Loksabha 2019

Election Tracker: आज काय म्हणाले शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे?

सकाळ डिजिटल टीम

निवडणूक म्हणजे शब्दांचा आणि भाषणांचा सुकाळ.. प्रत्येक पक्षाचा प्रत्येक नेता रोज काही ना काही बोलणारच.. या निवडणुकीच्या रोजच्या रणधुमाळीत कोण, काय आणि कधी बोललंय हे कुणाच्याच लक्षात राहत नाही. याचसाठी हा प्रपंच! काय म्हणाले शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे?

 


23 एप्रिल 2019

काही लोक या लोकसभा निवडणुकीत सभा घेऊन युतीला मत देऊ नका, असे आवाहन करत फिरत आहेत. युतीला मत द्यायचे नाही तर मग कोणाला मत द्यायचे, ते तरी सांगा, असे विचारल्यावर त्याचे उत्तर त्यांच्याकडे नाही. जे लोक आपला पक्ष चालवू शकले नाही, त्यांच्या पक्षाची दिशा हरपली आणि दुर्दशा झाली. 

--- मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर नाव न घेता टीका

----- ठाण्यात शिवसेनेचे उमेदवार राजन विचारे यांच्या प्रचारासाठी महापालिका मुख्यालयासमोरील रस्त्यावर सभा 


22 एप्रिल 2019

आम्ही जे वचन देतो ते पूर्ण करतो, म्हणून गेली 25 वर्षे मुंबई महापालिकेवर शिवसेनेची सत्ता आहे, पन्नास-साठ वर्षांत काँग्रेसने देशावर दरोडा घातला. जनता काँग्रेसवाल्यांचा भ्रष्टाचार कधी विसरू शकत नाही. काँग्रेसवाल्यांनी अतिरेक्यांना पुन्हा पाकिस्तानात सोडून दिले. युती सरकारने मात्र पाकिस्तानात घुसून त्यांचा पाडाव केला. काँग्रेसवाले देशद्रोहाचे कलम काढून टाकणार आहेत. आम्ही देशद्रोह्यांना गाडून टाकणार आहोत.

दक्षिण मध्य मुंबईतील युतीचे उमेदवार राहुल शेवाळे यांच्या प्रचारसभेत धारावी येथून

21 एप्रिल 2019

मी नेहमीच शेतकऱ्यांचे प्रश्‍न मांडत आलो आहे, पण मला कोण शेतकऱ्यांचा नेता म्हणत नाही, तर शेतकऱ्यांचा मित्र म्हणतात. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी फक्त शिवसेना उभी राहिली आहे. 

---धैर्यशील माने यांच्या प्रचारार्थ इचलकरंजी येथिल नाट्यगृह चौकातील सभेतून


18 एप्रिल 2019

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाला एक परंपरा आहे. या आधी इथे गुंड होते, विनायक राऊत यांनी गुंडगिरी मोडीत काढली. आम्हाला गुंड नकोत खासदार हवे आहेत.

---नारायण राणेंना अप्रत्यक्षरित्या टोला; रत्नागिरी येथिल जाहीर सभेतून


17 एप्रिल 2019

प्रकल्पांसाठी माझ्या कोकणवासीयांच्या जमिनी घेऊन काहीजण कारखानदार होणार आणि शेतकऱ्यांना मात्र वाऱ्यावर सोडणार म्हणूनच प्रकल्पांना विरोध केला. गीते साहेब, तुमच्यात आणि तटकरे यांच्यामध्ये खूप फरक आहे. त्यांनी किती प्रॉपर्टी जमवलेली आहे. गीते साहेब तुम्हाला इतक्या वेळेस खासदार करूनही ते जमले नाही

---माणगाव येथे केंद्रिय मंत्री अनंत गिते यांच्या प्रचार सभेत काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी आणि सुनील तटकरे यांच्यावर टीका


16 एप्रिल 2019

पाच वर्षांपूर्वी तुमचं सरकार असताना ए टू झेड बाराखड्या कमी पडतील, अशा घोटाळ्यांचं पुस्तक मी काढलं होतं. ते वाचा आणि मग, मी तुम्हा काँग्रेस-राष्ट्रवादीवाल्यांना प्रश्न विचारतो, स्वत: घोटाळेबाज असताना आमच्यावर आरोप करता, तुम्हाला लाज वाटते का? निवडणुका आल्यावर शरद पवारांना दुष्काळ असल्याचे कळले. पण, गेली पाच वर्षे शिवसैनिक दुष्काळग्रस्तांच्या मदतीला धावून जात आहेत़ तेव्हा हे राष्ट्रवादीवाले घरामध्ये स्वत:ला कोंडून घेऊन बसले होते

---परभणी लोकसभा मतदार संघातील शिवसेनेचे उमेदवार संजय जाधव यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत


