Priyanka Gandhi.
Priyanka Gandhi. 
Loksabha 2019

Loksabha 2019 : मोदींच्या भाषणाची एक्सपायरी डेट संपली : प्रियंका गांधी

वृत्तसंस्था

वाराणसी : उत्तर प्रदेशाच्या दौऱ्यावर असलेल्या काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यांनी आज (ता. 19) पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली. मोदी मागील सरकारकडे 70 वर्षांत काय केले याचा हिशोब मागणारी भाषणं करीत आहेत, पण याच मोदींवर आता पाच वर्षांत त्यांच्या सरकारने काय केले हे सांगायची वेळ आली आहे. त्यांच्याही भाषणांची एक्सपायरी डेट आता संपली आहे, अशा शब्दांत प्रियंका यांनी मोदींवर टीका केली. 

प्रियंका गांधी कालपासून तीन दिवस उत्तर प्रदेशच्या प्रचार दौऱ्यावर आहेत. या दरम्यान काल भदोही येथे मुक्कामाला असताना माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी ही टीका केली. प्रियंका यांनी मोदींबरोबरच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावरहील टीका केली आहे. 'मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांच्या सरकारला दोन वर्षं पूर्ण झाली, यावेळी त्यांनी प्रसिद्ध केलेले रिपोर्ट कार्ड हे फक्त दिसायलाच आकर्षक आहे. मात्र प्रत्यक्षात विकास आणि योजनांबाबत काहीच काम नाही, असे सांगत प्रियंका गांधी यांनी योगींना टोला लागवला. 

दरम्यान, आज (ता. 19) दुपारी प्रियंका गांधी या मिर्झापूर येथे नागरिकांना भेटणार आहेत. सिंधोरा घाटावर जाणार आहेत. त्यानंतर चुनार पान्टुन ब्रीज येथे त्यांची सभा होईल. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Yogi Adityanath : जगाला शांतता संदेश देणाऱ्या सनातन परंपरेचा काँग्रेसनं अपमान केलाय, त्याचं अस्तित्व नाकारलंय; योगींचा घणाघात

Daily Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष - 02 मे 2024

Sakal Podcast: शिर्डी मतदारसंघात काय होणार? ते तुरुंगातील नेत्यांना व्हर्च्युअल प्रचार करता येणार नाही

Amit Shah Fake Video Case : झारखंड काँग्रेसचं एक्स अकाऊंट सस्पेंड; अमित शाह व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई

Latest Marathi News Live Update : काँग्रेस उमेदवाराच्या प्रचारासाठी राहुल गांधी आज कर्नाटक दौऱ्यावर

SCROLL FOR NEXT