Loksabha 2019

Loksabha 2019 : कन्हैया कुमार लढविणार 'या' मतदारसंघातून निवडणूक

वृत्तसंस्था

पाटणा : जवाहरलाल नेहरू विद्यापीठ (जेएनयू) संघटनेचा माजी विद्यार्थी नेता कन्हैया कुमार आता निवडणुकीच्या मैदानात उतरला आहे. कन्हैया कुमार बिहारच्या बेगुसरायमधून लोकसभा निवडणूक लढविणार असून, भारतीय कम्युनिस्ट पक्षाकडून (भाकप) उमेदवारी देण्यात आली आहे. 

बिहारमध्ये महाआघाडी करण्यासाठी मागील काही दिवसांपासून वेगवान हालचाली सुरू होत्या. त्यातच कन्हैया कुमारला महाआघाडीकडून उमेदवारी देण्यात आली नाही. मात्र, भाकपने त्याला उमेदवारी दिली आहे. याबाबतची घोषणा बिहारचे सचिव सत्यनारायण सिंह यांनी केली. कन्हैया कुमार बेगुसरायमधून लोकसभा निवडणूक लढवणार असल्याने या मतदारसंघात आता तिरंगी लढत होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 

दरम्यान, सतत वादग्रस्त वक्तव्य करून नेहमी चर्चेत असणारे भाजप नेते आणि केंद्रीयमंत्री गिरिराज सिंह आणि राष्ट्रीय जनता दलाचे तन्वीर हसन यांच्याशी कन्हैया कुमारला सामाना करावा लागणार आहे. 

डाव्या पक्षांचाही मिळणार पाठिंबा

कन्हैया कुमारने जवाहरलाल नेहरु विद्यापीठातील विविध निवडणुकांमध्ये यशस्वी राजकारण केले होते. त्यामुळे त्याची तरुणांमध्ये स्वतंत्र ओळख निर्माण झाली आहे. त्यामुळे आता त्याला इतर डाव्या पक्षांचाही पाठिंबा मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Major Accident: भरधाव कारच्या धडकेत मजुरी करण्याऱ्या आईसह दोन चिमुकले ठार!

IPL 2024 DC vs RR : दिल्लीचा राजस्थानला दणका, घरच्या मैदानात मिळवला दणदणीत विजय; संजू सॅमसनचे अर्धशतक व्यर्थ

Virtual Touch: बालकांना 'व्हर्च्युअल स्पर्शा'च्या धोक्याची जाणीवही करुन देणं गरजेच - हायकोर्ट

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

SCROLL FOR NEXT