RBI: गुंतवणूकदार मालामाल! रिझर्व्ह बँकेचा एक निर्णय अन् कंपनीचे शेअर्स तुफान तेजीत

SCROLL FOR NEXT