12 एप्रिल 2019

विश्‍वासघात हेच ज्यांचं कर्तृत्व आहे त्यांना पुन्हा संधी देणार का? शेतकऱ्यांना गोळ्या घालणाऱ्या व त्यांचे रक्त सांडणाऱ्या नतद्रष्टांना पुन्हा का संधी द्यायची, आंदोलनं करून काही तरी मिळविण्याची नाटकं आणि थेरं आम्ही करीत नाही. आम्ही थेट प्रश्‍न सोडविण्यावर भर देतो, 

---धैर्यशील माने यांच्या प्रचारार्थ इस्लामपूर येथे घेतलेल्या सभेतून


11 एप्रिल 2019

गत पाचवर्षांच्या कालावधीत जिल्ह्याच्या विकासाची गाडी योग्य रूळावर आली आहे. गत पाच वर्षांत खामगाव-जालना रेल्वे मार्गासह खामगाव जिल्ह्याचा प्रश्न मार्गी लागला नसल्याची वस्तुस्थिती आहे. मात्र, खामगाव-जालना रेल्वेमार्गासाठी रेल्वेच्या अर्थसंकल्पात 03 हजार कोटींची तरतूद करण्यात आली. या रेल्वे मार्गाच्या भूसंपादनाची प्रक्रीया सुरू आहे. त्यामुळे गेल्या 50 वर्षांत ज्या विषयाला कुणीही हात लावत नव्हतं तो विषय पुढे सरकला. 

---महायुतीचे बुलडाणा लोकसभा मतदार संघाचे उमेदवार प्रतापराव जाधव यांच्या प्रचार सेभेतून


10 एप्रिल 2019
वसंतदादांच्या पाठीत खंजीर खुपसून शरद पवार मुख्यमंत्री झाले. राजीव गांधींना विरोध केला तरीही वाडगा घेऊन त्याच्या दारी उभे राहिले. याला लाचारी म्हणतात. अन्यायाविरोधात आम्ही दगडधोंडे हाती घेतो. जनता जनार्दनाला दिलेला शब्द कधीही खाली पडून देऊ नकोस हा मंत्र आजही पाळत आहे. 25 वर्षांपूर्वी युती केली आहे ती आजही कायम आहे. अयोध्या राममंदिराचा मुद्दा आम्ही आजही सोडलेला नाही. याबाबत जी-जी आवश्यक भूमिका असेल, ती घेत आहोत.

---शृंगारतळी येथे झालेल्या जाहीर सभेत


09 एप्रिल 2019

काँग्रेसचा जाहीरनामा हा तर इंदिरा गांधीच्या काळातीलच आहे. पण, भाजपच्या जाहीरनाम्यातील वचनांमुळेच शिवसेना आणि भाजपाची युती झाली आहे. राम मंदिर, काश्मीरचे 370 कलम आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे शेतकरी हा जाहीरनाम्याचा केंद्रबिंदू आहे.

---लातूर येथील महायुतीच्या सभेत बोलताना

08 मार्च 2019

काँग्रेस-राष्ट्रवादी जाहिराती करुन लाज नाही का वाटतं? विरोधी पक्षाच्या फुग्याला खूप भोक पडले आहे. त्यामुळे आता हा फुगा फुगणार नाही. तुम्ही 56 काय 156 पक्ष जरी एकत्र आलात तरी भगवा फडक़णारच त्यामुळे युती सरकारच सत्तेत येणार आहे.
 
---यवतमाळमध्ये भाजप-सेना युतीच्या उमेदवार भावना गवळी यांच्या प्रचारार्थ पोस्टल ग्राउंडवर आयोजित जाहीर सभेत बोलताना


06 मार्च 2019

विरोधकांनी नैतिकता, धैर्य व एकवाक्यता दाखवली तर सत्ताधारी बेबंद वागणार नाहीत. विरोधकांत आज आडवाणींसारखा भीष्माचार्यही नाही व मोदींसारखा कृष्णार्जुन नाही. ते विष्णू आहेत. पाच पांडवांचे बळही त्यांच्यात आहे. त्यामुळेच विरोधकांच्या रथाचे चाक चिखलात रुतले आहे.

--- सामनाच्या अग्रलेखातून



05 मार्च 2019

मोदी यांनी टाकलेल्या कोड्याने अनेकांच्या कुंडल्या भीतीने फडफडल्या असतील, पण नुसत्याच लटकवत ठेवलेल्या तलवारी भ्रष्टाचार कसा संपवणार?
   ---सामनाच्या अग्रलेखातून

02 एप्रिल 2019
वसईकरांनो तुम्ही कुणाचेही गुलाम नाही. तुमच्यावर कोणी गुंडागर्दी करत असेल तर या गल्लीबोळातल्या गुंडांचे मुजोरी सरकार म्हणून आम्ही मोडून काढू, अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीचे नाव न घेता इशारा दिला.
---पालघर येथे शिवसेनेचे उमेदवार राजेंद्र गावित प्रचारार्थ आयोजित सभेत बोलताना


