Loksabha 2019

Loksabha 2019 : विखे-पाटील काँग्रेसमध्ये असल्याचा आनंदच : शरद पवार

वृत्तसंस्था

मुंबई : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील अद्याप काँग्रेसमध्ये आहेत, याचा आनंद आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज (गुरुवार) दिली. तसेच विखे-पाटील यांच्या अन्य वक्तव्यांवर मी काय बोलणार, असेही ते म्हणाले.

राधाकृष्ण विखे-पाटील यांचे चिरंजीव डॉ. सुजय विखे-पाटील यांनी काँग्रेसला रामराम करत भाजपमध्ये प्रवेश केला. सुजय यांच्या भाजपप्रवेशानंतर त्यांचे वडील राधाकृष्ण विखे-पाटील यांच्यावर काँग्रेसच्या काही नेत्यांकडून टीका केली जात होती. त्यानंतर नैतिकेतेनुसार राधाकृष्ण विखे-पाटील विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा देतील, अशी शक्यता व्यक्त केली जात होती.

तसेच राधाकृष्ण विखे-पाटील काँग्रेसमधून बाहेर पडून भाजपमध्ये प्रवेश करतील, असाही अंदाज वर्तवला जात होता. आज विखे-पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली. यामध्ये त्यांनी कोणतीही महत्त्वाची घोषणा केली नाही. त्यामुळे शरद पवार यांनी विखे-पाटील अद्याप काँग्रेसमध्ये असल्याचा आपणांस आनंद आहे, असे सांगितले.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video: अमित शाहांच्या Edited व्हिडिओबाबत दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई, गृहमंत्रालयाच्या तक्रारीवरून FIR दाखल

Chhattisgarh Accident News: कार रस्त्यावर उभी असताना पिकअपची धडक अन्.... भीषण अपघातात ८ ठार, मृतांमध्ये 3 लहान मुलांचा समावेश

Ruturaj Gaikwad CSK vs SRH : ऋतु बहरला, देशपांडेही चमकला; सीएसकेनं बालेकिल्ला परत मिळवला!

Yoga Tips : उत्तम पचनक्षमतेसाठी योगा फायदेशीर, जेवण झाल्यावर करा ‘या’ योगासनांचा सराव

Samantha Ruth Prabhu: एकवेळेच्या जेवणाचीही होती भ्रांत अन् आज आहे कोट्यवधींची मालकीण; 'ऊ अंटावा' गर्ल समंथाचा सुपरस्टार होण्याचा प्रवास

SCROLL FOR NEXT