Pravin-Chheda-BJP
Pravin-Chheda-BJP 
Loksabha 2019

Loksabha 2019 : काँग्रेसचे प्रवीण छेडा आणि डॉ.भारती पवार यांचा भाजपमध्ये प्रवेश

सकाळवृत्तसेवा

मुंबई - मुख्यमंत्री देवंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत डॉ. भारती पवार व काँग्रेसचे प्रवीण छेडा यांचा भाजपमध्ये प्रवेश केला. मुंबईतील वानखेडे स्टेडियमच्या एमसीए लॉनमधील कार्यक्रमात त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी या दोघांचाही नरेंद्र मोदींच्या नेनृत्वावर विश्वास असून, त्यानी भाजपमध्ये येण्याचा निर्णय घेतल्याने आपल्याला आनंद दोत असल्याचे म्हटले. 

प्रवीण छेडा यांना भाजपकडून लोकसभेची उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. प्रवीण छेडा यांच्यासह डॉ. भारती पवार यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला. मंत्री प्रकाश मेहता यांच्यासोबत असलेल्या मतभेदांमुळे प्रवीण छेडा यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली होती. मात्र आता निवडणुकांच्या तोंडावर त्यांनी घरवापसी केली आहे.

भाजपने काल लोकसभा उमेदवारांची यादी जाहीर करताना ईशान्य मुंबईतील उमेदवार घोषित केला नव्हता. या जागेवर किरीट सोमय्या विद्यमान खासदार असून युतीतील मित्रपक्ष शिवसेनेचा सोमय्यांना विरोध आहे. त्यामुळे प्रवीण छेडा हे किरीट सोमय्या यांना लोकसभा निवडणुकीसाठी पर्याय असल्याचीही जोरदार चर्चा आहे.

दिंडोरी मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारीसाठी डाॅ पवार दावेदार होत्या. मात्र कौटुंबिक कलहामुळे आणि त्यांच्या उमेदवारीला घरातुनच विरोध झाला. त्यामुळे गटबाजीचा दगाफटका टाळण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेनेचे माजी आमदार धनराज महाले यांचा पक्षप्रवेश घडवला होता. श्री महाले यांना उमेदवारी जाहीर झाल्याने भारती पवार नाराज होत्या. या नाराजीचा लाभ घेत जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी त्यांच्याशी संपर्क केला होता. भाजपचे खासदार हरीश्चंद्र चव्हाण यांच्याशी मतभेद  झाले होते. त्यांच्यातील दुराव्यामुळे महाजन यांनी भारती पवार याच्या प्रवेशासाठी विशेष पाठपुरावा केला. 

दरम्यान, दुसरीकडे संजय काकडेही या कार्यक्रमाला उपस्थित होते. नाराज असलेल्या संजय काकडे यांचे मन वळवण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना यश आले आहे. संजय काकडे कुठेही जाणार नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी बोलताना सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Swati Maliwal Assault Case: केजरीवालांच्या पीएला ५ दिवसांची पोलीस कोठडी, न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

J-K Terrorist Attacks: जम्मू-काश्मीरमध्ये दोन दहशतवादी हल्ले, अनंतनागमध्ये पर्यटक जोडप्यावर गोळीबार, भाजप नेत्याची हत्या

IPL 2024 Playoffs Schedule : प्लेऑफचे शेड्यूल! कुठे अन् कधी कोणत्या संघांमध्ये होणार क्वालिफायर आणि एलिमिनेटर सामने?

IPL 2024, RCB vs CSK: चेन्नईचा 17 व्या हंगामातील प्रवास थांबला! धोनीचीही कारकिर्द संपली? सामन्यानंतरचा पाहा Video

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

SCROLL FOR NEXT