Loksabha 2019

Loksabha 2019 : 'मी काँग्रेसमध्ये होतो, आहे आणि राहणार'

सकाळवृत्तसेवा

कऱ्हाड : रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या भाजप प्रवेशाबाबतची वस्तुस्थिती काय हे रणजितसिंहच सांगतील, मात्र, जयकुमार गोरे काँग्रेसमध्ये होते, आहेत व काँग्रेसमध्येच राहतील, असा खुलासा आमदार जयकुमार गोरे यांनी आज येथे पत्रकारांशी बोलताना केला. दरम्यान, माझा व राष्ट्रवादीचा विषय असून, त्यांच्या पदरात मी माप टाकावे, असे राष्ट्रवादीनेही काही पुण्य केले नाही. साताऱ्यात उदयनराजेंसोबत असून, माढ्याचा निकाल तुम्हाला चांगलाच दिसेल, अशी पुष्टीही त्यांनी जोडली. 

काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या संभाव्य भाजप प्रवेशाच्या पार्श्‍वभूमीवर काही वेळातच जयकुमार गोरे यांनी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची भेट घेतली. सुमारे दोन तास कमराबंद चर्चेनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, ""लोकसभेच्या दृष्टीने आमदार चव्हाण यांच्याशी चर्चा झाली. कोणत्या लोकांच्या काय अडचणी आहेत. हे त्यांना सांगितले. दोन्ही काँग्रेस एकत्र काम करताना तू मोठा, की मी मोठा हा प्रश्‍न आहे. मात्र, काँग्रेस कार्यकर्त्यांचा सन्मान राखला पाहिजे, ही पहिल्यापासून भूमिका आहे. त्यामुळे काँग्रेसच्या कार्यकर्त्याला कोणीही गृहित धरू नये.''

रणजितसिंहांचा निर्णय तुम्हाला विचारून झाला का? या प्रश्‍नावर ते म्हणाले, ""त्यांनी काय निर्णय घ्यावा हे त्यांना स्वातंत्र्य आहे. भाजप प्रवेशाबाबतची वस्तुस्थिती काय हे रणजितसिंहच सांगतील. मात्र, माढा मतदारसंघावर चांगले लक्ष असून, माढ्याचा निकालही चांगला दिसेल. पृथ्वीराज चव्हाण हे माझे नेते असून, त्यांच्याशी चर्चा करूनच मी माझा निर्णय घेईन.'' 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: 'डायल 108' अ‍ॅम्ब्युलन्स प्रोजेक्ट कंत्राट प्रकरण तापणार? हायकोर्टाकडून राज्य सरकारला नोटीस

Pat Cummins: कमिन्सनं सांगितलं कसं तुटलेलं त्याचं बोट... ऐकून हार्दिक अन् सूर्याही झाले शॉक; Video व्हायरल

Latest Marathi News Live Update : 'तीन टप्प्यांनंतर हे स्पष्ट झालंय की भाजपचा विजय रथ जनता पुढे नेतेय..' - पंतप्रधान मोदी

Wedding Season : नोंदणी पद्धतीने विवाह करायचा आहे? मग, जाणून घ्या सोपी प्रक्रिया

18 आमदारांची प्रतिष्ठा लागली पणाला; नेत्यांच्या कामगिरीवरच लोकसभेच्या उमेदवारांचं भवितव्य अवलंबून!

SCROLL FOR NEXT