01 एप्रिल 2019
मी जन्मतः शिवसैनिक असून चौकीदार होण्याची गरज नाही असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. विरोधी पक्षात गेल्यानंतर सगळ्यांनाचा पंतप्रधान व्हायचं आहे असेही उद्धव यांनी म्हटले आहे. जेवढ्या माझ्याकडे जागा आल्या आहेत तेवढ्यातच शिवसेना ठेवावी आणि बाकीकडे न्यायची नाही का? राहुल गांधी नेमकं काय करत आहेत हादेखील प्रश्न लोकांना पडला आहे असेही उद्धव म्हणाले.
 --- संजय राऊत यांनी सामनासाठी घेतलेल्या मुलाखतीतून


30 मार्च, 2009
भाजपा अध्यक्ष अमित शहा यांचा उमेदवारी अर्ज भरताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे गांधीनगरला गेले होते त्यावरुन विरोधी पक्षांनी उद्धव ठाकरेंना लक्ष्य केलं होतं यावर उद्धव यांनी बोलताना अमित शहा यांचा उमेदवारी अर्ज भरताना आम्ही त्याठिकाणी गेलो हे एकमेव कारण नव्हते तर, राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा महामेळावा यानिमित्ताने झाला असे त्यांनी म्हटले आहे.
 --सामना या दैनिकातून 


27 मार्च, 2019
शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मिशन शक्तीचं कौतुक करताना मिशन शक्ती आपल्यासाठी अभिमानाची आणि आनंदाची गोष्ट असल्याचे म्हटले आहे. जवान असो की शास्त्रज्ञ, प्रत्येकजण आपली कामगिरी बजावत असतो. त्यांना सरकारच्या पाठबळाची गरज असते. हे पाठबळ सरकार देत आहे ही आनंदाची गोष्ट आहे. देशाची प्रतिमा उंचवण्याचं काम या शास्त्रज्ञांनी केलेलं आहे, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.


24 मार्च, 2019
मी मुद्दाम युती केली कारण आम्ही उपस्थित केलेले सर्व प्रश्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोडविले. त्यामुळे देवेंद्रजी मला तुमचा अभिमान वाटतो. तुम्ही शब्द दिला आणि तो पाळला आणि ते आश्वासन पूर्ण केलं, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कोल्हापूरातील सभेत म्हटले.


17 मार्च, 2019
शिवसेना-भाजपमध्ये पाच वर्षांत अनेक मुद्‌द्‌यांवर मतभेद झाले. लढायची तयारी दोन्ही पक्षांनी केली. शेतकरी कर्जमाफी, नाणारसह काही मुद्‌द्‌यांना मी विरोध केला; पण तो प्रामाणिक होता. आता हिंदुत्व व देशहित, या व्यापक विचारावर दोन्ही पक्षांनी प्रामाणिक युती केली आहे. युतीचा वृक्ष लावायला मोठा त्याग आहे. अनेकांनी रक्त सांडले आहे. लोकसभेवर भगवा फडकविण्यासाठी त्यामुळे गद्दारी, हरामखोरी चालणार नाही, असे प्रतिपादन शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नाशिक येथे केले.

  -लोकसभा निवडणुकीतील युतीनंतर जिल्हास्तरावरील पदाधिकारी कार्यकर्त्यांमधील मनोमिलनासाठी चोपडा लॉन्समध्ये उत्तर महाराष्ट्रातील युतीच्या पदाधिकाऱ्यांचा मनोमिलन मेळाव्यातून बोलताना

15 मार्च ,2019
'सध्या कोणावर टीका करायची म्हणजे पंचायत होते. आता कोणत्यातरी पक्षात असला आणि नंतर शिवसेना किंवा भाजपमध्ये असायचा. त्यामुळे आता माझी एकच विनंती आहे, की आता शरद पवारांना भाजपमध्ये घेऊ नका''
   --- अमरावती येथे शिवसेना-भाजप युतीचा महामेळाव्यातून

13 मार्च, 2019
मी माझ्या पोरांसह इतरांच्या पोरांचेही लाड पुरवतो. दुसऱ्यांची पोरे फक्त नुसती धुणीभांडी करण्यासाठी असतात, असे आम्ही समजत नाही.
- सुजय विखे यांनी आज (ता. 13) दुपारी उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर जाऊन भेट घेतली, या वेळी शिवसेनेने मनापासून मदत करावी, अशी विनंती सुजय यांनी उद्धव यांना केली. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nana Patole : खोके द्या, फोडा अन् राज्य करा ; पटोलेंची मोदींवर टीका,राज्याचे नुकसान केल्याचा आरोप

Prakash Ambedkar : सुळे, पाटलांमुळे बारामतीतून माघार ; डॉ. प्रकाश आंबेडकरांनी फोडले गुपित,यंदा खाते उघडणार

Water Scarcity : पिण्याच्या पाण्यासाठी दाहीदिशा वणवण ; राज्यात भीषण टंचाई,७४९५ वस्त्यांवर टँकरद्वारे पुरवठा

Latest Marathi News Live Update : PM मोदींची माढा, धाराशिवसह लातूरमध्ये सभा, तर 25 वर्षानंतर वेल्ह्यात धडाडणार शरद पवारांची तोफ

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 30 एप्रिल 2024

SCROLL FOR NEXT