Loksabha 2019

Loksabha 2019 : पुण्याचा निकाल पहिल्यांदा लागण्याची शक्‍यता

सकाळवृत्तसेवा

पुणे : लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला उद्या (ता.23) सकाळी आठ वाजता सुरवात होणार आहे. जिल्हा निवडणूक प्रशासनाने अंतिम निकाल कधी हाती येतील, हे
स्पष्ट केलेले नाही. मात्र, जिल्ह्यातील पुणे लोकसभा मतदारसंघात इतर तीन मतदारसंघाच्या तुलनेत मतमोजणीच्या फेऱ्या कमी आहेत. त्यामुळे पुण्याचा निकाल पहिल्यांदा लागण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे.

जिल्ह्यातील पुणे आणि बारामती लोकसभा मतदारसंघासाठी 23 एप्रिलला तर शिरूर आणि मावळ लोकसभा मतदारसंघासाठी 29 एप्रिल रोजी मतदान झाले होते. पुणे आणि बारामती लोकसभा मतदारसंघातील मतमोजणी कोरेगाव पार्क येथील भारतीय खाद्य महामंडळाच्या गोदामामध्ये होणार आहे. तर, शिरूर आणि मावळ लोकसभा मतदारसंघातील मतमोजणी बालेवाडी येथील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलात होणार आहे.

1997 मतदान केंद्रांसाठी 96 काऊंटिंग टेबल 

पुणे लोकसभा मतदारसंघात 1997 मतदान केंद्र असून, सहा विधानसभानिहाय मिळून एकूण 96 काऊंटिंग टेबल असतील. या मतदारसंघात सरासरी प्रत्येकी 21 फेऱ्या होतील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 LSG vs RR : केएल शेर तर संजू सवा शेर! राजस्थानचा एक पाय प्ले ऑफमध्ये

DC vs MI : गोलंदाजीतली 'गळती' मुंबईच्या मुळावर; बॅटिंगमध्ये फर्स्ट क्लास तर बॉलिंगमध्ये नापास

Jolly LLB 3 : आता रंगणार जॉली विरुद्ध जॉली केस; सिनेमाच्या शूटिंगबाबत महत्त्वाची अपडेट आली समोर

Google वर जाहिराती करण्यासाठी भाजपने खर्च केले 100 कोटी; BJP पहिल्या स्थानावर तर काँग्रेस कितव्या स्थानावर? वाचा सविस्तर...

CM Yogi Aadityanath : ''काशी अन् अयोध्येनंतर आता मथुरेकडे प्रस्थान...'' योगी आदित्यनाथांचे स्पष्ट संकेत

SCROLL FOR NEXT