patil
patil 
Loksabha 2019

Loksabha 2019 : सुशीलकुमार शिंदे भरघोस मतांनी विजयी होतील : आ. राजन पाटील

सकाळवृत्तसेवा

मोहोळ (सोलापूर) : माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी सोलापूरसह जिल्ह्याच्या विकासासाठी मोठे योगदान दिले आहे, अनेक युवकांच्या हाताला रोजगार मिळाला आहे, त्यामुळे येत्या लोकसभा निवडणुकीत ते भरघोस मतांनी विजयी होतील असा आत्मविश्वास माजी आमदार राजन पाटील यांनी व्यक्त केला.

लोकसभा निवडणुकीचे वारे सध्या जोरदार वाहू लागले आहेत. माजी मंत्री शिंदे यांच्या कन्या आमदार प्रणिती शिंदे यांनी काल येथे आमदार पाटील यांची अनगर येथे जाऊन भेट घेतली, त्या काल मोहोळ तालुक्याच्या दौऱ्यावर होत्या. त्यांनी तालुक्यातील चार गावांचा दौरा केला. मात्र अनगर येथे काय चर्चा
 झाली, याबाबतचा अधिकृत  तपशील समजू शकला नाही.

पाटील पुढे म्हणाले, राष्ट्रवादी हा पुरोगामी विचारांचा पक्ष असून सर्वसामान्यांच्या हिताला प्राधान्य देणार आहे. किती जरी वावड्या उठल्या तरी राष्ट्रवादीचा मतदार हा  कायम राष्ट्रवादीच्याच पाठीशी आहे. मी युतीचा धर्म पाळणारा असून पक्षाने जी जबाबदारी देईल ती यशस्वीपणे पार पडणार असल्याचे पाटील यांनी सांगून, एनटीपीसी व पॉवर ग्रिड सारखे मोठे प्रकल्प शहरात आणून,शिंदे यांनी सोलापूरच्या वैभवात भर टाकली आहे. 

राष्ट्रवादीचे माजी खासदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या भाजपा प्रवेशाबद्दल त्यांना छेडले असता, तो मोहिते-पाटील कुटुंबाचा वैयक्तिक निर्णय असल्याचे पाटील यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT